AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हा देवेंद्र फडणवीसांचा B Plan!! MIM ला घुसवून महाविकास आघाडी तोडण्याचा डाव, औरंगाबादेत Khaire यांचा आरोप

औरंगाबादः महाविकास आघाडी सरकारसोबत MIM ने निवडणूक लढवायची तयारी दर्शवली आहे. यावरून संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण आज ढवळून निघत आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी राज्यातील राजकारणातील या नव्या समीकरणाचे सूतोवाच केले. मात्र भाजप नेते देवेंद्र फडणवीसांचाच (Devendra Fadanvis) हा डाव आहे, असा थेट आरोप शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. महाविकास […]

हा देवेंद्र फडणवीसांचा B Plan!! MIM ला घुसवून महाविकास आघाडी तोडण्याचा डाव, औरंगाबादेत Khaire यांचा आरोप
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोपImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: Mar 19, 2022 | 2:20 PM
Share

औरंगाबादः महाविकास आघाडी सरकारसोबत MIM ने निवडणूक लढवायची तयारी दर्शवली आहे. यावरून संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण आज ढवळून निघत आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी राज्यातील राजकारणातील या नव्या समीकरणाचे सूतोवाच केले. मात्र भाजप नेते देवेंद्र फडणवीसांचाच (Devendra Fadanvis) हा डाव आहे, असा थेट आरोप शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार पाडण्याचे सर्व प्रयत्न फोल ठरल्यानंतर आता काय करायचे म्हणून फडणवीसांनी हा बी प्लॅन आखला आहे, यामुळे शिवसेना आक्रमक होईल, महाविकास आघाडी तुटेल, असे त्यांचे मनसुबे आहेत. पण भाजपची ही इच्छा कधीही पूर्ण होणार नाही, असं वक्तव्य चंद्रकांत खैरे यांनी केलं.

काय म्हणाले चंद्रकांत खैरे?

राजेश टोपे यांनी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांची भेट घेतली. या बैठकीत सदर प्रस्तावाची चर्चा झाल्याचं खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितलं. त्यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले,’ MIM आम्हाला देऊच शकत नाहीत. शिवसेना कधीही त्यांच्यासोबत जाणार नाहीत. संजय राऊत म्हणाले, त्याप्रमाणे जे औरंगजेबासमोर गुडघे टेकतात, त्यांच्यासोबत आम्ही जाणार नाहीत. ज्या औरंगजेबानं संभाजी महाराजांना आमच्याच औरंगाबादमधल्या सोनेरी महालात चार महिने डांबून ठेवलं होतं. आम्ही कसं सहन करणार? म्हणूनच शिवसेना प्रमुखांनी औरंगाबादचं नाव संभाजीनगर केलं. त्यामुळे ही यांची छुपी ऑफर आहे. आमचे जुने मित्र देवेंद्रजी फडणवीस यांची ही कल्पना आहे, असं वक्तव्य चंद्रकांत खैरे यांनी केलं.

देवेंद्रजींचा हा B Plan!

चंद्रकांत खैरे यांनी एमआयएमच्या या ऑफरच्या मागे देवेंद्र फडणवीस असल्याचा दावा केला. ते म्हणाले, भाजपने हे सरकार पाडण्याचे खूप प्रयत्न केले. मात्र 2024 पर्यंत काही होत नाही, असे त्यांना कळाले. आता त्यांनी 2024 ची तयारी सुरु केली आहे. पण तोपर्यंत काय करायचे, म्हणून असा प्रकार सुरु केला. एमआयएमशी त्यांचं आतून टायअप झालं असेल. अशा वक्तव्यामुळे शिवसेना आक्रमक होईल आणि आघाडी तुटेल, असा डावपेच आखला आहे. देवेंद्र फडणवीसजी खूप बुद्धीवादी आहेत. आहेत. त्यांच्याच डोक्यातील ही कल्पना आहे. त्यांचा हा बी प्लॅन आहे, असं वक्तव्य खैरे यांनी केलं.

इम्तियाज जलील यांना काय अधिकार?

महाविकास आघाडीत येण्याविषयी वक्तव्य करण्याचा खासदार इम्तियाज जलील यांना काय अधिकार आहे, असा सवाल चंद्रकांत खैरे यांनी केला. ते म्हणाले, ‘ शहरात काय काम आहे MIM चं? शहरातले मुस्लिम बांधव, बाकीचे नागरिक त्यांना कंटाळले आहेत. काम करत नाहीत म्हणून चला महाविकास आघाडीत जाऊ, असं वाटतंय त्यांना. पण त्यांना अजिबात चान्स नाही. महाविकास आघाडी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचीच राहिल. ती सतत चांगलं काम करेल, असा विश्वास चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केला.

इतर बातम्या-

शिवसेनेने हिंदुत्वाची चादर बाजूला टाकली, Uddhav Thackeray उद्या ‘आयसीस’शीही चर्चा करतील; नितेश राणेंची टीका

MIMने भाजपविरोध कृतीत दाखवावा; जयंत पाटील यांचं एमआयएमला आव्हान

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.