AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CJP Protest: टोकदार दगडांचा मारा, काचेच्या फेकल्या बाटल्या … विद्यार्थ्यांच्या आडून पोलिसांवर कुणाकडून हल्ला? हाती लागला महत्त्वाचा पुरावा

Delhi Police Jantar Mantar CJP Protest: विद्यार्थी आंदोलनाची धग आता देशभरात पसरली आहे. त्याचवेळी दिल्लीत पोलिसांवरही हल्ले वाढले आहेत. अणकुचीदार दगड, काचेच्या बाटल्या फेकून हल्ला वाढला आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या हाती महत्त्वाचा पुरावा लागला आहे. काय आढळले CCTV मध्ये?

CJP Protest: टोकदार दगडांचा मारा, काचेच्या फेकल्या बाटल्या ... विद्यार्थ्यांच्या आडून पोलिसांवर कुणाकडून हल्ला? हाती लागला महत्त्वाचा पुरावा
सीजेपी आंदोलन, दगडफेक, दिल्ली पोलीस
| Updated on: Jul 23, 2026 | 11:09 AM
Share

Delhi Jantar Mantar Clash: देशाची राजधानी दिल्लीतील जंतरमंतर हे विद्यार्थी चळवळीचे केंद्र ठरले आहे. आता आंदोलनाला भावनिक साद घातली जात आहे. देशभरातून त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. पण त्याचवेळी पोलिसांवर टोकदार दगड आणि काचेच्या बाटल्या फेकून हल्ले वाढले आहे. विद्यार्थी आंदोलनच्या आडून काही असामाजिक तत्त्वे वातावरण कलुषित करण्याचे प्रयत्न करत असल्याचा दिल्ली पोलिसांचा दावा आहे. हे गुंड आणि असामाजित तत्त्व सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर आले आहेत. शांततापूर्ण आंदोलनाचा काही गुंड ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप सुरक्षा यंत्रणांनी केला आहे. हे गुंड विद्यार्थ्यांच्या गर्दीत घुसतात आणि विद्यार्थ्यांना भडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करण्यात आला. त्यातूनच पोलिसांवर हल्ले होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. पोलिसांच्या हाती काही सीसीटीव्ही फुटेज लागले आहेत. त्यात ही असामाजिक मंडळी जमा झाल्याचे दिसत आहे. आता ते कोण आहेत आणि त्यांना हे करण्यासाठी कोण मदत करत आहेत, याचा तपास पोलीस करत आहेत.

अचानक दगडांचा मारा आणि वर्दीवर हल्ला

सध्या यासंबंधीचे काही व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. त्यात काही असामाजिक तत्व गर्दीचा फायदा घेत पोलिसांवर हल्ला करताना दिसत आहेत. ते दुरून दगडफेक करतानाचे व्हिडिओही समोर आले आहेत. पोलीस दिसले की अचानक दगडांचा वर्षाव करण्यात येतो. हे दगडही अणकुचीदार असतात. काही ठिकाणी काचेच्या, प्लास्टिकच्या बाटल्या मारून फेकण्यात येत आहे. या हल्ल्यामुळे अचानक गोंधळ उडतो. त्याचा फायदा घेत हे गुंड पळ काढतात.

जनपथ पेट्रोल पंपावरील CCTV फुटेजमध्ये काय?

या हल्ल्ल्यासंबंधीचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. हे फुटेज 20 जुलै रोजीचे आहे. जनपथ येथील एका पेट्रोल पंपावरील सीसीटीव्हीत ते कैद झाले आहेत. या सीसीटीव्हीत स्पष्ट दिसत आहेत की आंदोलकांच्या गर्दीत काही असमाजिक तत्त्व घुसतात आणि जोरदार दगडफेक करतात. या फुटेजमध्ये पोलीस कर्मचारी हे दगडफेकीपासून बचावासाठी पळताना दिसत आहेत. दगडफेक करणारे हे पोलीस कर्मचाऱ्यांना लक्ष करत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहेत. या गुंडांचा आंदोलकांशी काहीही संबंध नसल्याचे समोर येत आहे. आता पोलिसांनी या फुटेजच्या मदतीने अशा तरुणांची धरपकड सुरू केली आहे. पुढील तपास करण्यात येत आहे.

आरएमएल रुग्णालयात पोहचेल विशेष पोलीस आयुक्त

22 जुलै रोजी जंतर मंतर परिसरात पुन्हा दगडफेक करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या गर्दीचा फायदा घेत काही लोकांनी दगडफेक केली. त्यात काही पोलीस कर्मचारी जखमी झाले. त्यानंतर काल आणि आज विशेष पोलीस आयुक्त देवेश चंद्र श्रीवास्तव आरएमएल रुग्णालयात पोहचले आणि त्यांनी जखमी पोलिसांची विचारपूस केली. अशा असामाजिक तत्तांविरोधात कडक कारवाईचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच