Bigg Boss Marathi 2 | शिव ठाकरे बिग बॉस 2 चां विजेता

बहुचर्चित ‘बिग बॉस मराठी’ (Bigg Boss Marathi 2) च्या दुसऱ्या पर्वाच्या विजेतेपदाच्या ट्रॉफीवर शिव ठाकरेने (Shiv Thackeray) आपले नाव कोरले आहे. अंतिम टप्प्यात शिव ठाकरे (Shiv Thackeray), वीणा जगताप (Veena Jagtap), नेहा शितोळे (Neha Shitole), शिवानी सुर्वे (Shivani Surve) किशोरी शहाणे-वीज (Kishori Shahane Veej) आणि आरोह वेलणकर (Aroh Velankar) यांच्यात जोरदार स्पर्धा झाली.

Bigg Boss Marathi 2 |  शिव ठाकरे बिग बॉस 2 चां विजेता
Follow us
| Updated on: Sep 01, 2019 | 11:58 PM

Bigg Boss Marathi 2 मुंबई : बहुचर्चित ‘बिग बॉस मराठी’ (Bigg Boss Marathi 2) च्या दुसऱ्या पर्वाच्या विजेतेपदाच्या ट्रॉफीवर शिव ठाकरेने (Shiv Thackeray) आपले नाव कोरले आहे. बिग बॉसचे होस्ट महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांनी त्याच्या नावाची घोषणा केली.  अंतिम टप्प्यात शिव ठाकरे (Shiv Thackeray), वीणा जगताप (Veena Jagtap), नेहा शितोळे (Neha Shitole), शिवानी सुर्वे (Shivani Surve) किशोरी शहाणे-वीज (Kishori Shahane Veej) आणि आरोह वेलणकर (Aroh Velankar) यांच्यात जोरदार स्पर्धा झाली. दरम्यान, सोशल मीडियावरही बिग बॉसच्या विजेतेपदाबाबत घमासान चर्चा झाली.

विशेष म्हणजे रविवारी (1 सप्टेंबर) बिग बॉसचा विजेता निवडण्यासाठी वोटिंग लाईन्स बंद झाल्या होत्या. मात्र, विविध मनोरंजन वाहिन्या आणि वेबसाईट्सनी बिग बॉसच्या चाहत्यांची उत्सुकता लक्षात घेत सोशल मीडियावर आपापले पोल्स घेतले होते. यात बहुतांश पोल्समध्ये प्रेक्षकांनी बहुमताने शिव ठाकरेला आपली पसंती दिली होती. आठवड्याभरात सहा जणांपैकी शिव ठाकरे वगळता इतर सर्व स्पर्धकांचा पसंतीक्रम बदलत गेला होता. मात्र शिवने निर्विवादपणे आपलं पहिलं स्थान अढळ ठेवलं.

रविवारी झालेल्या बिग बॉस मराठी ग्रँड फिनालेमध्ये बिग बॉसच्या घरातील अनेक स्पर्धकांनी नृत्याविष्कार सादर केला. काही ठिकाणी भावनिक क्षणही पाहायला मिळाले.

अखेरला शिव ठाकरे बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाची ट्रॉफी उंचावणार, असं जवळपास निश्चित मानलं जात होतं. अखेर त्यावर शिक्कामोर्तब झाला. शिवइतकीच नेहासुद्धा बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाच्या विजेतेपदाची प्रबळ दावेदार मानली जात होती. खेळातील चुरस कायम ठेवण्यासाठी त्या दोघांना टॉप 2 मध्ये ठेवण्याऐवजी नेहाला दुसऱ्या आणि वीणाला तिसऱ्या क्रमांकावर स्थान दिलं गेलं, असाही अंदाज चाहत्यांकडून लावण्यात आला होता.

खरं तर, दुसऱ्या स्थानासाठी वीणा, नेहा आणि शिवानी या दोघींमध्ये चढाओढ होती. पहिल्या चार क्रमांकावर असलेल्या स्पर्धकांमध्ये जबरदस्त रस्सीखेच सुरु होती. चौघांना मिळालेल्या मतांमध्ये फारसं अंतरही नव्हतं.

शिव ठाकरेचा रंजक प्रवास

शिव ठाकरे हा मूळ अमरावतीचा पठ्ठ्या. सुरुवातीपासूनच शिव ठाकरे याला प्रेक्षकांनी फेवरिट मानलं. ‘रोडीज्’ या रिअॅलिटी शोमधून आलेल्या शिवची सुरुवात काहीशी दबकत झाली. मात्र नंतर त्याने पकडलेला जोर कायम राहिला. शिवच्या उच्चारात विदर्भीय हेल असल्यामुळे तो काही वेळा चेष्टेचा धनी ठरला.

बिग बॉसचा पहिला कॅप्टन होण्याचा मान शिवने मिळवला होता. त्यानंतर टास्कमध्ये चांगली कामगिरी करत तो नॉमिनेशनपासूनही वाचत आला होता. या प्रवासात शिव दोन वेळा कॅप्टन झाला होता.

वीणासोबत जोडी जुळली

सुरुवातीला वीणा जगताप आणि शिव वेगवेगळ्या ग्रुपमध्ये होते, मात्र तिसऱ्या आठवड्यात दोघांमध्ये मैत्री जुळली. मध्यंतरीच्या काळात वीणासोबत त्याची जवळीक वाढल्यामुळे खेळावर परिणाम होत असल्याची प्रतिक्रिया प्रेक्षक आणि सहस्पर्धक यांच्यासोबतच सूत्रसंचालक महेश मांजरेकर (Mahesh Manjarekar) यांनीही दिली होती.

दिवसाच्या कोणत्याही प्रहरी त्यांचं फक्त एकमेकांसोबत असणं, सततच्या मिठ्या यामुळे मांजरेकरांनी संताप व्यक्त केला होता. अगदी फॅमिली वीकमध्ये आलेल्या शिवच्या बहीण आणि आईनेही त्याचे कान उपटले होते. त्यानंतर पुन्हा महेश मांजरेकरांनी कानउघाडणी केल्यावर शिव ताळ्यावर आला.

घरातील सर्वांशी मैत्री

बिग बॉसच्या घरात शिवचे फारसे कोणासोबत वाद झाले नाहीत. अभिजीत, वैशाली यांच्यासोबत त्याचं खास नातं होतं. माधव देवचक्केसोबतही त्याचे मैत्र जुळले होते. अभिजीत बिचुकले यांच्याशी त्याची गट्टी होती, तर सुरेखा पुणेकर यांनीही त्याला मुलगा मानलं होतं. रुपाली भोसलेला शिव ताई म्हणायचा, तर हीना पांचाळसोबतही त्याची खास मैत्री होती. पहिल्याच आठवड्यात बाद झालेल्या मैथिली जावकरने त्याला तिकीट टू फिनालेसाठी वोट केलं होतं.

आरोहच्या हाताचा चावा

पराग कान्हेरे, नेहा-शिवानी यांच्यासोबत झालेल्या वादांचा अपवाद वगळता शिवने फारशी कॉन्ट्रोव्हर्सी केली नव्हती. कॅप्टन्सी टास्कमध्ये तो आवेगात आरोहच्या हाताला चावला, तेव्हा मात्र सर्वांनीच शिवला रागे भरलं होतं. परंतु एकूणच शिव गेममध्ये लोकप्रिय ठरला.

‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वात अभिनेत्री मेघा धाडे विजेती ठरली होती. अंतिम दोन स्पर्धकांनी बिग बॉसच्या घरातील दिवे बंद करुन बाहेर पडण्याची परंपरा आहे. त्याप्रमाणे गेल्या पर्वात मेघा आणि अभिनेता पुष्कर जोग यांनी ही रित निभावली होती. यंदा शिव आणि वीणा या दोघांनी ही परंपरा पुढे नेली.

Non Stop LIVE Update
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.