AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Icc T20i World Cup 2026 : टीम इंडियाकडून फायनलमध्ये पोहचताच 2 वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक, श्रीलंकेसह पाकिस्तान-ऑस्ट्रेलियाला पछाडलं

Icc T20i World Cup Final : इंडिया टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत सर्वाधिक 4 वेळा पोहचणारी टीम ठरली आहे. टीम इंडियाने यासह खास कामगिरी करुन दाखवली आहे. टीम इंडियाने यासह इंग्लंड आणि पाकिस्तानला मागे टाकलं आहे. जाणून घ्या.

Icc T20i World Cup 2026 : टीम इंडियाकडून फायनलमध्ये पोहचताच 2 वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक, श्रीलंकेसह पाकिस्तान-ऑस्ट्रेलियाला पछाडलं
Varun Arshdeep Axar And Suryakumar Yadav Team IndiaImage Credit source: Bcci x Account
| Updated on: Mar 06, 2026 | 5:51 AM
Share

टीम इंडियाने गुरुवारी 5 मार्च रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक दिली. भारताने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात इंग्लंडवर 7 धावांनी मात करत फायनलमध्ये प्रवेश मिळवला. टीम इंडियाची ही टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहचण्याची सलग दुसरी वेळ तर एकूण चौथी वेळ ठरली. इंडिया यासह टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत सर्वाधिक वेळा पोहचणारी टीम ठरली. टीम इंडियाने यासह वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला आहे. तसेच यासह ब्लू आर्मीने ऑस्ट्रेलियाची मक्तेदारीही मोडीत काढली. टीम इंडियाने काय काय केलं? हे सविस्तर जाणून घेऊयात.

टीम इंडियाची टी 20i वर्ल्ड कप फायनलमध्ये पोहचण्याची ही सर्वाधिक चौथी वेळ ठरली आहे. टीम इंडिया 2026 आधी 2024, 2014 आणि 2007 साली फायनमध्ये पोहचली होती. टीम इंडियाने यासह संयुक्तरित्या सर्वाधिक 3 वेळा फायनलमध्ये पोहचण्याबाबत इंग्लंड आणि पाकिस्तानचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडीत काढला आहे.

इंडिया तिसरीच टीम

तसेच इंडिया टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत सलग दुसऱ्यांदा पोहचणारी एकूण आणि तिसरी आशियाई टीम ठरली. याआधी पाकिस्तान आणि श्रीलंकेने अशी कामगिरी करुन दाखवली. पाकिस्तानने 2007 आणि 2009 साली सलग 2 वेळा अंतिम फेरीत धडक दिली होती. तर श्रीलंकेने 2012 आणि 2014 साली फायनलमध्ये प्रवेश मिळवला होता. दोन्ही संघ अंतिम फेरीतील पहिल्याच प्रयत्नात ट्रॉफी जिंकण्यात अपयशी ठरले होते. मात्र या दोन्ही संघांनी दुसऱ्या प्रयत्नात विजय मिळवून वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवला होता.

ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक

टीम इंडियाची इंग्लंडला पराभूत करुन आयसीसीच्या कोणत्याही स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचण्याची ही सलग चौथी तर एकूण आणि सर्वाधिक 15 वी वेळ ठरली. भारताने यासह ऑस्ट्रेलियाचा सर्वाधिक 14 वेळा आयसीसी स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्याचा विश्व विक्रम आपल्या नावावर केला.

टीम इंडियाने इंग्लंडला पराभूत करण्याआधी 2023 च्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश मिळवला होता. भारताने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात 2024 साली टी 20I वर्ल्ड कप तर 2025 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचं विजेतेपद मिळवलं होतं.  तर आता टीम इंडियाने 2026 च्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. अशाप्रकारे भारताची आयसीसी स्पर्धेच्या अंतिम फेरीची वारी करण्याची ही 15 वी वेळ ठरली.

Follow Us
मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर...अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
Ambadas Danve | मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर... जरांगे पाटलांच्या खालावलेल्या प्रकृतीवर अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? रिसोडच्या तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप, नेमकं काय घडलं?
पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय?
Rohit Pawar On MPSC Pepar Leak | पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय? रोहित पवारांचा MPSC व्यवस्थेवर संताप
डीजे बंदीवरून राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत
Sanjay Raut | डीजे बंदीवरून संजय राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत म्हणत सरकारला घेरलं
आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया स
MPSC | आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया सुळे MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आक्रमक
15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! सदावर्तेंचं ठाकरेंना आव्हान
Gunratna Sadavarte | 15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! गुणरत्न सदावर्तेंचं उद्धव-राज ठाकरेंना थेट आव्हान; नाहीतर...
सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
Nitin Gadkari On Matdar | सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य; राजकीय वर्तुळात चर्चा
लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा
मोठी बातमी! लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा; महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?