देशात 1071 कोरोना रुग्ण, सामूहिक संसर्गाची स्थिती नाही, आतापर्यंत 99 रुग्ण बरे : आरोग्य मंत्रालय

गेल्या 24 तासात 92 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 4 जणांचा 24 तासात मृत्यू झाला आहे," आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती (Health Minister Corona Virus Update) दिली आहे.

देशात 1071 कोरोना रुग्ण, सामूहिक संसर्गाची स्थिती नाही, आतापर्यंत 99 रुग्ण बरे : आरोग्य मंत्रालय
Follow us
| Updated on: Mar 30, 2020 | 6:41 PM

नवी दिल्ली : देशात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत (Health Minister Corona Virus Update) आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषद घेत देशातील कोरोनाची स्थिती, रुग्ण याबाबतची माहिती दिली. “भारतात कोरोना रुग्णांची संख्या 100 वरुन 1000 पर्यंत पोहचण्यासाठी 12 दिवस लागले. ज्यांची लोकसंख्या तुलनेने कमी आहे अशा प्रगत आणि विकसित देशात ही संख्या एवढ्याच काळात 8000 पर्यंत पोहचली. आपल्याकडील जनसहभाग आणि प्रतिबंधक उपायांमुळे हे शक्य झाले,” असे आरोग्य मंत्रालयातील संयुक्त सचिव म्हणाले.

“पण जर आता सोशल डिस्टंसिंग आणि लॉकडाऊन (Health Minister Corona Virus Update) दरम्यान एकाही व्यक्तीने सहकार्य केले नाही, तर आपले आतापर्यंतचे सर्व प्रयत्न व्यर्थ ठरतील. त्यामुळे जनतेने 100 टक्के सहकार्य करावे अशी आम्ही वारंवार विनंती करत आहोत,” असे आरोग्य मंत्रालयातील संयुक्त सचिव म्हणाले.

24 तासात 92 नवे रुग्ण, 4 मृत्यू

“भारतात आतापर्यंत 1 हजार 071 जण कोरोनाबाधित झाले आहेत. तर 29 जणांचा मृत्यू झाला आहे. यात गेल्या 24 तासात 92 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 4 जणांचा 24 तासात मृत्यू झाला आहे,” आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली आहे.

“विशेष म्हणजे देशात अजूनही सामूहिक संसर्गाची स्थिती नाही. तांत्रिकदृष्ट्या, आपला देश अजूनही स्थानिक संक्रमणाच्या स्थितीत आहे. दिलासादायक बाब म्हणजे कोरोनाच्या एकूण पॉझिटिव्ह रुग्णांपैकी आतापर्यंत 99 रुग्ण बरे झाले आहेत,” असेही संयुक्त सचिव म्हणाले.

लॉकडाऊनवर 24 तास लक्ष

“केंद्र सरकार, राज्यांसोबतच लॉकडाऊनच्या अंमलबजावणीकडे 24/7 लक्ष ठेवून आहे. लॉकडाऊनच्या नियमांचे बहुतेक ठिकाणी पालन होत आहे. जर देशातील सर्व राज्य, केंद्रशासित प्रदेशासह सर्व जनताही लॉकडाऊनची अंमलबजावणी करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्यावेळी त्यांनी आपण यशस्वीपणे ब्रेक द चेन करुन असेही म्हणाले.”

“कोणताही आजार त्याच्या सुरुवातीच्या काळातच, मुळापासून उखडून टाकला पाहिजे. सुरुवातीचे उपचार देखील महत्त्वाचे असून त्यामुळे या आजाराशी लढण्यात मोठा फरक पडणार आहे,” असे यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

स्थलांतरित मजुरांना अन्न निवाऱ्याची सोय करा

“स्थलांतरित कामागरांची स्थिती आता नियंत्रणात आली आहे. त्यांना अन्न आणि निवारा देण्यासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. स्थलांतरित मजुरांच्या अन्न आणि निवाऱ्याची व्यवस्था करण्याचे निर्देश केंद्र सरकारने सर्व राज्यांना दिले आहेत. तसेच, जे मजूर त्यांच्या कामाच्या ठिकाणी पोहचले आहेत. त्यांचे तिथेच विलगीकरण करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत,” असेही या पत्रकार परिषदेत म्हटलं.

“बरेलीमध्ये काही अतिउत्साही कर्मचाऱ्यांनी जे केले त्याची काहीही गरज नव्हती, अशा अधिकाऱ्यांना आधीच समज दिली गेली आहे. असे स्पष्टीकरण बरेली येथे काही स्थलांतरित मजुरांच्या अंगावर जंतूनाशकांची फवारणी करण्याच्या घटनेसंदर्भात दिलं आहे.”

“कोरोना विरुद्धच्या लढ्यात अनेक विभाग वेगवेगळ्या प्रकारे मदत करत आहेत. देशभरातील सर्व राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था विलगीकरण कक्षात रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. अत्यावश्यक वस्तू आणि सेवांचा पुरवठा समाधानकारक आहे. काही समस्या असल्यास त्या नियंत्रण कक्षातून सोडवल्या जात आहेत,” असेही त्यांनी सांगितले.

“ज्येष्ठ नागरिकांना कोरोना संसर्गाचा अधिक धोका आहे. त्यांनी सोशल डिस्टंसिंग आणि लॉकडाऊनच्या नियमांचे काळजीपूर्वक पालन करावे,” असेही संयुक्त सचिव (Health Minister Corona Virus Update) म्हणाले.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.