एसटी बंद, महिनाअखेर आला, पगार कसा? एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा मोठा प्रश्न सुटला

राज्यातील एक लाख एसटी कर्माचाऱ्यांना दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला (ST employee payment) आहे.

एसटी बंद, महिनाअखेर आला, पगार कसा? एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा मोठा प्रश्न सुटला

मुंबई : राज्यातील एक लाख सात हजार एसटी कर्माचाऱ्यांना दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला (ST employee payment) आहे. एक लाख सात हजार कर्माचाऱ्यांना मार्च महिन्यात एसटी महामंडळ पूर्ण पगार देणार आहे, असा निर्णय एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला. महामंडळाच्या या निर्णयाचे कामगार संघटनांनीसुद्धा स्वागत केलं (ST employee payment) आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. राज्यातही लॉकडाऊनसह संचारबंदी करण्यात आली आहे. या लॉकडाऊनमध्ये एसटी बसेसही बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे कर्माचाऱ्यांचा पगार काढायचा कसा असा प्रश्न उपस्थित झाला होता. पण यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावर तोडगा काढत कर्मचाऱ्यांना आनंदाचा निर्णय दिला.

राज्यात 250 डेपो आहेत. अठरा हजार एसटी बसेस आहेत. महामंडळात सुमारे एक लाख सात हजार कर्मचारी काम करतात. या लॉकडाऊनमध्ये मुंबई, ठाणे वगळता इतर सर्व ठिकाणी एसटी बस सेवा बंद करण्यात आली आहे.

लॉकडाऊनच्या घोषणेनंतर राज्यासह संपूर्ण देशातील सर्व सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे बंद आहे. केवळ अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्माचाऱ्यांसाठी वाहतूक सुरु आहे.

दरम्यान, राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. आतापर्यंत राज्यात 200 पेक्षा अधिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर देशात एक हजारच्या वर कोरोना रुग्णांचा आकडा पोहोचला आहे.


Published On - 5:05 pm, Mon, 30 March 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI