AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नांदेड शेतकरी मृत्यू प्रकरणात पोलिसांसमोर मोठं चॅलेंज, मुख्य आरोपी अजूनही फरार

नांदेडमधील शेतकरी चंद्रकांत शिंदे यांच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ उडाली आहे. केएफ फायनान्स कंपनीच्या कार्यालयात त्यांचा मृतदेह आढळला. केवळ ७ हजारांच्या कर्जासाठी ७५ हजारांची मागणी झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप आहे. पोलिसांनी अपहरण आणि खुनाचा गुन्हा दाखल करून तीन संशयितांना अटक केली आहे, तर मुख्य सूत्रधार अजूनही फरार आहे. या प्रकरणी सध्या तपास सुरू आहे.

नांदेड शेतकरी मृत्यू प्रकरणात पोलिसांसमोर मोठं चॅलेंज, मुख्य आरोपी अजूनही फरार
| Updated on: Oct 26, 2026 | 4:57 PM
Share

नांदेडमधील  शेतकरी चंद्रकांत शिंदे यांच्या मृत्यूमुळे राज्.भरात मोठी खळबळ माजली असून हे प्रकरण चांगलंच चर्चेत आलं आहे. एका फायनान्स कंपनीच्या कार्यालयात शिंदे यांचा मृतदेह आढळल्याने सगळेच हादरले. चंद्रकांत यांच्या मृत्यूने कुटुंबाला मोठा धक्का बसला, त्यांच्यावर तर दु:खाचा डोंगरच कोसळला. दरम्यान फायनान्स कंपनीच्या कार्यालयात त्यांचा मृतदेह आढळल्यानंतर अपहरण आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी वेगान तपास करत तीन संशयितांना ताब्यात घेतलं होतं. आता याच प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे

शिंदे यांच्या खून प्रकरणातील तीन आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. तर मुख्य सूत्रधार असलेला केएफ फायनान्सचा संचालक अजूनही फरारच आहे. त्याचा कसून शोध घेण्यात येत असून पोलिसांची अनेक पथके त्याच्या मागावर आहेत.

कार्यालयात सापडला मृतदेह

शनिवारी नांदेडमधील हिंगोली गेट परिसरातील फायनान्स कंपनीच्या कार्यालयात शिंदे यांचा गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला होता. मात्र आमच्या मुलाने आत्महत्या केली नाही तर हा खून आहे, असा आरोप कुटुंबियांनी केला. चंद्रकांत यांनी केवळ 7 हजारांचं कर्ज घेतलं होतं, मात्र त्यांच्याकडे 75 हजार रुपयांची मागणी केली जात होती, असा दावा नातेवाइकांनी केला आहे. तसेच त्यांच्या मृत्यूच्या दोन दिवस आधी त्यांना माळकौठा गावातून फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी अपहरण केलं आणि नांदेडमधील कार्यालयात डांबून ठेवल्याचा आरोप नातेवाइकांनी केला.  त्यांना मारहाण करून त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोपही कुटुंबीयांनी केला आहे.  यानंतर वजिराबाद पोलीस ठाण्यात अपहरण आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपींना तीन दिवसांची कोठडी

या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवली. वजिराबाद पोलिसांनी खून आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करून तीन आरोपींना अटक केली होती. त्याच तीन आरोपींना आज पोलिसांनी न्यायालयात हजर केलं. त्यावेळी न्यायालयाने तिन्ही आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

आरोपी जयकुमार उर्फ शेरा गायकवाड,शेख अमीर शेख हुसेन या दोघांनी माळकौठा गावातून शेतकरी चंद्रकांत शिंदे यांचे अपहरण केलं होतं. इम्रान खान शहबाज खान याने वसुलीसाठी सक्ती केली असा आरोप आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार केएफ फायनान्सचा संचालक अजून फरार आहे. मुख्य आरोपीच्या शोधासाठी एलसीबीची सहा पथक आणि गुन्हे शाखेची दोन पथक ठीक ठिकाणी रवाना झाली आहेत.

Follow Us
500 कोटींची AI ऑडिओ क्लिप... मनोज जरांगे स्पष्टच बोलले, क्लिप बनवणारा.
500 कोटींची AI ऑडिओ क्लिप... मनोज जरांगे स्पष्टच बोलले, ही क्लिप बनवणाऱ्या व्यक्तीबाबत मोठी माहिती
महाराष्ट्राच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य! तेलंगणाला सहकार्य करताना...
महाराष्ट्राच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य! तेलंगणाला सहकार्य करताना फडणवीसांची स्पष्ट भूमिका
महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर-शिक्षक मतदारसंघांची उद्या मतमोजणी;
LIVE Vote Counting of MLC Election Results 2026 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर-शिक्षक मतदारसंघांची उद्या मतमोजणी; LIVE अपडेट्स एका क्लिकवर!
मुंबईकरांचा लोकल प्रवास रखडला! मध्य रेल्वेची वाहतूक अजूनही विस्कळीत,
मुंबईकरांचा लोकल प्रवास रखडला! मध्य रेल्वेची वाहतूक अजूनही विस्कळीत, कारण...
आई तुळजाभवानीची मंचकी निद्रा पूर्ण, पहाटे पुन्हा सिंहासनावर विराजमान
Tulja Bhavani Temple : आई तुळजाभवानीची मंचकी निद्रा पूर्ण, पहाटे पुन्हा सिंहासनावर विराजमान; तुळजापुरात भक्तीमय वातावरण
मुलुंड ते ठाणे, कांजूर ते भांडूप… मध्य रेल्वेची सिग्नल यंत्रणा बिघडली
Mumbai Local Train Update : मुलुंड ते ठाणे, कांजूर ते भांडूप… मध्य रेल्वेची सिग्नल यंत्रणा बिघडली; चाकरमान्यांचे हाल
महाराष्ट्र माझ्या हातात सत्ता कधी देतोय… ठाकरेंनी व्यक्त केली अपेक्षा
Raj Thackeray : महाराष्ट्र माझ्या हातात सत्ता कधी देतोय… राज ठाकरेंनी व्यक्त केली अपेक्षा; नेमकं काय म्हणाले?
तो GDP चाटायचा का? राज ठाकरेंचा सरकारला खरमरीत सवाल
Raj Thackeray : तो GDP चाटायचा का? राज ठाकरेंचा सरकारला खरमरीत सवाल; शहरांच्या नियोजनावर संताप
पाटण्यातील काँग्रेस कार्यक्रमात नेमकं काय घडलं? मोदींच्या वडिलांवरील..
Mallikarjun Kharge : पाटण्यातील काँग्रेस कार्यक्रमात नेमकं काय घडलं? मोदींच्या वडिलांवरील वक्तव्याने राजकीय वाद पेटला
शिंदे-फडणवीसांमध्ये मोठी खदखद, मनोज जरांगे पाटलांचा दावा
Manoj Jarange Patil : शिंदे-फडणवीसांमध्ये मोठी खदखद, मनोज जरांगे पाटलांचा दावा; ऑडिओ क्लिपवरून राजकारण तापलं