Maharashtra News Live Update : बीडचा बिहार झाल्याचं आमदारांनी सांगितलं : पंकजा मुंडे

| Updated on: Mar 19, 2022 | 11:12 PM

Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra News Live Update : बीडचा बिहार झाल्याचं आमदारांनी सांगितलं : पंकजा मुंडे
बातम्यांचे सर्वात वेगवान अपडेट्सImage Credit source: tv9

मुंबई : आज शनिवार 19 मार्च 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. पुणे महापालिकेतील समाविष्ट गावामधील अनधिकृत बांधकामावर पीएम आरडीए उचलणार हातोडा, 31 मार्च 2020 पर्यंत झालेली बांधकाम नकाशावर दाखवणं बंधनकारक, ग्रामपंचायत दफ्तरात नोंद असून चालणार नाही, नकाशावर बांधकाम नसल्यास पडणार हातोडा, पीएम आरडीएनं घेतला निर्णय

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 19 Mar 2022 09:23 PM (IST)

    आमदार गिरीश महाजन यांच्या कन्येच्या विवाह प्रसंगी मंत्र्यांचे दौरे

    माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या कन्येच्या विवाह प्रसंगी मंत्र्यांचे दौरे

    देवेंद्र फडणवीस सायंकाळी पाच वाजता जामनेर येथे आगमन.

    नारायण राणे सकाळी 11 वाजता जामनेर येथे आगमन

    अमित देशमुख सकाळी सव्वाअकरा वाजता जामनेर येथे आगमन.

    कपिल पाटील सायंकाळी सात वाजून 40 मिनिटांनी जामनेर येथे आगमन.

    भारती पवार सकाळी 12 वाजता जामनेर येथे आगमन.

    नितीन गडकरी चार वाजता जामनेर येथे आगमन.

  • 19 Mar 2022 08:30 PM (IST)

    वाशिम शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील ट्रान्स्फर च्या वितरण बॉक्सला आग….

    वाशिम शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील ट्रान्स्फर च्या वितरण बॉक्सला आग….

    या आगीमुळे चौकातील नागरिकांची एकच धावपळ…

    आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी महावितरण कर्मचारी व अग्निशमन दलाच्या सतर्क तेने खूप मोठा अनर्थ टळला…

    चौकात पोलीस चौकीसह आसपास लहान-लहान दुकाने असून या भागात संध्याकाळी खूपच गर्दी असते हा शहरातील वर्दळीचा चौक…

    ट्रान्सफर च्या वितरण बॉक्सच्या केबलमध्ये शाॅर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती…

  • 19 Mar 2022 04:55 PM (IST)

    पावसात भिजल्याने  निवडणुका जिंकता येतं हे नवीन शास्त्र लोकांसाठी आश्चर्यजनक : सुधीर मुनगंटीवार

    पावसात भिजल्याने  निवडणुका जिंकता येतं हे नवीन शास्त्र लोकांसाठी आश्चर्यजनक आहे.

    आपल्या राज्यामध्ये अंकगणित अतिशय उत्तम पणे अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत.

    पण दुर्दैवाने त्यांचे सामान्यज्ञान काही लोक बिघडवत असल्याची टीका भाजपनेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

    आघाडीमध्ये जर आपण काँग्रेसचे आमदार 44 एकत्र केले 98 आमदारसंख्या होते.

    पावसात भिजल्याने सत्ता आली असं म्हणणं गैर आहे. शिवसेना आमच्या सोबत होती त्या शिवसेने बेईमानी केली. त्याचा पावसाची काय संबंध असा सवाल त्यांनी विचारला.

    पावसात भिजल्याने जर सत्ता येत असेल त्यांनी रोज पावसामध्ये स्वतः भिजावे असा टोला मुनगंटीवार यांनी लगावला.

  • 19 Mar 2022 04:40 PM (IST)

    बीडचा बिहार झाल्याचं आमदारांनी सांगितलं : पंकजा मुंडे

    बीडचा बिहार झाल्याचं आमदारांनी सांगितलं

    बीडमध्ये गेल्यावर अधिक माहिती घेणार

    बीडची काय अवस्था झालीय सांगायला नको

    पंकजा मुंडे यांचा धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा

    महाविकास आघाडीत कुणी जायचं हा त्यांचा निर्णय

  • 19 Mar 2022 04:15 PM (IST)

    सरकारला विलीनीकरण द्यावं लागेल, शरद पवार जरी आडवे आले तरी आम्ही विलीनीकरण घेऊन राहू: सदावर्ते

    - जयंत पाटील यांनी काय शक्य आहे ते सांगावं… 100 एकर जमीन, परिवहन मंत्री त्यांचा रिसाॅर्ट, हे शक्य आहे का?

    - चंद्रकांत पाटील असतील किंवा इतर कुणी असतील त्यांनी लोकशाहीसाठी एसटी कर्मचाऱ्यांची बाजू मांडत आहेत,

    - कुठे आहेत परिवहन मंत्री… त्यांचा रिसाॅर्ट आणि घरे…

    - जी कमिटी होती त्यावर काही बोलणं झालं नाही… कमिटीला धोका दिला…

    - विलीनीकरण द्यावं लागेल, शरद पवार जरी आडवे आले तरी आम्ही विलीनीकरण घेऊन राहू, जे आडवे येतील त्यांच्यावर इडी कारवाई होईल अशी अपेक्षा…

  • 19 Mar 2022 03:25 PM (IST)

    महाविकास आघाडी म्हणून आम्ही कोल्हापूर उत्तरची निवडणूक लढवतोय : सतेज पाटील

    महाविकास आघाडी म्हणून आम्ही कोल्हापूर उत्तरची निवडणूक लढवतोय

    काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन निवडणुकीला सामोरे जातोय

    स्वर्गीय चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांच्या नावाबद्दल आम्ही वरिष्ठांना कळवलं आहे

    भाजपने आयात उमेदवार दिला आहे, हे जनतेला माहीत आहे

    निवडून येणारा आमदार हा महाविकास आघाडी सरकारचा असेल

    मुख्यमंत्री जो निर्णय देतील तो आम्हाला मान्य आहे, तो शिवसेनेला देखील मान्य असेल

  • 19 Mar 2022 01:34 PM (IST)

    संपूर्ण महाराष्ट्रात 23 तारखेला मराठा बांधव खंजीर दिवस साजरा करणार

    संपूर्ण महाराष्ट्रात 23 तारखेला मराठा बांधव खंजीर दिवस साजरा करणार

    शरद पवारांनी 23 मार्च 1994 ला ओबीसींच 14 टक्के असलेलं आरक्षण हे 30 टक्के केलं

    यामागे कोणताही आयोग किंवा समिती नेमली नाही तसंच आरक्षण मर्यादा वाढवली

    50 टक्क्यांच्या आतचं मराठ्यांना आरक्षण मिळू शकतं जिथं गमावलं तिथंच आम्ही हे शोधणार

    23 मार्चला शरद पवारांच्या आणि चंद्रकांत पाटलांच्या घराबाहेर आंदोलन करणार

    योगेश केदार यांची माहिती

  • 19 Mar 2022 01:33 PM (IST)

    दारूच्या नशेत घरात घुसून महिलेची छेड काढणा-या बेवड्याला बेदम चोप

    नालासोपारा:- दारूच्या नशेत घरात घुसून महिलेची छेड काढणा-या बेवड्याला बेदम चोप देत असल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

    नालासोपारा पूर्व संतोषभूवन पेट्रोल पंप च्या पाठीमागील बावशेत पाडा रोडवरील चाळीतील आज दुपारी 12 च्या सुमारास ची ही घटना आहे..

    बेवाड्याने विवाहित महिलेची साडी ओडून घट्ट पकडून ठेवली होती. महिलेने साडी सोडून घेण्याचा प्रयत्न केला पण तरीही बेवडा काही सोडत नाही.. तेव्हा आजूबाजूचे लहान मूल, मुली, शेजारी यांनी त्याला खाली पाडून, चप्पल, लाथा बुक्या, झाडून बेदम चोप देऊन महिलेची सुटका करून घेतली आहे..

    या घटनेमुळे चाळ, झोपडपट्टी मधील महिला किती असुरक्षित असून, बेवाड्याचा कसा सामना करावा लागत आहे हे समोर आले आहे..

    या बेवड्याना आळा घालण्यासाठी पोलीस काय कारवाही करतात की त्यांना मोकाट सोडतात हे पाहणे गरजेचे आहे

  • 19 Mar 2022 01:32 PM (IST)

    हिंदुत्वाची चादर बाजूला टाकून शिवसेना स्वतःला सेक्युर म्हणवून घेण्याचे काम शिवसेना करते - नितेश राणे

    एमआयएम हा कट्टरवादी पक्ष आहे,टोकाची भूमिका घेतो.ज्या पद्धतीने शिवसेना अजाणची स्पर्धा असो,टिपू सुलतानच्या नावाचा गवगवा असो. एकंदरीत हिंदुत्वाची चादर बाजूला टाकून शिवसेना स्वतःला सेक्युर म्हणवून घेण्याचे काम शिवसेना करते आहे.अगर एका एमआयएम कट्टरवादी पक्षाला तुम्ही हवेहवेसे वाटता उद्या तुम्ही आयसीसला ही आवडणार.आता आयसीस बरोबर चर्चा करण्याचे एवढेच राहिलं आहे.उद्या उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत बोलतील की आम्ही आयसीस बरोबर चर्चा करायला अफगाणिस्तानला चाललोय....एवढंच राहिलेलं आहे.करून दाखवलं याचा खरा अर्थ आज शिवसेनेने महाराष्ट्रासमोर करून दाखवला आहे.

  • 19 Mar 2022 01:30 PM (IST)

    शिवसेना जिल्हाप्रमुख आजी-माजी नगरसेवकांची बैठक शिवसेना भवनात

    शिवसेना भवन इथ शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, संजय राऊत तसच महाराष्ट्रातील जिल्हाप्रमुख आजी माजी नगरसेवक यांची बैठक होणार

    बैठकीत विदर्भात जाऊन खासदार, आमदार, यांनी गेल्या अडीच वर्षात शिवसेना पक्षाने राज्यात काय काम केले याबाबत लोकांना माहिती देण्यासाठी विदर्भ दौरा करणार असून त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या इतर विभागांमध्ये खासदार-आमदार हे जाऊन जनतेशी संवाद साधणार आहेत त्या संदर्भात वरील बैठक उद्या अकरा वाजता( 11 वाजता) सेनाभवन इथ आयोजित केली आहे

  • 19 Mar 2022 01:28 PM (IST)

    MIM महाविकास सरकार पाडण्यासाठी आहे - चंद्रकांत खैरे

    MIM सरकार पाडण्यासाठी - चंद्रकांत खैरे

    सरकारला पाडण्यासाठी हा फडणवीसांचा प्लॅन आहे -

    जयंत पाटलांनी योग्य सांगितलं आहे

    MIM आम्हाला रोजचा अनुभव आहे

    औरंगाबादमध्ये किती त्रास आहे हे आम्हाला माहित आहे

    महाविकास आघाडीचे मुस्लिम नेते त्यांना येऊ देत नाही.

    खरं म्हणजे आमचे जुने मित्र, फडणवीसांनी योग्य उल्लेख

  • 19 Mar 2022 01:22 PM (IST)

    आत्तापर्यंत एमआयएमचा अनुभव महाराष्ट्रात आणि उत्तरप्रदेशात पाहायला मिळाला आहे - जयंत पाटील

    राजेश टोपे आरोग्य मंत्री त्यांच्याकडे गेले होते

    आत्तापर्यंत एमआयएमचा अनुभव महाराष्ट्रात आणि उत्तरप्रदेशात पाहायला मिळाला आहे.

    औरंगाबादमधली राजकीय परिस्थिती सगळ्यांना माहित आहे

    राजेश टोपे यांनी त्यांच्याशी चर्चा केली असेल असं वाटतं नाही

    अतुल भातखळकरांना ते काय म्हणाले हे त्यांना विचारा त्यातून काय बोध होत नाही

    एमआयएम समविचारी आहे असं म्हणत असेल, तर त्यांनी ते कृतीतून दाखवून द्यावं प्रत्यक्षकृती दाखवावं

    उत्तरप्रदेशात एमआयएमच्या मदतीमुळे भाजपाचा विजय

    आम्ही देशाचा विचार करतो

    त्यांच्या पक्षावरती असलेला विश्वास कमी झाला आहे.

    राऊतांचं हे वैयक्तीक मत आहे

    सगळ्या नेत्यांना योग्य निधी दिला आहे

    नवाब मलिकांचा राजीनामा घेण्याचं अद्याप निश्चित नाही

  • 19 Mar 2022 01:07 PM (IST)

    जागतिक पातळीवर रुग्ण वाढल्यानंतर पुन्हा तातडीची बैठक घेण्यात आली - भारती पवार

    - जागतिक पातळीवर रुग्ण वाढल्यानंतर पुन्हा तातडीची बैठक घेण्यात आली

    - आशियाई देशांमध्ये प्रमाण वाढलेलं होतं

    -धोका टळलेला नाही

    - काही वेगळे सिम्टम्स सापडल्यास लक्ष देण्याच्या राज्यांना सूचना

    - सणाच्या दिवसांमध्ये टेस्टिंग ट्रेकिंग आणि लसीकरणावर भर देण्यासंदर्भात राज्यांना सूचना करण्यात आली आहे

    - भारतामध्ये रुग्णांची संख्या कमी

    - तिसरी लाट कमी करण्यासंदर्भात राज्य आणि केंद्र सरकार प्रयत्नशील

    - मात्र महाराष्ट्र केरळ इथली रुग्णसंख्या अद्यापही आहेत

    - यासंदर्भात केंद्राकडून सातत्याने आढावा घेतला जातो आहे

    - सतर्क राहणं सर्वाधिक आवश्यक

    - ओमीक्रोन चा धोका अजुनही ठरलेला नाही त्यामुळे काळजी घेणं अत्यावश्यक

  • 19 Mar 2022 12:37 PM (IST)

    प्रसाद लाड यांची संजय राऊतांवर टिका

    - संजय राऊतांनी सेना संपवण्याचा वीडाच ऊचलला आहे…

    - शिवसेनेनं एमआयएमला बरोबर घ्यावं याहून वाईट काहीच नसू शकतं..

    - सत्तेसाठी शिवसेना हिदुत्व सोडण्याच्या मागावर…

  • 19 Mar 2022 12:35 PM (IST)

    भाजपचेच 25 आमदार महाविकास आघाडीच्या संपर्कात - सत्तार

    भाजपचेच 25 आमदार महाविकास आघाडीच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलाय. ते जालन्यात बोलत होते. काल रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडीतील 25 नाराज आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचं म्हटलं होतं यावर उत्तर देताना भाजपचेच आमदार नाराज असून त्यांचे 25 आमदार फुटू नये दानवे खोटं बोलत असल्याचं सांगत भाजपचेच 25 नाराज आमदार महाविकास आघाडीत प्रवेश करणार असल्याचे सत्तार म्हणाले.

  • 19 Mar 2022 12:18 PM (IST)

    तुम्हाला औरंगजेबाच्या कबरीपुढे झुकणारे अब्दुल सत्तार चालतात - खासदार इम्तियाज जलील

    आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत (Mahavikas Aghadi) जाण्याची तयारी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी दर्शवली आहे. त्यावर संजय राऊत यांनी अतिशय तीव्र विरोध दर्शवला. औरंगजेबाच्या कबरीपुढे गुडघे टेकणाऱ्यांसोबत आम्ही जाणार नाही, असं वक्तव्य संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलंय. त्याला उत्तर देताना खासदार इम्तियाज जलील यांनी शिवसेनेला प्रश्न विचारला. तुम्हाला औरंगजेबाच्या कबरीपुढे झुकणारे अब्दुल सत्तार चालतात. मग एमआयएम का नकोय? एवढीच हिंमत असेल तर तुम्हाला मुस्लीम मते नकोयत, असे स्पष्ट सांगा, असे आव्हान खासदार जलील (Imtiaz Jaleel) यांनी शिवसेनेला दिले आहे. स्वबळावर लढण्याची तुमची तयारी आहे का? तुम्हाला राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या कुबड्या घेऊन चालयचे आहे, असा टोलाही खासदार जलील यांनी लगावला.

  • 19 Mar 2022 12:17 PM (IST)

    नांदगाव पोलिस स्टेशन समोर दोन गटांत हाणामारी.

    नांदगाव पोलिस स्टेशन समोर दोन गटांत हाणामारी..

    कौटुंबिक वादातून दोन गटांत हाणामारी..

    नंदगावच्या अस्वलदऱ्यातील दोन गटांचा समावेश..

    एक महिला जखमी..

    नांदगाव येथे दोन गटात कौटुंबिक वादातून तुंबळ हाणामारी झाली असून या हाणामारीत एक महिला गंभीर गंभीर जखमी झाली असून, पोलिस ठाण्याबाहेरच हाणामारी झाल्याने बघ्यांची गर्दी झाली होती.

  • 19 Mar 2022 11:57 AM (IST)

    एमआयएमला महाविकास आघाडीत घ्यायचं की नाही याचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील: राजेश टोपे

    एमआयएमला महाविकास आघाडीत घ्यायचं की नाही याचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ते जालन्यात बोलत होते. जलील यांनी अनौपचारिक गप्पा मारताना माझ्याकडे महाविकास आघाडीत येण्याचा प्रस्ताव ठेवला असंही ते म्हणाले. मुस्लिम बहुल समाजाचे प्रश्न सोडवणाऱ्या पक्षां सोबत आम्ही यायला तयार आहोत असंही जलील यांनी प्रस्ताव ठेवताना सांगितलयाचं टोपे म्हणाले.

  • 19 Mar 2022 11:56 AM (IST)

    चीन आणि इतर युरोपीय देशातील वाढती रुग्णसंख्या पाहता चौथी लाट येण्याची शक्यता

    चीन आणि इतर युरोपीय देशातील वाढती रुग्णसंख्या पाहता चौथी लाट येण्याचा शक्यता

    जगभरात इतर देशात रुग्णसंख्या ही 8 टक्क्यांनी वाढली आहे

    मात्र हा ओमिक्रॉन B 1ची लाट आपल्या देशात येऊन गेली आहे

    ओमिक्रॉन B 1 सारखाच याच्या प्रसाराचा वेग हा जास्त आहे

    त्यामुळे रुग्णसंख्या वाढवणं गरजेचं आहे..

    वयोवृद्ध व्यक्तींना याची बाधा होण्याची शक्यता जास्त आहे

    त्यामुळे सोयीसुविधा बंद होतायेत त्या पुन्हा तयार ठेवा

    आय एम ए चे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांचा सल्ला !

  • 19 Mar 2022 11:55 AM (IST)

    स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर धडकले

    स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर धडकले

    बँकेच्या बंद केलेल्या गेटवर चढून गेट उघडण्यासाठी बोंबाबोब आंदोलन केले सुरू

    गेटवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

    शेतकऱ्यां कडून घोषणाबाजी ला सुरवात

  • 19 Mar 2022 11:51 AM (IST)

    पराभव झाल्याने संजय राऊत आमच्यावर कापर फोडत आहेत - इम्तियाज जलील

    पराभव झाल्याने संजय राऊत आमच्यावर कापर फोडत आहेत

    मी महाविकास आघाडीला थेट ऑफर देतोय

    आमची एकला चलो रे ची भूमिका आहे

    आम्ही एकटे लढू

    तुम्ही राजकारणासाठी शिवाजी महाराजांचा, संभाजी महाराजांचा उपयोग केला

    मला संजय राऊतांना एक पुस्तक द्यायचं आहे

    काही नेत्यांना पुस्तक वाचायला येत नाही, त्यांना समजून सांगण्याची माझी तयारी आहे

    उत्तर प्रदेशात एकही मुस्लिम उमेदवार नव्हता.

    आम्हालासोबत घ्या, मग पाहा काय होतंय

  • 19 Mar 2022 11:46 AM (IST)

    चिंतामणी माळी यांचे निधन

    आगरी समाजाचे नेते, आरपीआयचे खजिनदार आणि बोरिवलीचे गोल्डन मॅन म्हणून प्रसिद्ध असलेल्या चिंतामणी माळी यांचे निधन झाले.

  • 19 Mar 2022 11:45 AM (IST)

    भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते वेगवेगळे भविष्य वर्तवित असतात - एकनाथ खडसे

    भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते वेगवेगळे भविष्य वर्तवित असतात

    चंद्रकांत दादांनी तर अनेक तारखा दिल्या मात्र त्या तारखा मागे गेल्या

    रावसाहेब दानवे म्हणतात अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत

    दानवे हे फक्त स्वप्न पाहत आहेत

    दानवे यांच्या फक्त मनोरंजनाच्या गप्पा आहे

    आता कोणत्याही आमदाराची पक्ष बदलण्याची मनस्थिती नाही

    एकनाथ खडसे यांचा चंद्रकांत दादा पाटील रावसाहेब दानवे यांना टोला

  • 19 Mar 2022 11:36 AM (IST)

    कर्नाटकमध्ये बस पलटी झाल्याने आठजण ठार, प्रवाशांमध्ये विद्यार्थ्यांचा समावेश

    बस पलटी होऊन भीषण अपघात

    तुमकूर जिल्ह्यातील पावागडाजवळ अपघात

    बस पलटी झाल्याने आठ जण ठार

    २० हून अधिक प्रवाशी गंभीर जखमी

    तुमकूर पोलीस घटनास्थळी दाखल

    प्रवाशांमध्ये विद्यार्थ्यांचा समावेश

  • 19 Mar 2022 11:04 AM (IST)

    पुण्यातील एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराची खळबळजनक घटना

    - पुण्यातील एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराची खळबळजनक घटना,

    - वडील आणि भावानेच केला बलात्कार,

    - शिवाय मामांकडूनही झालेत मुलीवर लैंगिक अत्याचार,

    - यासंदर्भात पुण्यातील बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल,

    - पीडित मुलगी मूळची बिहारची असून पुण्यात शिक्षणासाठी आली आहे

  • 19 Mar 2022 11:03 AM (IST)

    युक्रेन गोळीबार नवीन शेखरआप्पा मृत्यू प्रकरण

    युक्रेन गोळीबार नवीन शेखरआप्पा मृत्यू प्रकरण

    नवीनचा मृतदेह 21 तारखेला भारतात आणला जाणार

    मृतदेह येण्यापूर्वी कुटुंबीयांनी घेतला मोठा निर्णय

    नवीनचा मृतदेह अंत्यसंस्कारानंतर अवयवदान अंतर्गत वैद्यकीय महाविद्यालयाला दिला जाणार

    21 मार्चला दुपारी 3 वाजता बंगळुरूमध्ये नवीनचा मृतदेह पोहोचणार

    गोळीबारात नवीनचा दुर्दैवी मृत्यू

    मेडिकल स्टूडंट असलेल्या नवीनच्या कुटुंबियांचा मोठा निर्णय

    दावणगिरी मध्ये मेडिकल कॉलेजला मृतदेह दान करण्याचा मोठा निर्णय

  • 19 Mar 2022 11:03 AM (IST)

    बैलगाडी शर्यतीचा रंगणार थरार

    महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या तुळजापूर येथे बैलगाडा शर्यतीचा थरार अवघ्या काही तासात रंगणार आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात पहिल्यांदा बैलगाडी शर्यत आयोजित केल्याने शेतकरी, बैल गाडी मालक यांच्यात उत्साह आहे.शिवबा राजे प्रतिष्ठान यांच्या वतीने या स्पर्धा आयोजित केल्या असून या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून शेतकरी सहभागी झाले आहेत. बैल व गाडी सह शेतकरी दाखल झाले असून स्पर्धा रंगणार आहेत याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संतोष जाधव यांनी

  • 19 Mar 2022 10:25 AM (IST)

    राजू शेट्टीबाबत माझी काही चर्चा झाली नाही - देवेंद्र फडणवीस

    - राजू शेट्टी बाबात माझी काही चर्चा झाली नाही. मुळात राजू शेट्टी आमच्यासोबत होते. काही कारनाने ते पलिकडे गेले. सोबत येणार की नाही? प्रत्यक्ष कळल्याशिवाय प्रतिक्रिया देणं योग्य नाही.

    -एकंच अपेक्षा आहे. मागच्या काळात जेवढे शेतकरी हिताचे निर्णय मोदीजींनी घेतले, तेवढे कुणीच घेतले नाही. साखर कारखानदारी, ऊस उत्पादकांसाठी मोदीजींनी अनेक निर्णय झाले. पण अद्याप राजू शेटी आणि माझी चर्चा झाली नाही.

  • 19 Mar 2022 10:22 AM (IST)

    MIM राष्ट्रवादीसोबत आल्यावर शिवसेना काय करणार? याकडे आमचं लक्ष असेल - देवेंद्र फडणवीस

    - MIM ने जरूर राष्ट्रवादीसोबत जावं, कारण शेवटी ते एकंच आहे.

    - भाजपला हरवण्यासाठी सर्व एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहेत. पण सर्व एकत्र आले तरिही भारतातील जनता, महाराष्ट्रातील जनता मोदीजींच्या मागे आणि ती भाजपला निवडून देईल.

    - MIM राष्ट्रवादीसोबत आल्यावर शिवसेना काय करणार? याकडे आमचं लक्ष असेल

    - ते हारले की त्यांना इव्हीएम दिसते, बी टीम दिसते. हारल्यानंतर ते असं बोलत असतात. त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही

    - आम्ही पाहतोय, सत्ते करता शिवसेना काय करतात ते? तसंही हिंदूहृदयसंम्राट बाळासाहेब ठाकरे ऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे केलंय, आणि अजानची स्पर्धा वैगेरे चाललीय. त्याचा परिणाम आहे का काय ते बघू

  • 19 Mar 2022 10:21 AM (IST)

    वरळी, दादर , शिवडीचे शेकडो स्थानिक राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतिर्थावर पोहोचले

    वरळी, दादर , शिवडीचे शेकडो स्थानिक राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतिर्थावर पोहोचले…

    - काही वेळात राज ठाकरे यांची घेणार भेट…

    - २०० ते ३०० लोक राज ठाकरेंच्या भेटीला…

    - नाव्हा शेवडी प्रकल्पात आमची घरे खिळखिळीत होत आहेत… त्यामुळे क्लस्टर अंतर्गत आमचा विकास करावा ही प्रमुख मागणी…

  • 19 Mar 2022 10:17 AM (IST)

    रावसाहेब दानवे यांना कदाचित 125 बोलायचं असेल

    रावसाहेब दानवे यांना कदाचित 125 बोलायचं असेल स्लीप आँफ टंग झाली असेल घ्या ना थांबला कशाला होळी संपली आहे कालची नशा उतरली असेल काल काय बोललो हे त्यांना आज आठवणार नाही आम्ही अस बोललो तर तुमचे 50 आमदार आमच्या संपर्कात आहेत आणि आहेतच

  • 19 Mar 2022 10:16 AM (IST)

    येत्या निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून संघटनात्मक बदल होत आहेत

    - येत्या निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून संघटनात्मक बदल होत आहेत… राज साहेब स्वता सगळ्यांना भेटत आहेत… शाखा अध्यक्ष ते विभाग अध्यक्ष सगळ्या पदांमध्ये फेरबदल होणार आहेत… पक्ष बांधणीसाठी बैठका होणार…

    - नाशिक ठाणे मुंबई इथे लोकांची राज ठाकरेंसाठी गर्दी होतेय, आम्ही कार्यकर्ते कमी पडतोय, त्यामुळे पक्ष संघटना बांधावी लागेल…

    - ठाण्याची धूरा अभिजित पानसे, राजू दादा यांच्या खांद्यावरही आहे, जेव्हा कुणी रस्त्यावर नव्हते तेव्हा कोवीडनधिये आम्ही काम केलं… त्याचं फळ लोक निवडणुकांमध्ये लोक देणार..

    - निवडणुकांत आम्हीही आमचा रंग दाखवू…

    - शिवसेनेची दया येतेय, हिंदूत्व बाजूला राहीलं, बाळासाहेबांचा मुलगा करतोय काय? , ठाण्यात कडवट हिंदूत्व मानणारे आहे, त्यांनी जर झूंड दाखवला तर लोक धिंड काढतील…

  • 19 Mar 2022 10:15 AM (IST)

    राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला एमआयएमकडून आघाडीची ऑफर

    राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला एमआयएमकडून आघाडीची ऑफर.

    शिवसेनेसोबत आघाडीचीही तयारी आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि इम्तियाज जलील यांची एक बैठक औरंगाबाद मध्ये झाली.

    टोपे इमतियाज जलील यांच्या आईच्या निधनानंतर भेटीसाठी गेले होते.

    इम्तियाज जलील यांनी राष्ट्रवादीला आघाडी करण्याची ऑफर दिली आहे.

    केवळ राष्ट्रवादीच नाही तर काँग्रेस सोबत देखील जायला तयार असल्याचंही इमतियाज म्हणालेत.

    शिवसेना त्यांच्यासोबत आहे यावर बोलताना ते म्हणाले की भाजपाला हरवायचे असेल तर सर्वांनी एकत्र येण्याची ही वेळ आहे.

    त्यामुळे ही बाब राष्ट्रवादीच्या वरिष्ठांनी गंभीरतेनं घ्यावी. राजेश टोपे यांनी पवार त्यांच्यापर्यंत निरोप पोहोचवावा.

    औरंगाबाद महानगरपालिका अस नाही तर राज्यातही युती करायला तयार. असल्याचे इम्तियाज यांनी म्हटले आहे..

  • 19 Mar 2022 09:43 AM (IST)

    गोवा पोलिसांकडून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

    गोवा पोलिसांकडून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

    गोवा गुन्हे शाखेची पणजीजवळ सांगोल्डा गावात कारवाई

    सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

    मुंबई मधील एका टीव्ही अभिनेत्रीसह तीन महिलांची सुटका

    हैदराबादमधील एका व्यक्तीला अटक

  • 19 Mar 2022 09:41 AM (IST)

    कर्नाटकातील डॉ.एम एम कलबुर्गी हत्याप्रकरणी मोठी बातमी

    कर्नाटकातील डॉ.एम एम कलबुर्गी हत्याप्रकरणी मोठी बातमी

    कलबुर्गी यांच्या पत्नी आणि मुलीने पाच संशयितांना ओळखलं

    अमित गड्डी, गणेश मिस्किन प्रवीण कृष्णमूर्ती, अमोल काळे आणि वासुदेव सूर्यवंशी या पाच संशयितांना ओळखलं

    पत्नी उमा देवी आणि मुलगी रुपदर्शी यांनी धारवाड न्यायालयात पटवली ओळख

    ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ एम एम कलबुर्गी यांची 30 ऑगस्ट 2015 ला धारवाड मधील राहत्या घरी झाली होती गोळ्या झाडून हत्या

    कलबुर्गी कुटुंबीयांनी संशयितांना ओळखल्याने महाराष्ट्रातील ही विचारवंतांच्या हत्यांचं गूढ उलगडणार का याची याकडे लक्ष

  • 19 Mar 2022 09:40 AM (IST)

    पुण्यात होळीच्या पार्टीतून २१ मोबाइल गेले चोरीला

    - हडपसरमधील अमनोरा टाऊनशिप मधील मॉलमध्ये होळीनिमित्त आयोजित केलेल्या पार्टीत सहभागी तरुण-तरुणीकडील तब्बल २१ मोबाइल चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला. काल ही घटना घडली असून याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोबाइल चोरीला गेल्याची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. होळीनिमित्त अमानोरा माॅलमध्ये सनबर्न होली पार्टीचे आयोजित करण्यात आली होती.कार्यक्रमाच्या ठिकाणी उच्च क्षमतेची लाउड स्पीकर वापरले होते. दरम्यान, या गोंधळातच नृत्य करणाऱ्यांचे मोबाइल चोरट्यांनी लंपास केले.

  • 19 Mar 2022 09:40 AM (IST)

    काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा सरकारवर घणाघात

    काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा सरकारवर घणाघात

    ट्विट करून सरकारला दिला सल्ला

    महागाई हा सर्व भारतीयांवर कर आहे.

    युक्रेन युद्ध सुरू होण्याआधीच विक्रमी दरवाढीने गरीब आणि मध्यमवर्गीयांना चिरडले होते.

    महागाई वाढणार - - क्रूड > $100/बॅरल - अन्नधान्याच्या किमती 22% वाढणार - कोविडने जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत केली

    GOI ने आताच कृती करावी. लोकांचे रक्षण कराव

  • 19 Mar 2022 09:39 AM (IST)

    ऊत्तरेतील ऊष्णतेच्या लाटीचा महाराष्ट्रातही जाणावणार परिणाम…

    ऊत्तरेतील ऊष्णतेच्या लाटीचा महाराष्ट्रातही जाणावणार परिणाम…

    मुंबई परिसरासह कोकण विभागातील किमान तापमान अद्यापही सरासरीपुढे आहे… मुंबईत आज तापमान ३५ अंशावर तर भिवंडीत ४१ अंशावर पोहोचणार…

    विदर्भात उष्णतेची लाट आली असून, ती आणखी दोन दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त ..

    विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश भागात दिवसाच्या कमाल तापमानाचा पारा 40 अंशांच्या पुढे..

    - उन्हाचा चटका चांगलाच जाणवू लागल्याने मुंबईकरांनी पाणी जास्त पुण्याचा सल्ला डाॅक्टरांनी दिलाय…

  • 19 Mar 2022 08:29 AM (IST)

    पिंपरी चिंचवड शहरातील थकबाकीदारांवर कारवाई

    पिंपरी चिंचवड शहरातील थकबाकीदारांवर कारवाई,78 मालमत्ता केल्या ‘सील’ तर 60 मालमत्तांचे तोडले नळ कनेक्शन

    -महापालिकेच्या कर आकारणी व करसंकलन विभागाने मार्चअखेर कर वसुलीसाठी जोर लावलाय

    -जप्तीकरिता थकबाकी असलेल्या 442 मालमत्तांचे नियोजन केले होते. त्यापैकी 329 मालमत्ता जप्त केल्या. त्यातील 193 मालमत्ताधारकांनी कराचा भरणा केलाय

    -चालू आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये आत्तापर्यंत 472 कोटी 37 लाख मालमत्ता कर वसुल झालाय

    -तर आत्तापर्यंत 78 थकबाकीदारांच्या मालमत्ता प्रत्यक्ष ‘सील’ केल्या. तर, 60 मालमत्तांचे नळ कनेक्शन तोडले असून अशा 138 मालमत्ताधारकांवर कारवाई केल्याची माहिती कर संकलन विभागाने दिलीय

  • 19 Mar 2022 08:19 AM (IST)

    नाशिकमध्ये रिक्षा टॅक्सी चालकांचा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

    नाशिक - रिक्षा टॅक्सी चालकांचा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

    कल्याणकारी मंडळासह मीटर दर वाढीची मागणी

    रिक्षांची संख्या वाढल्याने रिक्षा थांबे मंजूर करण्यात यावी

    पेट्रोल भाववाढीमुळे प्रवासी भाडेमिटर दरवाढ करण्यात यावी

    मुख्यमंत्र्यांसह परिवहन मंत्र्यांना निवेदन

  • 19 Mar 2022 08:17 AM (IST)

    नाशकात कोरोना निर्बंध शिथिल

    नाशिक - नाशकात कोरोना निर्बंध शिथिल

    सिनेमागृह,चित्रपटगृह, नाट्यगृह,जलतरणतलाव पूर्ण क्षमतेने सुरू होणार

    रात्री 11 ते पहाटे 5पर्यंत लावलेली संचारबंदी मागे घेणार

    लग्न समारंभ, धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमात ही सूट देण्यात येणार

    येत्या 2 दिवसात अधिकृत निर्णय

  • 19 Mar 2022 08:17 AM (IST)

    कोल्हापूर तिरुपती विमान सेवा आता दररोज

    कोल्हापूर तिरुपती विमान सेवा आता दररोज

    एक एप्रिल पासून सुरू होणार सेवा

    इंडिगो एअरलाईन्स देणार सेवा

    सध्या आठवड्यातुन चार दिवस आहे कोल्हापूर तिरुपती विमान

    प्रवाशांचा प्रतिसाद असल्यानं विमानसेवा दररोज सुरू ठेवण्याची होती मागणी

  • 19 Mar 2022 08:16 AM (IST)

    दिलासादायक बातमी, कडाक्याच्या उन्हाळ्यातंही यंदा पाणीटंचाई नाही!

    - दिलासादायक बातमी, कडाक्याच्या उन्हाळ्यातंही यंदा पाणीटंचाई नाही!

    - राज्यातील धरणांमध्ये सध्या ६७ टक्के पाणीसाठा

    - गेल्यावर्षीच्या तुलनेत धरणांमध्ये आठ टक्के जास्त पाणीसाठा

    - उष्णतेच्या लाटेत मार्चच्या पंधरवाड्यानंतरंही पुरेसा जलसाठा

    - धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा असल्याने पाण्याची चिंता नाही

    - यंदा मे महिन्याच्या उकाड्यातंही पाणीटंचाईचं संकट नाही

    - औरंगाबाद विभागातील धरणांमध्ये ७० टक्के पाणीसाठा

    - अमरावती विभागात ६३ टक्के, नागपूर विभागात ५३ टक्के जलसाठा

    - पुणे विभागात ७२ टक्के, नाशिक विभागात ६१ टक्के जलसाठा

    - लघू, मध्यम आणि मोठ्या धरणात पुरेसा पाणीसाठा

  • 19 Mar 2022 08:15 AM (IST)

    बुलढाण्यात गोदाम भाड्याने देताना अनियमितता आणि दुजाभाव,

    गोदाम भाड्याने देताना अनियमितता आणि दुजाभाव,

    खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील प्रकार,

    गोदाम भाड्याने देताना कारारपत्रकासाठी लागणारे मुद्रांक शुल्क ही बुडवून शासनाची फसवणूक केलीय,

    सामाजिक कार्यकर्ते रवी जैन यांची दुय्यम निबंधक यांच्याकडे तक्रार,

    तर दोन गोदामांचाभाडेपट्टा करतांना ही दुजाभाव,

  • 19 Mar 2022 08:14 AM (IST)

    उन्हाळयात अन्न आणि शितपेयात भेसळ करणारे जिल्हा प्रशासनाच्या रडारवर

    - उन्हाळयात अन्न आणि शितपेयात भेसळ करणारे जिल्हा प्रशासनाच्या रडारवर

    - अन्न व्यावसायिकांनी कायद्याचा भंग केल्यास कडक कारवाई

    - फ्रुट ज्युस, शरबत, लस्सी, शितपेय विक्रेत्यांना नागपूर जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

    - ‘शुध्द पाण्यातून बनविलेल्या बर्फाचा खाद्य पदार्थात वापर करावा’

    - भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाईचे जिल्हाधिकारी आर. विमला यांचे निर्देश

  • 19 Mar 2022 08:13 AM (IST)

    पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर परिसरात धक्कादायक प्रकार समोर.

    पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर परिसरात धक्कादायक प्रकार समोर....

    एका अल्पवयीन मुलीवर दारु पाजून विनयभंग केल्याचा प्रकार.....

    १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला तिच्या मैत्रिणीसह देवदर्शनासाठी जात असल्याचे सांगून गाडीत बसवले.....

    देवदर्शनाला घेऊन जाण्याच्या बहाण्याने कारमधून घेऊन जात तिला जबरदस्तीने दारू पाजून तिचा विनयभंग.....

    याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे सागर सुनील वर्पे याच्यावर अॅट्रॉसिटीसह बाललैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हे दाखल....

  • 19 Mar 2022 08:11 AM (IST)

    कोकण किनारपट्टीवर हाय अलर्टचा इशारा, कमी दाबाच्या क्षेत्रामुळे चक्रीवादळ निर्माण होऊन मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

    रत्नागरी - दिनांक 21.3.2022 रोजी बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे चक्रीवादळ निर्माण होऊन मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून दर्शविण्यात आली आहे. त्यामुळे मच्छीमारांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. अशा मच्छिमारांना इतर राज्यांच्या जवळपासच्या भागात निवारा आणि सुरक्षित ठिकाणांची आवश्यकता भासू शकते. या करीता वादळी हवामानामुळे जहाजांना सुरक्षित ठिकाण व इतर किनारपट्टीवरील राज्यातील मच्छिमारांना निवारा देण्यासाठी आवश्यक सूचना सर्व मच्छीमारांना पोचवणे बाबत याद्वारे सूचित करण्यात येत आहे.

  • 19 Mar 2022 08:10 AM (IST)

    गंगापूर वैजापूर रोडवर भीषण अपघात

    गंगापूर वैजापूर रोडवर भीषण अपघात

    अपघातात 3 जण जागेवरच ठार

    ऊसाचा ट्रक आणि पिकअप व्हॅन मध्ये झाला अपघात

    अपघातात चार जण झाले जखकी

    जखमी वर गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू

  • 19 Mar 2022 08:06 AM (IST)

    रंगपंचमी साजरी झाल्यानंतर नदीवर आंघोळीला गेलेल्या दोन तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू

    रंगपंचमी साजरी झाल्यानंतर नदीवर आंघोळीला गेलेल्या दोन तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू

    नागपूर जिल्ह्यातील शिवा(सावंगा) येथील घटना,

    मंगेश इंगळे व देवानंद पवार असे मृतक तरुणांचे नाव

  • 19 Mar 2022 07:17 AM (IST)

    करोना संसर्गामुळे अडचणीत आलेला बांधकाम उद्योग आता चांगलाच सावरला

    करोना संसर्गामुळे अडचणीत आलेला बांधकाम उद्योग आता चांगलाच सावरला आहे.

    मावळत्या वर्षांत घरविक्री समाधानकारक झाल्याने खुशीत असलेल्या या उद्योगाला शहरातील तयार आलिशान घरांसाठीही ग्राहक मिळू लागला आहे.

    गेल्या वर्षांत ही विक्री ५० टक्क्यांनी वाढली असून त्यामुळे रोकडसुलभता वाढत असल्याचे हा उद्योग खुशीत आहे.

    यामुळे २०१८ मधील विक्रीतून मिळालेल्या ४७ हजार ८०० कोटींवरून ७३ हजार कोटींच्या घरात पोहोचली आहे.

  • 19 Mar 2022 07:12 AM (IST)

    साखर उत्पादनात जगात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर

    साखर उत्पादनात जगात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर

    तर देशात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक

    उत्तर प्रदेश साखर उत्पादनात पडले मागे

    यंदाच्या हंगामात 108 लाख 95 हजार मेट्रीक टन एवढी साखर उत्पादित झालीये..

    जागतिक स्तरावर ब्राझील 399 लाख मेट्रीक टन तर युरोपियन युनियनमध्ये बिटापासून 158 मेट्रीक टन साखरेचं उत्पादन होतंय

    यामध्ये महाराष्ट्रानं जगात तिसरा क्रमांक पटकावलाय...

  • 19 Mar 2022 07:09 AM (IST)

    नागपूरातील अवैध भूखंड, घरं नियमित करण्यासाठी अनेकांची धडपड

    - अवैध भूखंड, धरं नियमित करण्यासाठी आतापर्यंत ५२५ जणांनी केले अर्ज

    - गुंठेवारी कायद्याअंतर्गत ३१ डिसेंबर २०२० पर्यॅतची घरं, भुखंड नियमित करण्याची प्रक्रिया

    - १४ मार्चपासून प्रक्रिया सुरु, आतापर्यंत ५२५ जणांनी केले ॲानलाईन अर्ज

    - १३ मेपर्यंत करता येणार अर्ज

    - नागपूरात अवैध घरं आणि भुखंडांची मोठी संख्या

  • 19 Mar 2022 07:08 AM (IST)

    अखेर दोन वर्षानंतर रेल्वे प्रवाशांना काढता येणार जनरल तिकीट

    अखेर दोन वर्षानंतर रेल्वे प्रवाशांना काढता येणार जनरल तिकीट

    22 मार्चपासून सुरू होणार जनरल तिकीटीची विक्री

    मुंबई पुणे धावणाऱ्या डेक्कन क्वीन एक्स्प्रेससह आणखी चार गाड्यांचा समावेश

    कोरोनामुळं आरक्षित तिकीट काढूनच प्रवास करावा लागत होता..

    मात्र आता जनरल तिकीटालाही सुरुवात होणार असल्यानं प्रवाशांचा त्रास वाचणार आहे..

    मुंबई पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस,इंद्रायणी एक्स्प्रेस,डेक्कन एक्स्प्रेस, सिंहगड एक्स्प्रेस,डेक्कन क्वीन एक्स्प्रेस या गाड्यांचा समावेश आहे...

  • 19 Mar 2022 07:05 AM (IST)

    उद्यापासून पुण्यातील राजीव गांधी प्राणिसंग्रहालय होणार पर्यटकांसाठी सुरू

    2 वर्ष 5 दिवसांनी संग्रहालय पर्यटकांसाठी खूलं होतंय.

    दोन डोस घेतलेले असतील तरच मिळणार प्रवेश

    प्राणिसंग्रहालय प्रशासनाकडून सगळी तयारी पुर्ण

    पर्यटकांची प्रतिक्षा संपली उद्यापासून होणार सुरळीत सुरू !

  • 19 Mar 2022 07:04 AM (IST)

    एल. एल. बी अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेच्या तारखा जाहीर

    लॉ साठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी

    पाच वर्ष आणि तीन वर्ष एल एल बी अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेच्या तारखा जाहीर ..

    5 वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी आजपासून अर्ज भरायला होणार सुरुवात

    तर 17 मे आणि 18 मे ला होणार परीक्षा

    तीन वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी 24 पासून अर्ज भरायला सुरुवात तर 7 ते 8 मे ला होणार परीक्षा

    राज्याच्या सीईटी सेलकडून वेळापत्रक जाहीर...

  • 19 Mar 2022 06:29 AM (IST)

    पुणे महापालिका दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती लवकरचं देणार

    शिष्यवृत्तीची बिलं तयार प्रस्ताव आयुक्तांकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आलाय.

    शिष्यवृत्तीसाठी 16 हजार अर्ज महापालिका शाळांकडून प्राप्त झालेत

    दहावीच्या विद्यार्थ्यांना मौलाना अबूल कलाम आझाद 15 हजार तर बारावीच्या विद्यार्थ्यासाठी अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती 25 हजार रुपये दिली जाते

    लवकरच प्रस्तावावर सही होऊन विद्यार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार

  • 19 Mar 2022 06:28 AM (IST)

    राज्य सरकार महावितरणला तब्बल 1500 कोटी रुपयांचा निधी देणार

    राज्यातील कृषिपंप वीज जोडणीसाठी प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ वीज जोडणी देता यावी म्हणून राज्य सरकार महावितरणला तब्बल 1500 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे वीज जोडणीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱयांना मोठा दिलासा मिळणार आहे.

  • 19 Mar 2022 06:26 AM (IST)

    21 मार्चला तिथीप्रमाणे शिवनेरीवर होणार शिवजन्मोत्सव

    21 मार्चला तिथीप्रमाणे शिवनेरीवर होणार शिवजन्मोत्सव

    शिवनेरी स्मारक समितीच्या वतीनं विविध कार्यक्रमांच आयोजन

    श्नीक्षेत्र जगदगुरु तुकाराम महाराज संस्थान पाठवणार महावस्त्र

    गडावर शिवाई देवी मंदिर ते शिवजन्म ठिकाण अशी निघणार मिरवणूक

    उत्साहात साजरी होणार शिवजयंती

  • 19 Mar 2022 06:26 AM (IST)

    अखेर पुण्यातील स्थायी समितीचा वाद मिटला

    अखेर पुण्यातील स्थायी समितीचा वाद मिटला

    महापालिका मुदत संपल्यानं सगळ्या समित्या झाल्या बरखास्त

    सोमवारपासून विभाग मात्र कार्यरत असणार

    महापालिका मुदत संपली तरी स्थायी काम करत राहणार अध्यक्ष हेमंत रासनेंनी घेतली होती भूमिका

    मात्र सगळ्या समित्या बरखास्त झाल्यात कामकाज मात्र सुरळीत सुरू होणार...

  • 19 Mar 2022 06:25 AM (IST)

    पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेनं अवघड क्षेत्र शाळांची यादी केली प्रसिद्ध

    पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेनं अवघड क्षेत्र शाळांची यादी केली प्रसिद्ध

    जिल्हांतर्गत शिक्षक बदलीची प्रक्रीया सुरू

    शिक्षकांना आक्षेप असल्यास जिल्हा परिषदेकडे 22 मार्चपर्यंत नोंदवता येणार

    जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांची माहिती

    सर्वाधिक अवघड क्षेत्र मावळ तालूक्यात 152 शाळांचा समावेश

    तर जिल्ह्यात एकूण 768 शाळा अवघड क्षेत्र शाळा म्हणून नोंद !

Published On - Mar 19,2022 6:22 AM

Follow us
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.