बीडच्या समाजकल्याण उपायुक्तांच्या हातात कात्री, माणुसकीची भावना जपत 64 मनोरुग्णांचे केसकर्तन

| Updated on: Apr 10, 2020 | 2:23 PM

बीडचे समाजकल्याण उपायुक्त सचिन मडावी यांनी माणुसकी जपत तब्बल 64 मनोरुग्णांचे हातात कात्री घेऊन केसकर्तन (Beed social welfare Officer cut mentally challenge people hair) केले.

बीडच्या समाजकल्याण उपायुक्तांच्या हातात कात्री, माणुसकीची भावना जपत 64 मनोरुग्णांचे केसकर्तन
Follow us on

बीड : कोरोना विषाणूंचा संसर्ग धसका प्रशासनासह (Beed social welfare Officer cut mentally challenge people hair) सर्वसामान्य नागरिकांनीही घेतल्याचे दिसत आहे. पण संकटाच्या प्रसंगातही बीडचे समाजकल्याण उपायुक्त सचिन मडावी यांनी माणुसकी जपत तब्बल 64 मनोरुग्णांचे हातात कात्री घेऊन केसकर्तन केले. विशेष म्हणजे त्यांची स्वच्छता करत त्यांना निवारा गृहात आश्रय दिला. त्यामुळे बीडच्या समाजकल्याण उपायुक्तांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या विषाणूला (Beed social welfare Officer cut mentally challenge people hair) रोखण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी काळजी घेत आहे. देशात संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे बीडमध्ये सध्या संचारबंदी लागू केली आहेत. संचारबंदी लागू केल्याने सर्व रस्ते निर्मनुष्य झाले आहे. तसेच हॉटेल, खाद्यपदार्थांची दुकानेही बंद आहेत.

यामुळे गावातील मनोरुग्णांचे मोठे हाल होत आहेत. यासाठी अनेक सामाजिक कार्यकर्ते सरसावले आहेत. या मनोरुग्णांसाठी दोन वेळच्या जेवणाची सोय देखील केली आहे.

तसेच त्यांच्या डोक्यावर वाढलेले केस, अस्वच्छता यामुळे मनोरुग्णांना संसर्गाची लागण होण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यातच अनेक सलूनची दुकानही बंद असल्याने बीडचे समाजकल्याण उपायुक्त सचिन मडावी यांनी अनोखा उपक्रम हाती घेतला.

त्यांनी रस्त्यावरील सर्व मनोरुग्णांमध्ये समाजकल्याण उपायुक्त मडावी यांनी स्वत: हातात कात्री घेऊन मनोरुग्णांचे केसकर्तन केले. त्यांनी आतापर्यंत तब्बल 64 मनोरुग्णांची स्वच्छता केली. तसेच त्यांना निवारा गृहात आश्रय देण्यात आला आहे. समाज कल्याणच्या या बड्या अधिकाऱ्यानं कोरोनाच्या संकटात मनोरुग्णांना सुरक्षितता मिळवून देण्याचा हा स्तुत्य उपक्रम हाती घेतल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक केलं (Beed social welfare Officer cut mentally c[svtimeline][/svtimeline]hallenge people hair) जातं आहे.

संबंधित बातम्या : 

‘कोरोना’संकटात भारताची माणुसकी, इस्रायलला पाच टन औषधांची निर्यात, नेतान्याहू म्हणतात…

महाबळेश्वर पर्यटन भोवलं, वाधवान कुटुंबासह 23 जणांवर गुन्हे, पाचगणीत 14 दिवस क्वारंटाइन