भोपाळमध्ये गणपती विसर्जनादरम्यान नाव उलटली, 11 जणांचा मृत्यू

| Updated on: Sep 13, 2019 | 1:29 PM

भोपाळ : मध्य प्रदेशात शुक्रवारी गणपती विसर्जनादरम्यान एक मोठा अपघात झाला (Ganpati Visarjan). मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये गणपती विसर्जनावेळी एक नाव उलटली (Boat overturn in Bhopal). नाव उलटल्याने 18 लोक तलावात बुडाले. या अपघातात 11 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे (11 died in Bhopal boat overturn). तर एकजण अद्यापही बेपत्ता आहे. This happened in #bhopal […]

भोपाळमध्ये गणपती विसर्जनादरम्यान नाव उलटली, 11 जणांचा मृत्यू
Follow us on

भोपाळ : मध्य प्रदेशात शुक्रवारी गणपती विसर्जनादरम्यान एक मोठा अपघात झाला (Ganpati Visarjan). मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये गणपती विसर्जनावेळी एक नाव उलटली (Boat overturn in Bhopal). नाव उलटल्याने 18 लोक तलावात बुडाले. या अपघातात 11 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे (11 died in Bhopal boat overturn). तर एकजण अद्यापही बेपत्ता आहे.

या अपघातात आतापर्यंत सहा जणांना वाचवण्यात आलं आहे. भोपाळ येथील तलावात नाव उलटल्याने हा अपघात झाला. खाटलापुरा घाट जवळ पहाटे साडे चारच्या सुमारास ही अप्रिय घटना घडली. या दुर्घटनेचा तपास केला जाईल असं मध्य प्रदेशचे जनसंपर्क मंत्री पीसी शर्मा यांनी सांगितलं. तसेच, शर्मा यांनी मृतांच्या कुटुंबियांना चार लाख रुपयांची मदतही जाहीर केली.

NDRF, SDRF आणि होमगॉर्ड्सच्या टीमने आतापर्यंत 11 मृतदेहांना पाण्यातून बाहेर काढलं आहे. यामध्ये लहान मुलं आणि तरुणांचा समावेश आहे. तर आणखी काहीजण या अपघातात दगावल्याची भिची आहे. बेपत्ता लोकांचा शोध सुरु आहे, अशी माहिती रेस्क्यू ऑपरेशनमधील एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.

माहितीनुसार, खाटलापुरा घाटाजवळील तलावात ज्या नावेत गणपतीला विसर्जनासाठी नेण्यात येत होतं, ती नाव लहान होती आणि त्या तुलनेत मूर्ती मोठी झाली. यावेळी मूर्ती विसर्जनासाठी पाण्यात उतरवताना नाव एका बाजुने झुकली आणि पाहता पाहता पलटली. यादरम्यान नावेत असलेले भाविक मूर्तीच्या खाली आले आणि बुडाले.