आईच्या औषधांसाठी निघालेल्या कॉन्स्टेबललाच पोलिस उपअधीक्षकांकडून मारहाण, बोटं फ्रॅक्चर

आईच्या औषधाचे कारण सांगत असतानाच अक्कलकोटचे पोलिस उपअधीक्षक संतोष गायकवाड यांनी मागून येऊन मारहाण केली, असा आरोप जखमी पोलिस नाईक हरेकृष्ण चोरमुले यांनी केला आहे. (Solapur Police beaten during Lockdown)

आईच्या औषधांसाठी निघालेल्या कॉन्स्टेबललाच पोलिस उपअधीक्षकांकडून मारहाण, बोटं फ्रॅक्चर

सोलापूर : नाकाबंदीत आईचे औषध आणण्यासाठी सोलापूरकडे येणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला पोलिस उपअधीक्षकांनीच मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीत शहर पोलीस दलाचा कर्मचारी हरेकृष्ण भागवत चोरमुले यांच्या हाताची बोटं फ्रॅक्चर झाली आहेत. (Solapur Police beaten during Lockdown) ‘कोरोना’शी दोन हात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या 21 दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठीच सर्वसामान्य नागरिकांना घराबाहेर पडण्यास मुभा आहे.

सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत असलेल्या होटगी येथे नाकाबंदी सुरु असताना हा प्रकार घडला आहे. पोलिस मुख्यालयात नियुक्त असलेले सोलापूर शहर पोलिस दलाचे कॉन्स्टेबल हरेकृष्ण चोरमुले आईची औषधं आणण्यासाठी निघाले होते.

होटगी भागात ग्रामीण पोलिसांची नाकाबंदी सुरु असताना मी पोलीस कर्मचारी असल्याचं सांगितलं. आईच्या औषधाचे कारण सांगत असतानाच अक्कलकोटचे पोलिस उपअधीक्षक संतोष गायकवाड यांनी मागून येऊन मारहाण केली, असा आरोप जखमी पोलिस नाईक हरेकृष्ण चोरमुले यांनी केला आहे.

मला मारहाण होत असताना चक्कर आली, तरी ते मदत न करता निघून गेले, असा दावाही चोरमुले यांनी केला आहे. उजव्या आणि डाव्या पायाला मुका मार लागला, तर उजव्या हाताची तीन बोटं फॅक्चर झाल्याचं चोरमुले यांनी सांगितलं. वळसंग पोलिस स्टेशनमध्ये गेलो असता, पोलिस आयुक्तांच्या परवानगीशिवाय गुन्हा दाखल करणार नाही, असं सांगितलं गेल्याचा आरोपही चोरमुले यांनी केला आहे.

दरम्यान, चोरमुले यांनी ओळखपत्र किंवा मेडिकलचे कोणतेही कागदपत्र दाखवले नसल्याचा दावा अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी केला आहे. तरीही या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचं झेंडे यांनी म्हटलं आहे.

जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यास जायला पोलिसांची कोणतीही आडकाठी नाही. परंतु किमान तीन फुटांचे अंतर आणि तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे.

(Solapur Police beaten during Lockdown)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *