100 दिवस 'बिग बॉस'च्या घरात लॉकडाऊन असलेला शिव ठाकरे काय करतोय?

मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वाचा विजेता शिव ठाकरे (Shiv Thackeray tips on Fitness) याने लॉकडाऊनदरम्यान आपला वेळ कसा घालवावा आणि घरातल्या घरात वर्कआऊट करुन फिटनेस कसं राखावं याबाबत सल्ला दिला आहे.

100 दिवस 'बिग बॉस'च्या घरात लॉकडाऊन असलेला शिव ठाकरे काय करतोय?

अमरावती : कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी (Shiv Thackeray tips on Fitness) भारतात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून देशातील नागरिकांनी बाहेर पडू नये, असा सल्ला सरकारकडून देण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे जीवनाश्यक वस्तू वगळता सर्व दुकाने, जीम बंद आहेत. याच पार्श्वभूमीवर मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वाचा विजेता शिव ठाकरे (Shiv Thackeray tips on Fitness) याने आपला वेळ कसा घालवावा आणि घरातल्या घरात वर्कआऊट करुन फिटनेस कसं राखावं याबाबत सल्ला दिला आहे.

शिव ठाकरे सध्या अमरावतीत आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. आपल्या आजीसोबत तो वर्कआउट करतोय. शिव आपल्या 78 वर्षीय आजीला चक्क पाठीवर बसवून पुशअप्स मारतोय. सध्या जिम बंद आहेत. अशावेळी घरच्याघरी तुम्ही कसा व्यायाम करु शकता? याचेही सल्ले त्याने दिले आहेत.

“रोज सकाळी आणि संध्याकाळी व्यायम केलं पाहिजे. दररोज भाकर आणि फळं खावी, असा सल्ला शिवने दिला आहे. त्याचबरोबर दररोज नियमितपणे व्यायम केल्याने सात दिवसात त्याचा फरक तुम्हाला जाणवू लागेल”, असंदेखील शिव म्हणाला. सध्या अनेकजण मोबाईलवर लुडो खेळताना दिसतात. पण शिव आपल्या कुटुंबासोबत जुन्या पद्धतीचा लुडो खेळणं पसंत करतो. तो आपल्या आईला स्वयंपाकातही मदत करतोय.

कोरोनाविरोधाच्या लढाईत बॉलिवूड आणि मराठी सेलिब्रिटीदेखील महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून ते आपल्या चाहत्यांना घरातच राहण्याचं आवाहन करत आहेत. याशिवाय अनेक सेलिब्रिटींनी कोरोनाविरोधाच्या लढाईत देशाला आर्थिक मदतही केली आहे. अभिनेता अक्षय कुमारने 25 कोटींची मदत जाहीर केली आहे. तर कपिल शर्माने 50 लाखांची मदत जाहीर केली आहे. मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दीड लाखांची मदत जाहीर केली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *