Shiv Thakare | बनावट आयडीवरून मुलींना त्रास, प्रकरण लक्षात येताच ‘बिग बॉस मराठी’ फेम शिव ठाकरेचे चाहत्यांना आवाहन…

| Updated on: Dec 07, 2020 | 3:32 PM

एका अज्ञात व्यक्तीने शिवच्या नावाने खोटे सोशल मीडिया प्रोफाईल बनवून त्यावरून मुलींना आणि महिला फॅन्सना त्रास दिला जात आहे.

Shiv Thakare | बनावट आयडीवरून मुलींना त्रास, प्रकरण लक्षात येताच ‘बिग बॉस मराठी’ फेम शिव ठाकरेचे चाहत्यांना आवाहन...
Follow us on

मुंबई : सध्या सोशल मीडियावर बनावट प्रोफाईल (Fake ID) तयार करून, त्या आयडीवरून इतरांना त्रास देण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. अशातही सेलिब्रिटींचे, कलाकारांचे खोटे प्रोफाईल बनवून त्यावरून प्रोफाईलवरून मुलींना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्याच्या अनेक घटना सध्या समोर येत आहेत. या बनावट प्रोफाईलच्या जंजाळात सध्या ‘बिग बॉस मराठी’ फेम शिव ठाकरे (Shiv Thakare) हे नाव देखील अडकले आहे. एका अज्ञात व्यक्तीने शिवच्या नावाने खोटे सोशल मीडिया प्रोफाईल बनवून त्यावरून मुलींना आणि महिला फॅन्सना त्रास दिला जात आहे (Bigg Boss Marathi Fame Shiv Thakare’s Fake social media ID abusing female fans).

अभिनेता शिव ठाकरेचे फेसबुक या सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर खोटे प्रोफाईल तयार केले आहे. या अकाऊंटवरून मुलींना आणि महिला फॅन्सना अश्लील मेसेज केले जात आहेत. तसे, काही जणांकडे पैसे अथवा तत्सम गोष्टींची गरज असल्याचे सांगून फसवले जात आहे. असे मेसेजेस पाहून शिवच्या काही चाहत्यांनी त्याच्या अधिकृत सोशल मीडिया प्रोफाईलवर या संदर्भात तक्रार केली. यानंतर सदर प्रकार समोर आला आहे.

खोट्या प्रोफाईलपासून सावधान!

यासंदर्भात शिव ठाकरेशी संपर्क साधला असता त्याने चाहत्यांना या खोट्या सोशल मीडिया प्रोफाईल्सपासून सावधान राहण्याचे आवाहन केले आहे. शिव म्हणतो, ‘मी तसा सोशल मीडियावर सक्रिय असतो. मात्र, कामात व्यस्त असल्याने बऱ्याचदा चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तर देता येत नाही. त्यांचे मेसेज वाचणे राहून जाते. मात्र, माझ्या नावाने असे एखादे फेक प्रोफाईल तयार केले गेले याची मला काहीच कल्पना नव्हती.’

‘सगळ्यांना उत्तरं देण्या इतका खरंच वेळाही नसतो कधी कधी. पण, या खोट्या प्रोफाईल वरून तर थेट समोरून मेसेज केले जात आहे. शिवाय आपल्या आवडत्या कलाकाराकडून मेसेज आल्याने चाहते देखील आनंदाने त्यांना रिप्लाय देत आहेत. यानंतर ही अज्ञात व्यक्ती महिला आणि मुलींना अश्लील भाषेत काही प्रश्न विचारून, त्यांना त्रास देत आहे. तर, अनेक जणांना खोटे मेसेज करून फसवण्याचा प्रयत्न केला जात आहे.’ (Bigg Boss Marathi Fame Shiv Thakare’s Fake social media ID abusing female fans)

‘या प्रोफाईलवर माझाच फोटो वापरण्यात आला आहे. पांढऱ्या कोटमध्ये, बुलेटवर बसलेला हा माझा फोटो एका शूटदरम्यानचा आहे. हे खोटे प्रोफाईल खरे वाटावे म्हणून सगळे खटाटोप केले गेले आहेत. ही गोष्ट समोर येताच मलाही धक्का बसला आहे. या सगळ्यात, कोणीही या खोट्या व्यक्तीवर विश्वास ठेवू नका आणि या जाळ्यात अडकू नका, असे आवाहन मी माझ्या सगळ्या चाहत्यांना करतो आहे’, असे शिव म्हणाला.

तक्रार करणार!

सदर प्रकार शिव ठाकरेच्या लक्षात येताच त्याने या विरुद्ध तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. सदर व्यक्ती ही माझ्या नावाने महिला आणि मुलींना त्रास देते आहे. ही खूप चुकीची गोष्ट असून, याविरोधात कायदेशीर कारवाईची पावले उचलणार असल्याचे शिव ठाकरे म्हणाला.

(Bigg Boss Marathi Fame Shiv Thakare’s Fake social media ID abusing female fans)

संबंधित बातम्या : 

Bigg Boss Marathi 3 | ‘तो’ परत येतोय! ‘बिग बॉस मराठी’ला पुढील वर्षीचा मुहूर्त

Bigg Boss Marathi 2 | शिव ठाकरे बिग बॉस 2 चां विजेता