स्पॉट बॉय ते फिल्म लाईन कामगार, 16 हजार कामगारांच्या खात्यात सलमानकडून थेट मदत जमा

सलमान खानने (Actor Salman Khan) आज 16,000 कामगारांच्या बँक खात्यात एकूण 4 कोटी 80 लाख रुपये ट्रान्सफर केले आहेत.

स्पॉट बॉय ते फिल्म लाईन कामगार, 16 हजार कामगारांच्या खात्यात सलमानकडून थेट मदत जमा

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानने (Actor Salman Khan) चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या कामागारांना दिलेलं वचन पूर्ण केलं आहे. सलमान खानने आज 16,000 कामगारांच्या बँक खात्यात एकूण 4 कोटी 80 लाख रुपये ट्रान्सफर केले आहेत. सलमान (Actor Salman Khan) मे महिन्यात आणखी 19,000 कामगारांना मदत करणार आहे.

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून देशात 21 दिवसांचं लॉकडाऊन घोषित करण्यात आलं आहे. लॉकडाऊनमुळे सर्व चित्रपट आणि मालिकांचेही चित्रिकरण बंद पडलं आहे. त्यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्या हजारो मजुरांचं मोठं नुकसान झालं आहे. या क्षेत्रातील हजारो मजुरांचं हातावरती पोट आहे. त्यामुळे अशा कामगारांना मदत करण्याची घोषणा सलमान खानने केली होती.

सलमान खानने सिनेसृष्टीतील कामगारांसाठी दोन महिन्यात 10 कोटी 50 लाख रुपयांची मदत करणार असल्याचं जाहीर केलं आहे. ही मदत तो दोन टप्प्यांमध्ये करत आहे. त्यातील पहिल्या टप्प्याची मदत त्याने केली आहे. दुसऱ्या टप्प्यात तो 5 कोटी 70 लाखांची मदत करणार आहे.

प्रत्येक मजुराच्या खात्यात 3000 रुपये

सलमान खान फिल्म प्रोडक्शनने फेडरेशन ऑफ वेर्स्टन इंडिया सिने इम्प्लॉयीजचे सचिव अशोक दुबे यांच्याजवळ चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या मजुरांचे बँक अकाउंट नंबर मागितले होते. यापैकी 19000 कामगारांच्या बँक अकाउंट संदर्भातील माहिती काल (6 एप्रिल) संध्याकाळी देण्यात आली. सलमानच्या ऑफिसमध्ये या कामगारांच्या बँक अकाउंटची माहिती मिळताच संपूर्ण टीम तातडीने कामाला लागली. टीमने आज संध्याकाळपर्यंत 16000 कामगारांच्या अकाउंटमध्ये प्रत्येकी 3000 रुपये जमा केले.

हेही वाचा :

Pune Curfew | पुणे पोलिसांचं आणखी एक कडक पाऊल, शहरात 5 ठिकाणी कर्फ्यू लागू

Maharashtra Corona Update | महाराष्ट्रात कोरोनाचा गुणाकार, रुग्णांची संख्या हजार पार!

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *