औरंगजेबाच्या कबरीसमोर गुडघे टेकणाऱ्यांसोबत आघाडी कशी होऊ शकते?, तिघात चौथा नकोच: Sanjay Raut

औरंगजेबाच्या कबरीपुढे नतमस्तक होणारे कोणीही असतील ते महाराष्ट्राचे शिवसेनेचे आणि महाराष्ट्रातील कोणत्याही राजकीय पक्षाचे आदर्श होऊ शकत नाही. त्यांच्याबरोबर कोणत्याही प्रकारची उघड किंवा छुपी आघाडी होऊ शकत नाही.

औरंगजेबाच्या कबरीसमोर गुडघे टेकणाऱ्यांसोबत आघाडी कशी होऊ शकते?, तिघात चौथा नकोच: Sanjay Raut
औरंगजेबाच्या कबरीसमोर गुडघे टेकणाऱ्यांसोबत आघाडी कशी होऊ शकते, तिघात चौथा नकोच: Sanjay Raut Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 19, 2022 | 10:56 AM

मुंबई: औरंगजेबाच्या कबरीपुढे नतमस्तक होणारे कोणीही असतील ते महाराष्ट्राचे शिवसेनेचे (Shivsena) आणि महाराष्ट्रातील कोणत्याही राजकीय पक्षाचे आदर्श होऊ शकत नाही. त्यांच्याबरोबर कोणत्याही प्रकारची उघड किंवा छुपी आघाडी होऊ शकत नाही. ज्यांची छुपी युती आहे ती त्यांना लखलाभ असो, असं सांगतानाच औरंगजेबाच्या कबरीसमोर गुडघे टेकणाऱ्यांसोबत आघाडी कशी होऊ शकते? तुम्ही विचारच कसा करू शकता? असा विचार करणंच एक आजार आहे, असं शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी सांगितलं. संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना एमआयएमसोबतच्या (MIM) आघाडीची चर्चा फेटाळून लावली. शिवसेनेने जरी एमआयएमसोबतच्या आघाडीची शक्यता फेटाळून लावली असली तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर, एमआयएमने महाविकास आघाडीला आघाडीची ऑफर दिल्याने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

शिवसेना हा शिवाजी महाराजांच्या विचारानं चालणारा पक्ष आहे. शिवाजी महाराज, संभाजी महाराज आमचे आदर्श आहेत. एखाद्या पक्षाचे नेते औरंगजेबाच्या कबरीपुढे गुडघे टेकतात आणि औरंगजेब त्यांचा आदर्श असतो. ते महाराष्ट्राचे आदर्श होऊच शकत नाहीत. ते शिवसेनेचे आदर्श होऊच शकत नाहीत. त्यामुळे एमआयएम आघाडीत येणार या अफवा आहेत. एमआयएम आणि भाजपची छुपी युती आहे. हे तुम्ही बंगाल आणि उत्तर प्रदेशातही पाहिलं आहे. जे आधीच भाजपसोबत छुप्या युतीत काम करत आहेत. त्यांच्याबरोबर महाविकास आघाडीचा कुठलाच संबंध येत नाही, असं संजय राऊत म्हणाले.

भेट झाली म्हणजे आघाडी होत नाही

एमआयएम ही भाजपची बी टीमच आहे. हे उत्तर प्रदेशात स्पष्ट झालं. बंगालमध्ये आम्ही पाहिलं. ज्यांना भाजपचा पराभव उत्तर प्रदेशात करायचा होता तर त्यांनी काळजीपूर्वक पावलं टाकायला हवी होती, असं सांगतानाच इम्तियाज जलील हे खासदार आहेत. दिल्लीत आमची त्यांच्याशी भेट होते. कुणासोबत भेट झाली म्हणजे आघाडी झाली असं होत नाही. महाराष्ट्रात तीन पक्षाचं सरकार आहे. चौथा त्यात येणार नाही. तीनच राहील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

संबंधित बातम्या:

Aurangabad | भाजपाला हरवण्यासाठी MIM महाविकास आघाडीसोबत जाण्यास तयार, Imtiaz Jaleel यांचं मोठं विधान

MIM आणि शिवसेना कसे एकत्रं येतात ते पाहावं लागेल; फडणवीसांचा घणाघात

Maharashtra News Live Update : वरळी, दादर , शिवडीचे शेकडो स्थानिक राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतिर्थावर

Non Stop LIVE Update
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.