Corona : राज्यातील 39 कोरोनाबाधितांना डिस्चार्ज, 17 नवीन रुग्ण, राज्यातील संख्या 220वर

राज्यात कोरोनाचे आज 17 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 220वर जाऊन पोहोचली आहे.

Corona : राज्यातील 39 कोरोनाबाधितांना डिस्चार्ज, 17 नवीन रुग्ण, राज्यातील संख्या 220वर

मुंबई : राज्यात कोरोनाचे आज 17 नवीन (Corona Patients Increased In Maharashtra) रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 220वर जाऊन पोहोचली आहे. या नवीन रुग्णांमध्ये 8 रुग्ण मुंबईचे, 5 रुग्ण पुण्याचे, 2 नागपूरचे तर नाशिक आणि कोल्हापूर येथील प्रत्येकी 1 रुग्ण आहे. दरम्यान, कोरोना आजारातून बरे झालेल्या एकूण 39 रुग्णांना आतापर्यंत घरी सोडण्यात आले आहे. तर आज 2 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सध्या राज्यात 171 रुग्णांवर उपचार सुरु आहेत, (Corona Patients Increased In Maharashtra) अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आज राज्यात 2 करोना बाधित रुग्णांचे मृत्यू झाले. एका 78 वर्षीय पुरुषाचा मुंबईतील खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांना उच्च रक्तदाब आणि हृदयरोग हे इतर आजारही होते. तर कोरोनाबाधित असलेल्या 52 वर्षीय पुरुषाचा पुण्यातील खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता. राज्यातील करोना बाधित मृत्यूची संख्या आता 10 झाली आहे.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांचा तपशील :

मुंबई – 92
पुणे ( शहर व ग्रामीण भाग ) – 43
सांगली – 25
मुंबई वगळून ठाणे मंडळातील इतर मनपा – 23
नागपूर – 16
यवतमाळ – 4
अहमदनगर – 5
सातारा – 2
कोल्हापूर – 2
औरंगाबाद – 1
रत्नागिरी – 1
सिंधुदुर्ग – 1
गोंदिया – 1
जळगाव – 1
बुलढाणा – 1
नाशिक – 1
इतर राज्य गुजरात – 1

एकूण – 220

याशिवाय, मुंबई येथील आणखी काही रुग्णांचे नमुने तपासणी अहवाल अप्राप्त असल्याने त्यांचा अंतर्भाव आजच्या अहवालात करण्यात आलेला नाही.

राज्यात आज एकूण 328 जण विविध (Corona Patients Increased In Maharashtra) रुग्णालयात भरती झाले आहेत. 18 जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत 4538 जणांना भरती करण्यात आले. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यांपैकी 3876 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत. तर 220 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 19 हजार 161 व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून 1224 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आतापर्यंत 39 करोनाबाधित रुग्ण बरे झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

घरी सोडण्यात आलेले रुग्ण

मुंबई – 14
पुणे – 7
पिंपरी चिंचवड – 9
यवतमाळ – 3
अहमदनगर – 1
नागपूर – 4
औरंगाबाद – 1

कोरोना विषाणू आजार प्रतिबंध आणि नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.

कोरोनामुळे महाराष्ट्रात कुठे किती मृत्यू?

मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 17 मार्च
मुंबई – 63 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 22 मार्च
*मुंबई – फिलिपाईन्सच्या 68 वर्षीय वृद्धाचा मृत्यू– 23 मार्च (कोरोना निगेटिव्ह, मृत्यूचं कारण अन्य)*
मुंबई – 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 23 मार्च
मुंबई – एकाचा मृत्यू (1) -25 मार्च
नवी मुंबई – वाशीतील 65 वर्षीय महिलेचा मृत्यू (1)– 26 मार्च
मुंबई – 63 वर्षीय महिलेचा मृत्यू (1)– 26 मार्च
बुलडाणा – 45 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 28 मार्च
मुंबई – 40 वर्षीय महिलेचा मृत्यू – 28 मार्च
पुणे – 52 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू – 30 मार्च
मुंबई – 80 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू – 30 मार्च

Corona Patients Increased In Maharashtra

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई329743741065
पुणे (शहर+ग्रामीण)5985938275‬
पिंपरी चिंचवड मनपा350347
ठाणे (शहर+ग्रामीण)
3350‬3657
नवी मुंबई मनपा21548032
कल्याण डोंबिवली मनपा9899118
उल्हासनगर मनपा1986
भिवंडी निजामपूर मनपा99113
मिरा भाईंदर मनपा52515710
पालघर 12213
वसई विरार मनपा63010515
रायगड471 55
पनवेल मनपा37412
नाशिक (शहर +ग्रामीण)270‬22
मालेगाव मनपा72247
अहमदनगर (शहर+ग्रामीण)84365
धुळे1299
जळगाव 447141
नंदूरबार 322
सोलापूर646‬4149
सातारा33935
कोल्हापूर 340‬21
सांगली87‬291
सिंधुदुर्ग1920
रत्नागिरी17125
औरंगाबाद1310‬1453
जालना730
हिंगोली 13310
परभणी251
लातूर 8283
उस्मानाबाद 3730
बीड320
नांदेड 1055
अकोला 437‬1417
अमरावती 193‬14
यवतमाळ 115220
बुलडाणा 4983
वाशिम 80
नागपूर481‬848
वर्धा 701
भंडारा1400
गोंदिया 4710
चंद्रपूर25‬10
गडचिरोली2600
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)52012
एकूण5475716954 1792

संबंधित बातम्या : 

संगमनेरमध्ये एकाचवेळी तब्बल 15 कोरोना संशयित रुग्ण, संपर्कात आल्याने संसर्गाची चिन्हं

Corona | पिंपरी चिंचवडकरांचा नेटाने लढा, 12 पैकी 9 रुग्ण यशस्वी उपचारानंतर घरी

शिंपी संघटनेने करुन दाखवलं, एका झपाट्यात 3 हजार मास्क शिवले

BMC-पोलीस कर्मचाऱ्यांसाठी नाश्त्याची सोय, नगरसेविकेने तळले बटाटे वडे

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *