कोरोना रुग्णांकडून जादा बिल उकळणे भोवलं, बारामतीतल्या 4 खासगी रुग्णालयांवर कारवाई

| Updated on: Nov 04, 2020 | 9:08 PM

कोरोना रुग्णांकडून जादा बिल उकळत असल्याचे रुग्णालयांना चांगलंच भोवलं आहे. बारामतीमधील चार खाजगी रुग्णालयांवर प्रशासनाने कारवाई केली आहे.

कोरोना रुग्णांकडून जादा बिल उकळणे भोवलं, बारामतीतल्या 4 खासगी रुग्णालयांवर कारवाई
Follow us on

बारामती : कोरोना रुग्णांकडून जादा बिल उकळत असल्याचे रुग्णालयांना चांगलंच भोवलं आहे. बारामतीमधील चार खाजगी रुग्णालयांवर प्रशासनाने कारवाई केली आहे. ऑडिटरच्या तपासणीनंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. (Administration Take Action Against baramati privet hospital over Excessive Bill)

बारामती शहरातील चार खासगी रुग्णालयांनी कोरोना रुग्णांना जादा बिले असल्याचे समोर आल्याने प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या पथकाने केलेल्या बिलांच्या तपासणीत ही बाब उघड झाली आहे. यामुळे वाढीव बिले घेणाऱ्या रुग्णालयांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

रुग्णालयांनी घेतलेली 36 लाखांची रक्कम त्यांनी रुग्णांना परत करावी, असे आदेश बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिले असून यासंबंधी रुग्णालयांना नोटिसा बजावणार असल्याचेही कांबळे यांनी सांगितले.

प्रशासनाच्या माध्यमातून नेमलेल्या पथकाच्यावतीने तसंच नेमून दिलेल्या लेखापरीक्षकाकडून ही तपासाची कारवाई केली जात आहे. शासनाने निर्धारित केलेल्या रक्कमपेक्षा जादा बिलं घेतली असल्यास ते रुग्णाला परत मिळणार असल्याचेही प्रांतधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.

“शासनाने निर्धारित केलेल्या दरापेक्षा अधिक रक्कम या रुग्णालयांनी आकारल्याचे स्पष्ट झालंय. ही रक्कम रुग्णालयांनी रुग्णांना परत करावी यासाठी नोटिसा बजावल्या जाणार आहेत. त्यांनी ती परत न केल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. बारामती शहरातील जवळपास 16 रुग्णालयांची तपासणी पूर्ण झाली. यात जवळपास 36 लाख रुपये अधिक असल्याचे समोर आलं. शहरातील ज्यादा बिलं देणाऱ्या रुग्णालयांना नोटीस देण्याची प्रक्रिया सध्या सुरु असल्याची आहे”, अशी माहिती कांबळे यांनी दिली.

(Administration Take Action Against baramati privet hospital over Excessive Bill)

संबंधित बातम्या

कोरोना रुग्णांकडून जादा बिल उकळणे भोवलं, नागपुरात 16 खाजगी रुग्णालयांना पालिकेची नोटीस