MIM आणि शिवसेना कसे एकत्रं येतात ते पाहावं लागेल; फडणवीसांचा घणाघात

एमआयएमने (MIM) काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आघाडीची ऑफर दिली आहे. त्यामुळे एमआयएम महाविकास आघाडीत (mahavikas aghadi) येणार का? याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी टीका केली आहे.

MIM आणि शिवसेना कसे एकत्रं येतात ते पाहावं लागेल; फडणवीसांचा घणाघात
MIM आणि शिवसेना कसे एकत्रं येतात ते पाहावं लागेल; फडणवीसांचा घणाघात Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 19, 2022 | 12:22 PM

नागपूर: एमआयएमने (MIM) काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आघाडीची ऑफर दिली आहे. त्यामुळे एमआयएम महाविकास आघाडीत (mahavikas aghadi) येणार का? याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी टीका केली आहे. एमआयएमने त्यांच्यासोबत जावं. ते शेवटी एकच आहेत. भाजपला हरवण्या करता सर्व एकत्रित येण्याचा प्रयत्न करत आहेत. सत्तेसाठी ते काय करत आहेत ते पाहू. शिवसेनेने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे स्वीकारलेलं आहे. अजानची स्पर्धाही त्यांनी घेतलेली आहे. त्याचा परिणाम आहे का बघू. शिवसेना आणि एमआयएम कसे एकत्रं येतात ते पाहू, असा चिमटा देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. मीडियाशी संवाद साधताना फडणवीस यांनी शिवसेनेला टोले लगावले आहेत.

लोकांचा मोदींवर विश्वास आहे. मोदींना पाहून लोक मतदान करतात. विकासाला मतदान करतात. हे लोक एकत्रं आले तरी काही फरक पडणार नाही. शिवसेना आणि एमआयएम कसे एकत्रं येतात ते पाहावं लागेल. जे लोक अजानची स्पर्धा घेऊ शकतात ते काहीही करू शकतात, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

जेलमध्ये असताना मंत्रिपद कसे?

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याकडील खाती काढून घेण्यात आली आहेत. त्यांना बिनखात्याचे मंत्री करण्यात आले आहे. त्यामुळे भाजपची 50 टक्के मागणी मान्य झालीय का? असा सवाल करण्यात आला. त्यावर 50 टक्के मागणी स्वीकारून फायदा नाही. शेवटी संवैधानिक पदावर असलेला व्यक्ती जेलमध्ये असताना त्यांनी पदावर राहणं योग्य नाही, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

राजू शेट्टींबाबत चर्चा झाली नाही

शेतकरी नेते राजू शेट्टी भाजपसोबत येणार का? असा सवालही त्यांनी करण्यात आला. त्यावर माझी याबाबत चर्चा झाली नाही. राजू शेट्टी आमच्यासोबत होते. काही कारणाने ते पलिकडे गेले. सोबत कोण येणार, नाही येणार हे प्रत्यक्ष कळल्याशिवाय त्यावर प्रतिक्रिया देणं योग्य नाही. मोदींनी जेवढे निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचे घेतले तेवढे कोणी घेतले नाही. साखर कारखानदारीबाबत जे निर्णय घेतले ते कोणीच घेतले नाही. त्याचा विचार शेतकरी नेत्यांनी केला पाहिजे, असंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

Aurangabad | भाजपाला हरवण्यासाठी MIM महाविकास आघाडीसोबत जाण्यास तयार, Imtiaz Jaleel यांचं मोठं विधान

Medical कॉलेजचा पदव्युत्तर अभ्यासक्रम यावर्षी होणार सुरू; राज्यभरातील विद्यार्थ्यांना सुखद धक्का!

नाशिकमधील Corona निर्बंध मागे; कधीपासून अंमलबजावणी, पालकमंत्री भुजबळांनी काय दिले निर्देश?

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.