VIDEO: एमआयएम महाविकास आघाडीसोबत गेली तरी फरक पडत नाही: Chandrakant Patil

एमआयएम आणि महाविकास आघाडी एकत्र आली तरी काहीच फरक पडत नाही. आम्ही भ्रष्टाचाराचे कर्दनकाळ आहोत. आमची एवढी भीती निर्माण झालीय की सर्वजण एकमेकांचा हात घट्टपणे धरण्याचा प्रयत्न करत आहेत. हात घट्ट धरल्यानंतरही अपयश मिळतं हे लक्षात आल्यावर त्यांच्यात फाटाफूट होईल.

VIDEO: एमआयएम महाविकास आघाडीसोबत गेली तरी फरक पडत नाही: Chandrakant Patil
Chandrakant PatilImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 19, 2022 | 11:43 AM

कोल्हापूर: एमआयएम (MIM) आणि महाविकास आघाडी (mahavikas aghadi) एकत्र आली तरी काहीच फरक पडत नाही. आम्ही भ्रष्टाचाराचे कर्दनकाळ आहोत. आमची एवढी भीती निर्माण झालीय की सर्वजण एकमेकांचा हात घट्टपणे धरण्याचा प्रयत्न करत आहेत. हात घट्ट धरल्यानंतरही अपयश मिळतं हे लक्षात आल्यावर त्यांच्यात फाटाफूट होईल. आम्ही महाविकास आघाडीला टक्कर देण्यास समर्थ आहोत, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सांगितलं. महाविकास आघाडीबद्दलचा असंतोष निर्माण होत आहे. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण असेल आणि धनगर आरक्षण असेल या सरकारने काहीच केलं नाही. धनगरमधील ध चा सुद्धा या सरकारने अडीच वर्षात उच्चार केला नाही. शेड्यूल कास्टचं आरक्षणातील प्रमोशन असेल, शेतकरी वीज जोडणं तोडणं यावरही काहीच केलं नाही, असं सांगतानाच या सरकारने एसटी कर्मचाऱ्यांबाबत ठोस काही निर्णय घेतला नाही तर सोमवारपासून एसटीबाबत सभागृह चालू देणार नाही, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला. ते मीडियाशी संवाद साधत होते.

भाजप चोख कारभार करते. भाजपचा कारभार पारदर्शक असतो. चुकीच्या गोष्टींवर आम्ही अंकूश ठेवतो. त्यामुळे भाजप सोडून कोणीही आलं तरी चालतंय असं त्यांना वाटतं. पण आम्ही आमच्या सहयोगींसोबत त्यांच्याशी लढत देणार आहोत. कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या निवडणुकीत असं होऊ शकतं. या जागेसाठी शिवसेनेचा आग्रह होता. शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी वाट्टेल ते करायचं ठरवलं आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

आमदार नाराजच नाही, अस्वस्थ आहेत

महाविकास आघाडीतील आमदार नाराज असल्याच्या चर्चेवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. हे वास्तव आहे. आमदार नाराज आहेत. शिवसेनेच्या 25 ते 30 आमदारांनी त्यांच्यावर कसा अन्याय होतो हे सांगितलं आहे. देवेंद्र फडणवीसांनी निधीत राष्ट्रवादीला कसं झुकतं माप आहे हे दाखवून दिलं. आमदारांना दुजाभाव मिळत आहे. ते संत्रस्त आहेत. त्यामुळे बजेट सुरू असताना बसायचं नाही असं त्यांनी ठरवलं होतं. त्यामुळे धावाधाव झाली. शिवसेनेच्या आमदारांना 2 हजार कोटी जास्त द्यायचं ठरलं. घरचाच माल असल्यासारखी खिरापत वाटली. आमदार अस्वस्थ आहेत. त्यांना पाच कोटी द्या. शेतकरी मेला, त्याला काही देऊ नका. मी आमदार असलो तरी त्याची आवश्यकता कशाला. पाच कोटी देताच कशाला. आमदारांनी प्रशासनाला काम सुचवावं. पाच कोटी कशाला पन्नास कोटींची कामं सुचवा. चांगली काम सुचवा. शिवसेनेच्या आमदारांना दोन हजार कोटी रुपये रस्त्यांसाठी दिले आहेत. सर्व आटापिटा रस्त्यासाठी आहे. महाराष्ट्रात रस्त्यासाठी एवढा निधी देण्याची गरज नाही, असंही ते म्हणाले.

आमदार संपर्कात नाही

आम्ही राजू शेट्टींना सोबत येण्याचं आवाहन केलं. आम्हाला आमची पार्टी मजबूत करण्यासाठी आणि हे भ्रष्टाचारी सरकार पाडण्यासाठी आमदारांना आवाहन करण्यापासून आम्हाला कोणी बांधलेलं नाही. 25 आमदार आमच्या संपर्कात नाही. पण दोस्ती आहे. अधिवेशनात उठण बसणं आहे. पण अशा अर्थाने टचमध्ये नाहीये. 25 आमदारांचा गट केला आणि बाहेर पडतो असं नाही. त्यामुळे पंचवीस बिंचवीसने कधी सरकार होत नाही. कुणालाही डिस्क्वॉलिफिकेशन नको असतं, असंही त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

औरंगजेबाच्या कबरीसमोर गुडघे टेकणाऱ्यांसोबत आघाडी कशी होऊ शकते?, तिघात चौथा नकोच: Sanjay Raut

MIM आणि शिवसेना कसे एकत्रं येतात ते पाहावं लागेल; फडणवीसांचा घणाघात

Aurangabad मध्ये राजकीय खलबतं, MIM चे इम्तियाज जलील आणि राष्ट्रवादीचे Rajesh Tope यांची भेट, एकत्र लढण्याचे संकेत

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.