AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Supriya Sule : रेवती आणि सारंग विवाहबद्ध होणार… सुप्रिया सुळेंनी दिली गुड न्यूज; भावी जावयाचे फोटोही केले शेअर

Supriya Sule Daughter Revati Marriage : सुप्रिया सुळे यांच्या लेकीचं, रेवती हिचं लग्न ठरल्याची बातमी काल समोर आली आणि पाहता पाहता व्हायरल झाली. सुप्रिया सुळेंच्या जवळच्या मैत्रिणीने फोटो पोस्ट केल्यावर ही बतमी समोर आली होती. आता खुद्द सुप्रिया सुळे यांनीच एक पोस्ट करत गुड न्यूज शेअर केली आहे. त्यांनी भावी जावयाचे काही फोटोही शेअर केलेत.

Supriya Sule : रेवती आणि सारंग विवाहबद्ध होणार... सुप्रिया सुळेंनी दिली गुड न्यूज; भावी जावयाचे फोटोही केले शेअर
सुप्रिया सुळे यांनी शेअर केली लेकीच्या लग्नाची गुड न्यूजImage Credit source: Instagram
| Updated on: Feb 11, 2026 | 10:49 AM
Share

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची नात रेवती सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांची लेक असलेल्या रेवतीचं लवकरच ‘शुभमंगल’ होणार आहे. रेवती सुळे हिचं वागपूरच्या सारंग लखानीशई लग्न ठरल्याची बातमी कलाच समोर आली होती आणि पाहता पाहता ती व्हायरल झाली. सुप्रिया सुळे यांची मैत्रीण, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांची मुलगी स्मृती शिंदे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट करत लग्न ठरल्याची बातमी शेअर केली होती. तेव्हापासून रेवती सुळे ही स्पॉटलाइटमध्ये आहे. पण पवार किंवा सुळे कुटुंबाकडून याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती.

सुप्रिया सुळे यांची पोस्टद्वारे अधिकृत माहिती

मात्र आता खुद्द वधू माय, म्हणजेच सुप्रिया सुळे यांनीच अधिकृत पोस्ट करत ही गुड न्यूज सर्वांसोबत शेअर केल आहे. सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर रेवती आणि सारंग यांचा फोटो टाकत त्यांचा विवाह ठरल्याची माहिती सर्वांना दिली. त्याोबतच त्यांनी सारंग लखानी यांचे काही फोटोही शेअर केले आहेत. ‘ अतिशय आनंदाने आम्ही हे सांगू इच्छितो की आमची लेक रेवती हिचं वंदना आणि अरूण लखानी यांच्या मुलाशी, सारंगशी लग्न ठरलं आहे’ अशी कॅप्शन लिहीत सुप्रिया सुळे यांनी थोड्या वेळापूर्वीच ही पोस्ट शेअर केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Supriya Sule (@supriyasule)

त्यासोबतच सुप्रिया यांनी रेवती-सारंग यांचे काही फोटो, तसेच सारंगचा त्याच्या वडिलांसोबतचा फोटो, असे फोटोही शेअर केले आहेत. त्यांच्या या पोस्टवर अवघ्या काही क्षणात हजारो लाईक्स आले असून कमेंट्समधून अभिनंदनाचा वर्षाव झाला आहे.

कोण आहे सारंग लखानी ?

शरद पवार यांचे होणारे नातजावई, रेवती हिचा होणारा पती सारंग लखानी हा मूळचा नागपूरचा आहे. व्यवसायिक आणि उत्तम बॅडमिंटनपटू तथा विश्वराज ग्रुपचे अध्यक्ष अरुण लखानी यांचे ते पुत्र आहेत. सारंग हेही एक उत्तम बॅडमिंटनपटू आहेत अशी माहिती समोर आली आहे.  विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने लग्न ठरल्याची माहिती देखील समोर आली होती. रेवती व सारंगंच लग्न ठरल्यावर चहूकडून अभिनंदन करत या जोडप्याला षशुभेच्छाही देण्यात येत आहेत.

Follow Us
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?...
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?; फडणवीसांची राज्यपालांकडे मोठी शिफारस, काय आहे मागणी?
उपमुख्यमंत्री शिंदेंचा दिल्ली दौरा, मोदींसोबत भेट; नेमकं काय शिजतंय?
Eknath Shinde in Delhi : उपमुख्यमंत्री शिंदेंचा दिल्ली दौरा, मोदींसोबत भेट; विधानपरिषद निवडणुकीआधी महत्त्वाच्या भेटीगाठी, नेमकं काय शिजतंय?
भाजप उमेदवाराचा अर्ज दाखल; पण मित्रपक्षांच्या नेत्यांनी फिरवली पाठ...
Vidhan Parishad Election : भाजप उमेदवाराचा अर्ज दाखल; पण मित्रपक्षांच्या नेत्यांनी फिरवली पाठ, महायुतीत नेमकं काय सुरू?
मविआत ठरलं नाही अन् ठाकरे गटाने उमेदवार उतरवला; काँग्रेस-उबाठा...
Vidhan Parishad Election : मविआत ठरलं नाही अन् ठाकरे गटाने उमेदवार उतरवला; अमरावतीत काँग्रेस-उबाठा आमनेसामने
एल निनोचा धोका, सरकारचा मास्टर प्लॅन नेमका काय?
Maharashtra Drought : एल निनोचा धोका, महाराष्ट्रात पाण्याचं मायक्रो प्लॅनिंग; सरकारचा मास्टर प्लॅन नेमका काय?
कर्जमाफीवर संजय शिरसाटांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, एकही शेतकरी....
Sanjay Shirsat : कर्जमाफीवर संजय शिरसाटांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, एकही शेतकरी....
फुटीरवादी नेत्यांमुळे आंबेडकरी चळवळीचं नुकसान; सचिन खरातांचा....
Sachin Kharat On Abhijeet Dipake : फुटीरवादी नेत्यांमुळे आंबेडकरी चळवळीचं नुकसान; सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर थेट निशाणा, पण खरात असं का म्हणाले?
कोल्हापूर अंबाबाई मंदिरात आज दिवसभर देवीच्या मूर्तीचे दर्शन बंद
कोल्हापूर अंबाबाई मंदिरात आज दिवसभर देवीच्या मूर्तीचे दर्शन बंद
जिल्हा बँक निवडणुकीत राम शिंदेंचा मोठा निर्णय; म्हणाले, पदाची निष्पक्ष
Ahilyanagar Election : जिल्हा बँक निवडणुकीत राम शिंदेंचा मोठा निर्णय; म्हणाले, पदाची निष्पक्षता जपण्यासाठी...
राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला; आदित्य यांच्या पासपोर्ट जप्तीची मागणी
राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला; आदित्य यांच्या पासपोर्ट जप्तीची मागणी