Osmanabad | सक्षणा सलगरांच्या जाचाला कंटाळून पक्ष सोडला, भाजप आक्रमक, जि. परिषदेत गोंधळ, उस्मानाबादेत काय घडतंय?

सक्षणा सलगर यांनी जिल्हा परिषद सभेत पाटील कुटुंबाला टार्गेट करित गोंधळ घातल्यामुळे सहकारी पक्षाच्या अनेक सदस्यांनी त्यांचे भर सभेत कान टोचले. यापूर्वी अजित पवार यांनी भर सभेत सक्षणा सलगर यांना सुनावले होते.

Osmanabad | सक्षणा सलगरांच्या जाचाला कंटाळून पक्ष सोडला, भाजप आक्रमक, जि. परिषदेत गोंधळ,  उस्मानाबादेत काय घडतंय?
उस्मानाबादेत भाजपचे सक्षणा सलगर यांच्यावर आरोपImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 19, 2022 | 3:58 PM

उस्मानाबादः सक्षणा सलगर (Sakshana Sangar) यांच्या जाचाला कंटाळून पक्ष सोडल्याची टीका राष्ट्रवादीच्या माजी युवती जिल्हाध्यक्ष देवकन्या गाडे यांनी केला आहे. सक्षणा या राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्ष तथा उस्मानाबाद जिल्हा परिषद (Osmanabad ZP) सदस्य आहेत. तर देवकन्या गाडे (Devkanya Gade) यांनी नुकताच भाजपात प्रवेश केला आहे. उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या शेवटच्या सर्वसाधारण सभेतही सक्षणा सलगर यांच्या आक्रमकतेमुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. सक्षणा सलगर यांनी आमदार भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी तथा माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अर्चना पाटील यांच्यावर भर सभेत आरोप केले. सत्तेचा रिमोट कंट्रोल कुणाकडे आहे? विकास कामे झाली नाहीत असे आरोप केले. पाटील यांनी पदाचा दुरुपयोग केला तसेच वैयक्तिक कामे केली असा आरोप सलगर यांनी केला.

तुम्ही पाटील कुटुंबाच्या जीवावर मोठ्या झाल्या- देवकन्या गाडे

दरम्यानन सक्षणा सलगर यांच्या अशा प्रकारे आरोपांनतर त्यांच्यावर पाटील समर्थक भाजप कार्यकर्ते यांनी टिका करायला सुरुवात केली आहे. सक्षणा सलगर यांच्या जाचला कंटाळून राष्ट्रवादी युवती सोडल्याचा आरोप माजी युवती जिल्हाध्यक्ष देवकन्या गाडे यांनी केला आहे. पाटील कुटुंबाच्या जीवावर मोठ्या झालात आणि त्यांच्याबाबत बोलताना तारतम्य ठेवा, चुकीचे आरोप करू नका, अन्यथा आपण कसा त्रास देता याची पोलखोल करू असा इशारा गाडे यांनी दिला आहे.

अजितदादांनीही कान टोचले होते

सक्षणा सलगर यांनी जिल्हा परिषद सभेत पाटील कुटुंबाला टार्गेट करित गोंधळ घातल्यामुळे सहकारी पक्षाच्या अनेक सदस्यांनी त्यांचे भर सभेत कान टोचले. यापूर्वी अजित पवार यांनी भर सभेत सक्षणा सलगर यांना सुनावले होते. भाषा सभ्य ठेवा व बोलताना तारतम्य बाळगा, असे सांगत पवार यांनी सलगर यांच्यावर भाष्य केले होते. सक्षणा सलगर यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली होती. तसेच नरेंद्र मोदी यांचाही एकेरी उल्लेख केला होता.

इतर बातम्या-

Mega Block : मुंबईच्या चाकरमान्यांसाठी महत्त्वाची बातमी, हार्बर लाईनवर मेगाब्लॉक जाहीर

पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर अपघात, रसायनाचा टँकर 25 फूट खोल कोसळला, ड्रायव्हरचा जागीच मृत्यू

Non Stop LIVE Update
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.