MIMने भाजपविरोध कृतीत दाखवावा; जयंत पाटील यांचं एमआयएमला आव्हान

MIMने भाजपविरोध कृतीत दाखवावा; जयंत पाटील यांचं एमआयएमला आव्हान
MIMने भाजपविरोध कृतीत दाखवावा; जयंत पाटील यांचं एमआयएमला आव्हान
Image Credit source: tv9 marathi

एमआयएम समविचारी पक्ष आहे का याचा अभ्यास करावा लागेल. एमआयएम समविचारी आहे असं म्हणायचं असेल तर त्यांनी भाजपला असलेला त्यांचा विरोध कृतीत दाखवला पाहिजे. उत्तर प्रदेशात सपाचा पराभव झाला.

समीर भिसे

| Edited By: भीमराव गवळी

Mar 19, 2022 | 1:58 PM

मुंबई: एमआयएम (MIM) समविचारी पक्ष आहे का याचा अभ्यास करावा लागेल. एमआयएम समविचारी आहे असं म्हणायचं असेल तर त्यांनी भाजपला असलेला त्यांचा विरोध कृतीत दाखवला पाहिजे. उत्तर प्रदेशात (uttar pradesh) सपाचा पराभव झाला. 86 मतदारसंघात दोन हजार मतांनी एमआयएमचा पराभव झाला. तिथे एमआयएमने पाच हजार मते घेतली. एमआयएममुळे हा पराभव झाला आहे. त्यांनी भाजपला मदत केली हेच स्पष्ट होत आहे. भाजप वेगवेगळ्या समाजाला उभं करून मते फोडण्याची खेळी करत असतो. त्यामुळे विरोधी पक्षांच्या समविचारी मतात फूट पडते. त्याचा विरोधी पक्षाला फटका बसतो. म्हणूनच भाजपच्या पराभवात एमआयएमला रस असेल तर त्यांनी कृती दाखवली पाहिजे, असं आव्हानच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant patil) यांनी केलं आहे.

एमआयएमचे नेते, खासदार इम्तियाज जलील यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे आघाडीचा प्रस्ताव दिला. त्यामुळे राज्यात एकच राजकीय धुळवड सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी आज मीडियाशी संवाद साधला. इम्तियाज जलील यांच्या मातोश्रीचे निधन झाले म्हणून राजेश टोपे गेले असतील. अशावेळी राजकीय चर्चा करायची नसते. टोपे यांनी ती केली नसेल याची खात्री आहे. या चर्चेबाबत काही विधान करण्याची गरज नाही. निधन झालेलं असताना जाणं आणि राजकीय चर्चा करणं ही आमची संस्कृती नाही, असं जयंत पाटील म्हणाले.

औरंगाबाद पालिकेत काय रोल आहे?

एमआयएमला भाजपची बी टीम समजलीय जातेय. त्यामुळे आम्ही आघाडीत येण्यास तयार आहोत. आता आघाडीने विचार करावा, असं इम्तियाज जलील यांनी म्हटलं होतं. त्याकडे पाटील यांचं लक्ष वेधण्यात आलं. त्यावर एमआयएम भाजपची बी टीम आहे की नाही याचा अनुभव उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात आलाय. त्यांनी प्रयत्न होता हे सिद्ध होतं आहे. ते बी टीम नसतील तर औरंगाबाद महापालिकेत त्यांचा रोल काय असेल. भाजपच्या पराभवासाठी ते उत्सुक आहेत की भाजपला मदत करणार हे पालिका निवडणुकीत कळेलचं. इम्तियाज जलील आमच्याही चांगल्या जवळचे आहेत. ते विधानसभेचे सदस्यही होते. पण टोपे यांनी त्यांच्याशी राजकीय चर्चा केली असेल असं वाटत नाही, असं ते म्हणाले.

पॉझिटिव्ह अप्रोच घेतलाय, कृतीत आणा

केवळ महाराष्ट्राच्या अनुषंगाने मी बोलत नाहीये. आम्ही देशाविषयी बोलतोय. देशभर एमआयएमने भाजप विरोधी भूमिका दाखवली तर लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतील. लोकांचा त्यांच्यावरील विश्वास उडाला आहे. जलील यांनी पॉझिटिव्ह अप्रोच घेतला आहे. तो त्यांनी कृतीत आणावा. समाजाचा विश्वास बसला पाहिजे. त्यांनी कृती करताना समविचारी पक्षासोबत बसायचं ठरवलं असेल तर त्यांच्याशी सुसंगत निर्णय घेतला पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

MIMला आघाडीत घ्यायचं की नाही हे वरिष्ठ नेते ठरवतील, राजेश टोपेंच्या विधानाने शिवसेनेची कोंडी?

शिवसेना हिरवी सेना झालीय, Sena-MIMमध्ये काहीच फरक नाही; अतुल भातखळकरांचा हल्लाबोल

VIDEO: एमआयएम महाविकास आघाडीसोबत गेली तरी फरक पडत नाही: Chandrakant Patil

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें