AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Corona | पुण्यात कोरोनाचा पहिला बळी, पुणेकरांची चिंता वाढली

पुण्यात कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. कोरोनाबाधित 52 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला (Pune First death of corona positive ) आहे.

Pune Corona | पुण्यात कोरोनाचा पहिला बळी, पुणेकरांची चिंता वाढली
| Updated on: Mar 30, 2020 | 1:51 PM
Share

पुणे : पुण्यात कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. कोरोनाबाधित 52 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला (Pune First death of corona positive ) आहे. या रुग्णावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील कोरोनाचा हा पहिला बळी ठरला आहे, तर महाराष्ट्रातील कोरोनाबळींची संख्या 9 वर पोहोचली आहे. (Pune First death of corona positive )

पुण्यात आज मृत्यू झालेल्या कोरोना रुग्णाला विविध व्याधी होत्या. त्यामध्ये त्यांना कोरोनाचीही लागण झाली होती. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यात पहिला बळी गेल्याने पुणेकरांसाठी ही अत्यंत चिंतेची बाब आहे. पुण्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.

पुण्यात आतापर्यंत 31 कोरोनाचे रुग्ण होते, त्यातील 7 जणांवर उपचार करुन घरी सोडण्यात आलं तर आज एकाचा मृत्यू झाला.

कोरोनामुळे महाराष्ट्रात कुठे किती मृत्यू?

मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 17 मार्च मुंबई – 63 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 22 मार्च *मुंबई – फिलिपाईन्सच्या 68 वर्षीय वृद्धाचा मृत्यू– 23 मार्च (कोरोना निगेटिव्ह, मृत्यूचं कारण अन्य)* मुंबई – 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 23 मार्च मुंबई – एकाचा मृत्यू (1) -25 मार्च नवी मुंबई – वाशीतील 65 वर्षीय महिलेचा मृत्यू (1)– 26 मार्च मुंबई – 63 वर्षीय महिलेचा मृत्यू (1)– 26 मार्च बुलडाणा – 45 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 28 मार्च मुंबई – 40 वर्षीय महिलेचा मृत्यू – 28 मार्च

पुणे – 52 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू – 30 मार्च

महाराष्ट्रात कोरोनाचे वाढते रुग्ण

देशभरात लॉकडाऊन जारी केल्यानंतरही ‘कोरोना’ग्रस्तांचे आकडे वाढतानाच दिसत आहेत. महाराष्ट्रातील ‘कोरोना’बाधितांचा आकडा 215 वर पोहोचला आहे. मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, नाशिकमध्ये गेल्या बारा तासात नवे रुग्ण सापडले आहेत. (Rise in Maharashtra Corona Patients)

पुण्यात 5, मुंबईत 3, नागपुरात 2, तर कोल्हापूर-नाशिकमध्ये प्रत्येकी एक नवा रुग्ण सापडला आहे. आरोग्य विभागाने ही आकडेवारी जाहीर केली आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाचे 26 नवे रुग्ण सापडले आहेत.

संबंधित बातम्या 

महाराष्ट्रातील ‘कोरोना’बाधितांचा आकडा 215 वर, मुंबई-पुण्यात रुग्ण वाढतेच

Follow Us
मोठा खुलासा! अजित दादांच्या अपघातानंतर भोंदू खरातच्या संस्थेतून...
मोठा खुलासा! अजित दादांच्या अपघातानंतर भोंदू खरातच्या संस्थेतून....
सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच मोठ्या घडामोडी?
सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच मोठ्या घडामोडी?.
सुनेत्रा पवारांसाठी ठाकरे गट काय भूमिका घेणार? संजय राऊत काय म्हणाले?
सुनेत्रा पवारांसाठी ठाकरे गट काय भूमिका घेणार? संजय राऊत काय म्हणाले?.
पोटनिवडणूक बिनविरोधच होणार छगन भुजबळ यांचा ठाम विश्वास
पोटनिवडणूक बिनविरोधच होणार छगन भुजबळ यांचा ठाम विश्वास.
बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार
बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार.
माझी कोणतीही राजकीय चाल नाही, मी ओबीसी आंदोलक...
माझी कोणतीही राजकीय चाल नाही, मी ओबीसी आंदोलक....
सुनेत्रा पवार यांना पहिला मोठा दिलासा... लक्ष्मण हाकेंची अखेर माघार,
सुनेत्रा पवार यांना पहिला मोठा दिलासा... लक्ष्मण हाकेंची अखेर माघार,.
अशोक खरात CDR प्रकरणावरून राजकारण तापलं; दमानिया–अंधारे आमने-सामने
अशोक खरात CDR प्रकरणावरून राजकारण तापलं; दमानिया–अंधारे आमने-सामने.
खरातचे अनेक नेत्यांसोबत फोटो, पण आपल्याच पक्षातील...जय पवारांनी व्यक्त
खरातचे अनेक नेत्यांसोबत फोटो, पण आपल्याच पक्षातील...जय पवारांनी व्यक्त.
माजी आमदारांची महिलांबाबत बोलताना जीभ घसरली, माफी मागण्यासही दिला नका
माजी आमदारांची महिलांबाबत बोलताना जीभ घसरली, माफी मागण्यासही दिला नका.