AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vanchit Maharashtra Bandh : वंचितच्या महाराष्ट्र बंदमुळे काय परिस्थिती आहे? कुठे कडकडीत बंद, कसा प्रतिसाद जाणून घ्या

Vanchit Maharashtra Bandh : दिल्लीमधील जंतर-मंतर इथं विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज विरोधात आज वंचित बहुजन आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला डाव्या आघाडींचा पाठिंबा आहे.

Vanchit Maharashtra Bandh : वंचितच्या महाराष्ट्र बंदमुळे काय परिस्थिती आहे? कुठे कडकडीत बंद, कसा प्रतिसाद जाणून घ्या
Maharashtra Bandh
| Updated on: Jul 23, 2026 | 11:16 AM
Share

कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रकाश आंबेडकर यांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. ठाण्यातल्या इंदिरानगर भागात वंचितचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. तिथे वंचितच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं. या बंदला संपूर्ण महाराष्ट्रात कुठे,कसा प्रतिसाद मिळतोय ते जाणून घ्या. छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये कोणतीही परवानगी दिलेली नाही. शहरातील मुख्य चौकात पोलिसांच्या वतीने बंदोबस्त लावण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी थोड्याच वेळात रस्त्यावर उतरून बंदचं आवाहन करणार आहेत.

वंचित बहुजन आघाडीच्या विरार, वसई भागातील कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. महिला आघाडी जिल्हाध्यक्ष गीता जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्ते ताब्यात घेण्यात आले आहे. वंचित बहुजन आघाडीचे मुंबई प्रदेश अध्यक्ष चेतन अहिरे यांना विक्रोळी पोलिसानी ताब्यात घेतलं. विरार पूर्व स्टेशन परिसरात आंदोलन करताना वंचितच्या कार्यकर्त्यांना तात्काळ पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यांना विरार पोलीस ठाण्यात ठेवले आहे. आम्हाला आमचे आंदोलन करू द्या. आम्हाला ताब्यात घेवू नका, अशा भावना वंचितच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना सांगूनही त्यांना ताब्यात घेऊन आंदोलन मोडीत काढल्याने कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

Vanchit bandh

धाराशिवमध्ये काय स्थिती?

धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील मसा खंडेश्वरी येथे दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन आणि वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला पाठिंबा देत कार्यकर्त्यांनी येरमाळा–कळंब रोडवर चक्काजाम आंदोलन केले. या आंदोलनामुळे येरमाळा–कळंब मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. आंदोलनस्थळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शविला.

कोल्हापुरात काय स्थिती?

दिल्लीमधील जंतर-मंतर इथं विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज विरोधात आज वंचित बहुजन आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला डाव्या आघाडींचा पाठिंबा. कोल्हापुरात वंचित बहुजन आणि डाव्या आघाडी कडून महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी होण्यासाठी केलं जात आहे आवाहन. मध्यवर्ती बस स्थानक परिसरात दुकान बंद करण्याचं आवाहन केलं जात आहे.

अमरावतीमध्ये बंदला कसा प्रतिसाद?

नीट पेपरफुटी प्रकरणी दिल्लीतील ‘जंतरमंतर’ येथे शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीमार झाला. वंचित बहुजन आघाडीने आज राज्यव्यापी बंदचे आवाहन केलं आहे. या बंदला अमरावती जिल्ह्यात देखील प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. अमरावती शहरात पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे, तसेच ग्रामीण भागातील तिवसा शहर आणि दर्यापूर शहर सकाळपासून बंद आहे. या दोन्ही शहरातील सर्व दुकाने सकाळपासून बंद आहेत. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर दुपारी १२ वाजता भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे.अमरावती शहरात देखील बंदला संमिश्र प्रतिसाद पहायला मिळतो आहे.

Follow Us
'मी अजूनही जिवंत आहे'; सोनम वांगचुक यांचा रुग्णालयातून भावनिक व्हिडीओ,
'मी अजूनही जिवंत आहे'; सोनम वांगचुक यांचा रुग्णालयातून भावनिक व्हिडीओ, म्हणाले आजच उपोषण...
अण्णा हजारे मैदानात! CJP आंदोलनाला मोठा पाठिंबा; मौन आंदोलनाची घोषणा
Anna Hajare | दिल्लीनंतर अण्णा हजारे मैदानात! CJP आंदोलनाला मोठा पाठिंबा; सरकारविरोधात मौन आंदोलनाची घोषणा
गोदावरीच्या पुरात अडकले नेपाळचे पर्यटक! नेमकं काय घडलं?
Nashik Flood Rescue Operation | गोदावरीच्या पुरात अडकले नेपाळचे पर्यटक! नाशिकमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन, नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या घराकडे जाणारा रस्ता बंद! 16 मेट्रो स्थानकेही...
Jantar Mantar Students Protest | दिल्लीतील आंदोलनास्थळवरून अपडेट्स : धर्मेंद्र प्रधानांच्या घराकडे जाणारा रस्ता बंद! 16 मेट्रो स्थानकेही बंद
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागेल, नरेंद्र मोदींच्या घोषणेनंतर कॉकरोच जनता पार्टीची थेट पोस्ट...

धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागेल, नरेंद्र मोदींच्या घोषणेनंतर कॉकरोच जनता पार्टीची थेट पोस्ट..

सरकारची मोठी घोषणा! नीट परीक्षा पेपरफुटीत थेट निर्णय, नरेंद्र मोदी यांनी...

सरकारची मोठी घोषणा! नीट परीक्षा पेपरफुटीत थेट निर्णय, नरेंद्र मोदी यांनी..

तो फोटो ठरला ‘क्लू’, 3 वर्षांचा शोध संपला; बेपत्ता मुलाची अखेर कुटुंबियांशी भेट, पोलिसांमुळे चेहऱ्यावर फुललं हास्य !.

तो फोटो ठरला ‘क्लू’, 3 वर्षांचा शोध संपला; बेपत्ता मुलाची अखेर कुटुंबियांशी भेट, पोलिसांमुळे चेहऱ्यावर फुललं हास्य !

हमारी छोरिया छोरो से कम नहीं.. मुंबईत तरुणीने थेट अडवली पोलिसांची गाडी.

हमारी छोरिया छोरो से कम नहीं.. मुंबईत तरुणीने थेट अडवली पोलिसांची गाडी

Gold Rate Today: सोन्याने पुन्हा घेतली भरारी ! किती महागलं सोनं-चांदी ? आज 1 तोळा सोन्याचे दर...

Gold Rate Today: सोन्याने पुन्हा घेतली भरारी ! किती महागलं सोनं-चांदी ? आज 1 तोळा सोन्याचे दर..

मुलांची डोकी फुटताना बघून आनंदाच्या उकळ्या फुटत असतील तर..; समीर चौघुलेंकडून तीव्र संताप व्यक्त.

मुलांची डोकी फुटताना बघून आनंदाच्या उकळ्या फुटत असतील तर..; समीर चौघुलेंकडून तीव्र संताप व्यक्त