AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jishnu Dev Varma : कोण आहेत जिष्णू देव वर्मा? महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती

महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून जिष्णू देव वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते यापूर्वी तेलंगनाचे राज्यपाल होते. जिष्णू देव वर्मा हे मुळचे त्रिपुरामधील आहेत. त्यांनी आपल्या राजकीय कारकि‍र्दीला भाजपमधून सुरुवात केली.

Jishnu Dev Varma : कोण आहेत जिष्णू देव वर्मा? महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती
Jishnu Dev VermaImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 06, 2026 | 1:44 AM
Share

मोठी बातमी समोर येत आहे, महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून जिष्णू देव वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या आदेशानंतर अनेक राज्यांचे राज्यपाल बदलण्यात आले आहेत. त्या ठिकाणी नव्या राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे. आता जिष्णू देव वर्मा हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असणार आहेत. ते यापूर्वी तेलंगनाचे राज्यपाल होते. जिष्णू देव वर्मा यांनी त्रिपुरा राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून देखील जबाबदारी सांभाळली आहे. तसेच ते ऊर्जा, ग्रामविकास यासारख्या महत्त्वाच्या खात्यांचे मंत्री देखील होते. जिष्णू देव वर्मा हे त्रिपुरातील राजघराण्याशी संबंधित आहेत. त्यांच्या राजकीय कारकि‍र्दीला भाजपमधून सुरुवात झाली, त्यांनी त्रिपुरामध्ये डाव्यांचं वर्चस्व असून देखील त्या ठिकाणी भाजपाची मजबूत मोट बांधण्याचं काम केलं.

कोण आहेत जिष्णू देव वर्मा?

जिष्णू देव वर्मा हे मुळचे त्रिपुराचे आहेत. ते त्रिपुरामधील राजघराण्याशी संबंधित आहेत. त्यांचा जन्म 15 ऑगस्ट 1957 रोजी झाला. त्यांनी भाजपमधून आपल्या राजकीय कारकि‍र्दीला सुरुवात केली. त्यांनी 1990 च्या दशकात भाजपमध्ये प्रवेश केला, त्रिपुरामध्ये डाव्या पक्षांचं वर्चस्व असताना देखील त्यांनी त्याठिकाणी भाजपाचा जोरदार प्रचार केला. पक्ष संघटन मजबूत करण्याचं काम केलं. त्यांनी तीनदा 1996, 1998 आणि 1999 साली त्रिपुरा इस्ट या मतदारसंघातून निवडणूक जिंकली, दरम्यान ते काही काळ त्रिपुरा राज्याचे उपमुख्यमंत्री देखील होते. तसेच त्यांनी ऊर्जा, ग्रामविकास सारख्या महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी देखील सांभाळली आहे. त्यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी ते तेलंगनाचे राज्यपाल होते. दरम्यान जिष्णू देव वर्मा यांना साहित्य, आणि क्रीडा क्षेत्राची देखील आवड आहे, ते स्वत: एक चांगले लेखक आणि कवी आहेत.

इतरही राज्याचे राज्यपाल बदलले

दरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या आदेशानंतर महाराष्ट्रासोबतच इतरही काही राज्याचे राज्यपाल बदलण्यात आले आहेत, त्यामध्ये पश्चिम बंगाल, नागालँड, तामिळनाडू, बिहार, हिमाचल प्रदेश या सारख्या राज्यांचा समावेश आहे.लेफ्टनंट जनरल (निवृत्त) सय्यद अता हसनैन यांची बिहारचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर नंद किशोर यादव हे नागालँडचे नवे राज्यपाल असणार आहेत.

Follow Us
मतदार यादीतील फेरफारवरून उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर साधला निशाणा
उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप: महाराष्ट्रातून दोन कोटी मतदार वगळले, भविष्यात बनावट मतदारांचा धोका
डीजे परवानगीशिवाय वाजवला, पुण्यातील मंडळाला कोर्टाकडून दोषी ठरवून दंड
पुण्यात जुलूसदरम्यान अनधिकृत डीजे; अल मदिना यंग बॉईज सर्कलला कोर्टाचा दणका
जोरदार पावसामुळे दिल्लीतील प्रमुख मार्गांवर पाणी साचले, वाहतूक मंदावली
दिल्लीत मुसळधार पाऊस: सुब्रतो पार्क परिसरात भीषण वाहतूक कोंडी, जनजीवन विस्कळीत
सोनिया गांधी आत्मचरित्र बिलॉन्गिंग हार्परकॉलिन्स इंडिया प्रकाशित करणार
सोनिया गांधींच्या बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव आत्मचरित्राचा मार्ग मोकळा, हार्परकॉलिन्स करणार प्रकाशन
नागपूरनंतर आता सोलापूर आणि संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
नागपूरनंतर आता सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
गद्दार कोण आणि... हे जनतेनं दाखवलं, सरनाईकांचा विरोधकांना टोला
Pratap Sarnaik | गद्दार कोण आणि खुद्दार कोण हे जनतेनं दाखवलं, प्रताप सरनाईकांचा विरोधकांना टोला
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा भुजबळांना थेट इशारा
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा छगन भुजबळांना थेट इशारा
परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? बापटांचा सवाल
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? विद्यानंद बापटांचा धंगेकरांना थेट सवाल
जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा..
Satej Patil on Manoj Jarange Protest | जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा थेट इशारा; मराठा आरक्षणावरून सरकारवर घणाघात
पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर-बापट यांच्यात खडाजंगी
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर- विद्यानंद बापट यांच्यात खडाजंगी,  व्हिडीओ बघाच