AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर अपघात, रसायनाचा टँकर 25 फूट खोल कोसळला, ड्रायव्हरचा जागीच मृत्यू

पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर टँकर कोसळून भीषण अपघात झाल्याचं समोर आलं आहे. हायवेपासून वीस ते पंचवीस फूट खाली पडल्याने  टँकर चालकाचा मृत्यू झाला. पनवेल तालुक्यातील नेवाळी टेंभोडेकडे जाणाऱ्या ब्रिजजवळ हा अपघात घडला होता.

पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर अपघात, रसायनाचा टँकर 25 फूट खोल कोसळला, ड्रायव्हरचा जागीच मृत्यू
पनवेलमध्ये टँकर अपघातImage Credit source: टीव्ही9
| Edited By: Anish Bendre | Updated on: Mar 19, 2022 | 3:17 PM
Share

रवी खरात, टीव्ही9 मराठी, पनवेल : पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवरुन (Pune Mumbai Express Way) टँकर खाली पडून भीषण अपघात (Tanker Accident) झाला. वीस ते पंचवीस फूट खाली टँकर पडल्याने चालकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना रायगड जिल्ह्यातील पनवेल (Panvel Accident) तालुक्यातील नेवाळी टेंभोडेकडे जाणाऱ्या ब्रिजजवळ घडली आहे. टँकर चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती आहे. टँकर क्रमांक MH05 AM1278 वरील चालक अरविंद यादव (वय 42 वर्ष, राहणार हाजी मलंग रोड कल्याण) पुण्याहून मुंबईच्या दिशेने एक्सप्रेस हायवेने जात होता. त्याने ताब्यातील टँकर हा रस्त्याची परिस्थिती दुर्लक्षित करून भरधाव वेगाने चालवल्याचं बोललं जात आहे.

नेमकं काय घडलं?

पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर टँकर कोसळून भीषण अपघात झाल्याचं समोर आलं आहे. हायवेपासून वीस ते पंचवीस फूट खाली पडल्याने  टँकर चालकाचा मृत्यू झाला. पनवेल तालुक्यातील नेवाळी टेंभोडेकडे जाणाऱ्या ब्रिजजवळ हा अपघात घडला होता.

ताबा सुटल्याने टँकर कोसळला

टँकर क्रमांक MH05 AM1278 वरील चालक अरविंद यादव (वय 42 वर्ष, रा. हाजी मलंग रोड कल्याण) पुण्याहून मुंबईच्या दिशेने एक्सप्रेस हायवेने जात होता. रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून त्याने टँकर भरधाव वेगाने चालवल्याचं बोललं जात आहे. चालकाचा टँकरवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती आहे.

Raigad Panvel Tanker Accident 2

पनवेलमध्ये टँकर उलटून अपघात

टँकरमध्ये रसायन भरलेले

नेवाळी टेंभोंडे ब्रिजजवळ आला असता त्याचा टॅंकरवरील ताबा सुटला. त्यानंतर टँकर 20 ते 25 फूट खाली कोसळून पलटी झाला. यात टँकर चालक अरविंद यादव यांचा जागीच मृत्यू झाला. या टँकरमध्ये रसायन भरलेले आहे. या अपघाताची नोंद खांदेश्वर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

Bus Accident | 60 प्रवाशांसह खचाखच भरलेली बस उलटली, आठ जणांचा जागीच मृत्यू

Aurangabad Accident | गंगापूर-वैजापूर रोडवर भीषण अपघात, 3 जण जागेवरच ठार

पेट्रोल पंपावरून निघाले अन् भरधाव टेम्पोखाली सापडले, लातूर जिल्ह्यात भीषण अपघात, दोन ठार, एक जखमी

Follow Us
मुंबईत भयंकर घडलं! 112 वर कॉल केला अन्...
मुंबईत भयंकर घडलं! 112 वर कॉल केला अन्... पोलिसांनीच मारहाण केल्याच्या आरोपाने मोठी खळबळ
अमित शाहांनी भर मंचावरून काँग्रेसची लाज काढली; थेट म्हणाले, जराशी...
अमित शाहांनी भर मंचावरून काँग्रेसची लाज काढली; थेट म्हणाले, जराशी तरी लाज शिल्लक असेल तर...
लातूरमधील घटना: रुग्णालयात प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू
लातूरमधील खासगी रुग्णालयात प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू, नातेवाईकांकडून निष्काळजीपणाचा आरोप
रुग्णालयातून थेट अंतरवाली सराटीत; जरांगे पाटलांच्या बैठकीत काय घडलं?
Maratha Arakshan | रुग्णालयातून थेट अंतरवाली सराटीत; जरांगे पाटलांच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
आता काय ट्र्म्प येऊन मनमाड रस्त्यांचं काम करणार का? भाजपच्या...
आता काय ट्र्म्प येऊन मनमाड रस्त्यांचं काम करणार का? भाजपच्या मिश्किल वक्तव्यावर बड्या नेत्याचा बोचरा सवाल!
भाजपचा शिवसेनेला मोठा धक्का; युतीमध्येच विश्वासू नेते...
भाजपचा शिवसेनेला मोठा धक्का; युतीमध्येच विश्वासू नेते... शिवसेना शिंदे गटात खळबळ, काय घडलं?
नाशिक कुंभमेळ्याच्या आयोजना दरम्यान मोठा ट्विस्ट; चक्क...
नाशिक कुंभमेळ्याच्या आयोजना दरम्यान मोठा ट्विस्ट; पंतप्रधान, मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांच्या फोटोसह चक्क...
डॉनाल्ड ट्रम्पमुळेच नगर-मनमाड महामार्गाचे काम रखडलं; त्याच्या सारखा...
डॉनाल्ड ट्रम्पमुळेच अहिल्यानगर-मनमाड महामार्गाचे काम रखडलं; त्याच्या सारखा वेडा... भाजप नेत्याचं विधान तुफान चर्चेत
घराच्या जाहिरातीवरून टीकेचा धनी ठरलेला भावेश राज ठाकरेंच्या भेटीला
घराच्या जाहिरातीवरून टीकेचा धनी ठरलेला भावेश कावरे तातडीने राज ठाकरेंच्या भेटीला, या बैठकीत...
आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीच आमदाराने.... ठाकरेंचे आमदारही बंड करणार?
आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीच आमदाराने.... ठाकरेंचे आमदारही पक्षाला पाठ फिरवणार? व्हिडीओ समोर येताच मोठी खळबळ