65 कैद्यांना कोरोनामुक्त करणाऱ्या जेल अधीक्षकांचा कोरोनाने मृत्यू, धनंजय मुंडेंकडून श्रद्धांजली

| Updated on: Nov 04, 2020 | 4:43 PM

कोरोनामुळे बीड कारागृहाचे अधीक्षक संजय कांबळे यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. बीडचे पालकमंत्री आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी संजय कांबळे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

65 कैद्यांना कोरोनामुक्त करणाऱ्या जेल अधीक्षकांचा कोरोनाने मृत्यू, धनंजय मुंडेंकडून श्रद्धांजली
Follow us on

बीड: बीड जिल्हा कारागृहातील ६५ कैद्यांना कोरोनामुक्त करणाऱ्या कारागृह अधीक्षक संजय कांबळे यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. संजय कांबळे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर बीडमधील रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. संजय कांबळे हे एक उत्तम साहित्यिकही होते. संजय कांबळे यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलं असा परिवार आहे. ( Beed District Jail Superintendent Sanjay Kamble dies due to corona)

मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील मुख्य आरोपी अजमल कसाबच्या अटकेनंतर त्याला फासावर लटकवण्यापर्यंत त्याच्या सुरक्षेची जबाबदारी संजय कांबळे यांच्याकडे होती. त्याचबरोबर अभिनेता संजय दत्त कारागृहात असताना संजय कांबळे त्याच्या सेलचे प्रमुख होते. दरम्यान, संजय कांबळे यांनी जिल्ह्यातील अनेक सामाजिक उपक्रमात सहभाग नोंदवला होता. त्यांच्या स्वभावामुळे जिल्ह्यात त्यांचा मोठा मित्र परिवारही होता.

धनंजय मुंडे यांच्याकडून कांबळे यांना श्रद्धांजली

सामाजिक न्याय आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी संजय कांबळे यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. ‘बीड जिल्हा कारागृहाचे अधीक्षक, अत्यंत तरुण आणि धाडसी अधिकारी म्हणून ओळख असलेले संजय कांबळे यांची कोरोनाविरुद्धची झुंज अपयशी ठरली. मी कांबळे कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे. भावपूर्ण श्रद्धांजली’ अशा शब्दात मुंडे यांनी संजय कांबळे यांनी श्रद्धांजली वाहिली.

संबंधित बातम्या:

राजधानी दिल्लीत कोरोनाची तिसरी लाट, ICU बेडसाठी ‘आप’ सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार!

सरकारला कोरोनापेक्षा दारूबंदी मोठी आपत्ती वाटते का? ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अभय बंग यांचा सवाल

पिंपरी चिंचवडमध्ये तब्बल साडे आठ लाख नागरिकांना कोरोना संसर्ग होऊन गेला : सर्व्हे

Beed District Jail Superintendent Sanjay Kamble dies due to corona