संगमनेरमध्ये एकाचवेळी तब्बल 15 कोरोना संशयित रुग्ण, संपर्कात आल्याने संसर्गाची चिन्हं

जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात तब्बल 15 नागरिक कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णाच्या संपर्कात आल्याने एकच खळबळ माजली आहे (Corona Suspects in Sangamner Ahmednagar).

संगमनेरमध्ये एकाचवेळी तब्बल 15 कोरोना संशयित रुग्ण, संपर्कात आल्याने संसर्गाची चिन्हं

अहमदनगर : जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात तब्बल 15 नागरिक कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णाच्या संपर्कात आल्याने एकच खळबळ माजली आहे (Corona Suspects in Sangamner Ahmednagar). ही बाब समोर येताच आरोग्य यंत्रणेने तात्काळ या 15 संशयित रुग्णांना अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या सर्वांना सध्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

संगमनेर शहरातील 15 जण कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आल्याचं स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनाही क्वारंटाईन करण्यात आलं आहे. एकाच वेळी 15 जण कोरोना संशयित आढळल्याने शहरात खळबळ उडाली आहे. संशयित ज्या परिसरात राहतात तो आजूबाजूचा परिसर सील करण्यात आला आहे.

अहमदनगर जिल्हयातील मुकूंदनगर परिसरात दोन कोरोना रुग्ण सापडले. त्यांची चौकशी केली असता ते जामखेड येथे एका कार्यक्रमात गेल्याचं त्यांनी सांगितलं. तेथे त्यांच्यासोबत संगमनेरमधील इतर 15 जण असल्याचंही समोर आलं. हे सर्व जामखेडमध्ये 10 दिवस मुक्कामी होते. ही माहिती मिळताच आरोग्य यंत्रणेने तातडीने या 15 जणांचा शोध घेतला. या 15 पैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचंही सांगितलं जात आहे. संबंधित 15 कोरोना संशयित रुग्णांना जिल्हा रूग्णालयात हलवण्यात आलं आहे. या घटनेनंतर अहमदनगरमध्ये कोरोना संशयितांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे.

संगमनेर येथील या 15 संशयित रुग्णांना तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून संशयितांच्या कुटुंबियांना देखील होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे. हे सर्व आणखी कुणाच्या संपर्कात आले त्याची माहितीही घेण्यात येत आहे. दरम्यान हे संगमनेरमध्ये ज्या परिसरात वास्तव्यास होते तो परिसर सील करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात कोठे किती रुग्ण?

मुंबई – 88
पुणे – 30
पिंपरी चिंचवड – 12
सांगली – 25
नागपूर –  16
कल्याण – 7
नवी मुंबई – 6
ठाणे – 5
वसई विरार – 4
उल्हासनगर – 1
पनवेल – 2
पालघर- 1
यवतमाळ – 4
अहमदनगर – 5
सातारा – 2
कोल्हापूर – 2
गोंदिया – 1
औरंगाबाद – 1
सिंधुदुर्ग – 1
रत्नागिरी – 1
जळगाव- 1
नाशिक – 1
इतर राज्य (गुजरात) – 01

एकूण 215

कोरोनामुळे महाराष्ट्रात कुठे किती मृत्यू?

मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 17 मार्च
मुंबई – 63 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 22 मार्च
*मुंबई – फिलिपाईन्सच्या 68 वर्षीय वृद्धाचा मृत्यू– 23 मार्च (कोरोना निगेटिव्ह, मृत्यूचं कारण अन्य)*
मुंबई – 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 23 मार्च
मुंबई – एकाचा मृत्यू (1) -25 मार्च
नवी मुंबई – वाशीतील 65 वर्षीय महिलेचा मृत्यू (1)– 26 मार्च
मुंबई – 63 वर्षीय महिलेचा मृत्यू (1)– 26 मार्च
बुलडाणा – 45 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 28 मार्च
मुंबई – 40 वर्षीय महिलेचा मृत्यू – 28 मार्च

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई92988648725288
पुणे (शहर+ग्रामीण)39125164271097
ठाणे (शहर+ग्रामीण)61869264891646
पालघर 97444817188
रायगड84593731159
रत्नागिरी87060130
सिंधुदुर्ग2572055
सातारा170998168
सांगली59733015
नाशिक (शहर +ग्रामीण)70803847290
अहमदनगर (शहर+ग्रामीण)84852420
धुळे151783576
जळगाव 58103336345
नंदूरबार 27914911
सोलापूर39782076344
कोल्हापूर 112380720
औरंगाबाद82174042338
जालना98350647
हिंगोली 3412762
परभणी2001015
लातूर 66432533
उस्मानाबाद 38123414
बीड2201055
नांदेड 57225124
अकोला 1875146892
अमरावती 82361336
यवतमाळ 42428014
बुलडाणा 39920616
वाशिम 1731044
नागपूर2022136621
वर्धा 34141
भंडारा162890
गोंदिया 2101563
चंद्रपूर164960
गडचिरोली115661
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)195031
एकूण2,54,4271,40,32510,289

संबंधित बातम्या :

Pune Corona | पुण्यात कोरोनाचा पहिला बळी, पुणेकरांची चिंता वाढली

आईच्या औषधांसाठी निघालेल्या कॉन्स्टेबललाच पोलिस उपअधीक्षकांकडून मारहाण, बोटं फ्रॅक्चर

Corona LIVE: नागपूरच्या शासकीय रुग्णालयातील 9 डॉक्टर क्वारंन्टाईन

संबंधित व्हिडीओ:


Corona Suspects in Sangamner Ahmednagar

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *