Aurangabad: घर तिथे बोअरवेलची स्पर्धा, औरंगाबादच्या सातारा देवळाईत 350 फुटांवरही झरा दिसेना!

| Updated on: Mar 20, 2022 | 6:00 AM

सातारा देवळाईचा महानगरपालिकेत समावेश झाला. तेव्हा आता या भागात महापालिकेचे पाणी येईल, अशी नागरिकांना आशा होती. मात्र आता कुठे सात वर्षानंतर या भागात जलवाहिनीचे काम सुरु झाले आहे. तोपर्यंत भूगर्भातील पाण्यावरच नागरिकांचे जीवन अवलंबून आहे.

Aurangabad: घर तिथे बोअरवेलची स्पर्धा, औरंगाबादच्या सातारा देवळाईत 350 फुटांवरही झरा दिसेना!
सांकेतिक छायाचित्र
Follow us on

औरंगाबादः शहरातील सातारा देवळाई (Satara Deolai) परिसरात अद्याप कायमस्वरुपी पाणपुरवठ्याची योजना येण्यासाठी बराच अवधी आहे. 2015 मध्ये हा परिसर महापालिकेत (Aurangabad municipal corporation) समाविष्ट करण्यात आला. मात्र अजूनही येथे नळाद्वारे पाणीपुरवठा झालेला नाही. त्यामुळे मुबलक पाणी मिळण्यासाठी नागरिकांनी घरोघरी बोअरवेल घेऊन ठेवले आहेत. घर तिथे बोअरवेलची जणू स्पर्धाच या भागात पहायला मिळते. त्यामुळे या परिसरातील पाणी पातळी 350 फुटांपर्यंत खोल गेली आहे. आता नव्याने बोअर खोदणारे नागरिक पाण्याचे झरे कायम रहावेत म्हणून आणखी खोल बोअर (Borewell) घेतात. त्यामुळे येथील जमिनीची अक्षरशः चाळणी केल्याचे निदर्शनास आले आहे.

यंदा भरपूर पाऊस असूनही पातळी खोल

या वर्षी औरंगाबाद आणि संपूर्ण मराठवाड्यात विक्रमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्याची पाणीपातळीही कमालीची वाढली होती. एरवी सातारा भागातील बोअरवेलचे पाणी मार्च-एप्रिलपासून कमी होऊ लागते. यंदा बोअरचे पाण आटणार नाही, अशी आशा होती. मात्र मार्च महिन्यातच दरवर्षीप्रमाणे पाणी पातळी खोल गेली आहे. सातारा देवळाईचे भौगोलिक क्षेत्र हे सपाट नाही. डोंगर माथ्यावर आणि ओबडधोबड अवस्थेत उतारावर असल्याने पाणी पातळत झपाट्याने वाढ झाली. या परिसरात भूगर्भात काळा पाषाण असल्याने त्याचा फायदा बाजूच्या बोअरवेलला होता नाही.

अतिखोल बोअरवेल खोदणे धोकादायक

सातारा देवळाईचा महानगरपालिकेत समावेश झाला. तेव्हा आता या भागात महापालिकेचे पाणी येईल, अशी नागरिकांना आशा होती. मात्र आता कुठे सात वर्षानंतर या भागात जलवाहिनीचे काम सुरु झाले आहे. तोपर्यंत भूगर्भातील पाण्यावरच नागरिकांचे जीवन अवलंबून आहे. उन्हाळ्यात बोअरवेलचे पाणी आटल्यावर टँकर्सद्वारे पाणी विकत घेण्याची वेळ नागरिकांवर येते. अशातच अनेक नागरिकांनी साडेदहा हजार फुटांवर बोअरवेल खोदले आहेत. अतिखोल बोअरवेल खोदणे हे धोकादायक ठरू शकते, असे भूजल सर्वेक्षण विभागाद्वारे वारंवार सांगण्यात येते. तरीही नागरिकांनी असे प्रकार टाळावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच छतावरील वाहून जाणाऱ्या पाण्याचे पुनर्भरण करावे, ज्या घरात नागरिकांनी बोअरवेल रिचार्ज करण्याची प्रक्रिया राबवलेली आहे, अशा नागरिकांना आजही पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे.

जलपुनर्भरण कसे करावे?

स्वतःचे बोअर असेल तर त्या बोअरमध्ये गच्चीवरील, छपरावरील अथवा जमिनीवर जमा होणाऱ्या पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण केले जाऊ शकतके. अंगणाचा उतार तपासून, ज्या ठिकाणी पाणी जमण्याची शक्यता आहे, त्या ठिकाणी पाच फूट लांब, पाच फुट रुंद आणि आठ फूट खोल अशा आकाराचा खड्डा खणतात. या खड्ड्यात छोटे दगड, विटांचे तुकडे व जाड रेती यांचे समान थर टाकून खड्डा भरून टाकतात. सर्वात वर बारीक रेतीचा थर टाकतात. पाऊस सुरु झाल्यावर अंगणात जमा होणारे पाण जमिनीत मुरायला सुरुवात होते. जमिनीतील पाण्याचे प्रवाह या पाण्याला बोअरवेलकडे घेऊन जातात आणि बोअरवेलच उपशाची क्षमता वाढण्यास मदत होते. योग्य तज्ज्ञांच्या मदतीने पुनर्भरण केल्यास बोअरवेलचे पाणी वर्षभर टिकून राहते व वाया जाणाऱ्या पाण्याचा योग्य वापर होण्यास मदत होते.

इतर बातम्या-

Osmanabad | सक्षणा सलगरांच्या जाचाला कंटाळून पक्ष सोडला, भाजप आक्रमक, जि. परिषदेत गोंधळ, उस्मानाबादेत काय घडतंय?

हा देवेंद्र फडणवीसांचा B Plan!! MIM ला घुसवून महाविकास आघाडी तोडण्याचा डाव, औरंगाबादेत Khaire यांचा आरोप