पिंपरी चिंचवडमध्ये तब्बल साडे आठ लाख नागरिकांना कोरोना संसर्ग होऊन गेला : सर्व्हे

शहरातील दोनशे भागाची निवड करण्यात आली होती. यासाठी झोपडपट्टी, बैठी घरं आणि सोसायटी अशी विभागवारी करण्यात आली होती.

पिंपरी चिंचवडमध्ये तब्बल साडे आठ लाख नागरिकांना कोरोना संसर्ग होऊन गेला : सर्व्हे
Follow us
| Updated on: Nov 03, 2020 | 3:46 PM

पिंपरी चिंचवड : राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा धोका हा वाढतच चालला आहे. देशभरात सगळ्यात जास्त कोरोना रुग्ण हे महाराष्ट्रात होते. त्यातही पुण्या-मुंबईसारख्या शहरांमध्ये कोरोनाचा प्रकोप झाल्याचं पाहायला मिळालं. यादरम्यान, पिंपरी चिंचवडमध्ये एक सर्व्हे करण्यात आला. ज्यामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील साडे आठ लाख नागरिकांना कोरोनाची लागण होऊन गेल्याचं सेरो सर्व्हेतून समोर आलं आहे. (Survey said Eight and half lakh citizens infected with corona in Pimpri Chinchwad)

या सर्व्हेद्वारे पाच हजार नागरिकांचे अँटी बॉडीज सॅम्पल घेण्यात आले होते. शहरातील दोनशे भागाची निवड करण्यात आली होती. यासाठी झोपडपट्टी, बैठी घरं आणि सोसायटी अशी विभागवारी करण्यात आली होती. त्यानुसार 34 टक्के नागरिकांमध्ये अँटी बॉडीज आढळल्या आहेत. शहराची लोकसंख्या ही 24 लाख असून या सर्व्हेनुसार साडे आठ लाख नागरिकांना कोरोनाची लागण होऊन गेल्याचा अंदाज वर्तवला जातो आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेने डॉ डी वाय पाटील या खाजगी संस्थेला सर्व्हेची जबाबदारी दिली होती. त्यातून ही माहिती समोर आली आहे. खरंतर, आता राज्य अनलॉकच्या प्रक्रियेत आहे. यामुळे प्रत्येक क्षेत्रात व्यवसायासाठी आणि नागरिकांसाठी सूट देण्यात आली आहे. अशात आता सणासुदीचे दिवस आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक घराच्या बाहेर पडत आहेत. त्यामुळे कोरोनाचा धोका आणखी वाढण्याची शक्यता आहे. पण नागरिकांनी आपली काळजी घेत नियमांचं पालन करा असं आव्हान पालिकेकडून करण्यात आलं आहे. (Survey said Eight and half lakh citizens infected with corona in Pimpri Chinchwad)

पुणे जिल्ह्यातील 502 गावं कोरोनामुक्त, तर 250 गावात कोरोनाचा शिरकावच नाही कोरोनाच्या संकटात पुणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. पुणे जिल्ह्यातील तब्बल 502 गावं पूर्णपणे कोरोनामुक्त झाली आहेत. तर अडीचशे गावांमध्ये कोरोनाचा शिरकावच झाला नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे. पुणे जिल्ह्यातील आकडेवारी पाहता ग्रामीण भागात कोरोनाच्या संसर्गाचं प्रमाण कमी करण्यात प्रशासनाला मोठं यश मिळाल्याचं दिसून येत आहे. सध्या पुणे जिल्ह्यात कोरोनाचे 13 हजार अॅक्टिव रुग्ण असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.

पुणे महापालिकेचा ‘मिशन झिरो’ उपक्रम कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे महानगरपालिकेनं मिशन झिरो उपक्रम हाती घेतला होता. मालेगाव आणि धारावीमध्ये मिशन झिरो उपक्रमक यशस्वी ठरल्यानंतर पुण्यातही तो राबवण्यात आला. महापालिकेनं भारतीय जैन संघटनेच्या सहकार्याही हा उपक्रमक राबवला.

इतर बातम्या –

‘शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली तर ‘मातोश्री’वर दिवाळी साजरी होऊच देणार नाही’
भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी एकेकाळी दिलेलं शपथपत्र कसं नाकारता?, राजीव सातव यांचा केंद्राला सवाल

(Survey said Eight and half lakh citizens infected with corona in Pimpri Chinchwad)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.