Corona : ब्रिटीश अभिनेत्री हिलरी हीथचा कोरोनामुळे मृत्यू

| Updated on: Apr 11, 2020 | 3:09 PM

यामध्ये आता एका ब्रिटीश अभिनेत्रीचाही समावेश झाला आहे. ब्रिटीश अभिनेत्री हिलरी हीथ यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

Corona : ब्रिटीश अभिनेत्री हिलरी हीथचा कोरोनामुळे मृत्यू
Follow us on

लंडन : कोरोना विषाणूचा धोका दिवसेंदिवस (Corona Virus) वाढतच चालला आहे. जगभरात (Hilary Heath Died) या विषाणूने थैमान घातला आहे. कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्याही वाढतच चालली आहे. यामध्ये आता एका ब्रिटीश अभिनेत्रीचाही समावेश झाला आहे. ब्रिटीश अभिनेत्री हिलरी हीथ यांचा कोरोनामुळे (Hilary Heath Died) मृत्यू झाला आहे.

अभिनेत्री हिलरी हीथचा मृत्यू झाल्याची बातमी त्यांचा धर्म-पुत्र अॅलेक्स विलियम्सने फेसबुकच्या माध्यमातून दिली. गेल्या आठवड्यात 3 एप्रिलला त्यांनी अखेरचा (Hilary Heath Died) श्वास घेतला.

इंग्लंडच्या लिवरपूलमध्ये हिलरी हीथ यांचा जन्म झाला होता. त्या 74 वर्षाच्या होत्या. हिलरी या हॉरर सिनेमा  Witchfinder General मधील त्यांच्या सारा लोवेस या भूमिकेसाठी ओळखल्या जातात. त्यांनी 1968 मध्ये अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं.  Michael Reeves’ Witchfinder General हा त्यांचा पहिला सिनेमा होता. हिलरी या अनेक प्रसिद्ध सिनेमा आणि टीव्ही-शोच्या निर्मात्याही होत्या.

त्यांचे पहिले पती डंकन हीथ यांच्याशी 1989 मध्ये घटस्फोटानंतर त्यांनी अनेक सिनेमांची निर्मिती केली. हिलरी या लंडन स्टेजसोबतही जोडलेल्या होत्या. त्यांना लॉरा हीथ आणि डॅनिअल हीथ (Hilary Heath Died) ही दोन मुलं आहेत.

संबंधित बातम्या :

बीएमसीच्या मदतीसाठी अक्षय कुमार धावला, मास्क आणि टेस्टिंग किट्ससाठी 3 कोटींची मदत

फक्त आवाज द्या, ‘खाकी’ घालून तुमच्या खांद्याला खांदा लावून उभा राहतो, ‘सिंघम’ अजय देवगण पोलिसांसह मैदानात

‘रॉक ऑन’फेम अभिनेत्याला कोरोना, पत्नी-मुलांनाही लागण

स्पॉट बॉय ते फिल्म लाईन कामगार, 16 हजार कामगारांच्या खात्यात सलमानकडून थेट मदत जमा