AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑडिओ क्लिपमधली ती बाई…, अखेर मनोज जरांगेंकडून माहिती उघड, सगळंच सांगितलं

मनोज जरांगे पाटील यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी पुन्हा एकदा मोठा खुलासा केला आहे. तसेच या प्रकरणात सत्य बाहेर आलं पाहिजे, अशी विनंती देखील त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे.

ऑडिओ क्लिपमधली ती बाई..., अखेर मनोज जरांगेंकडून माहिती उघड, सगळंच सांगितलं
manoj jarange Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 26, 2026 | 4:44 PM
Share

काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी एक ऑडिओ क्लिप ऐकवली होती. या  कथित ऑडिओ क्लिपमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांना देण्यासाठी भाजपकडून 500 कोटी रुपये घेतल्याचं म्हटलं होतं. दरम्यान यावरून आता वातावरण चांगलंच तापलं आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये एका महिलेचा देखील आवाज आहे. याबाबत बोलताना आता मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना  मोठं विधान केलं आहे.

नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील?

हे सगळं प्लॅनिग देवेंद्र फडणवीस यांना माहिती नाही अशी चर्चा आहे. मात्र या ऑडिओ क्लिपमुळे अनेकांचं राजकीय करिअर पणाला लागलं आहे. एकनाथ शिंदे यांनी पैसे घेतले नाहीत, त्यामुळे आता ते पण सोडणार नाहीत. मग ती ऑडिओ क्लिपमधील बाई असं म्हणलीच कसं काय? अशी माहिती मिळतीये की ती बाई पण लहान नाहीये. ती पण मोठ्या नेटवर्कमधील आहे, ती पण खोटं बोलणार नाही, अशी चर्चा आहे. मग जर शिंदे साहेंबानी पैसे घेतले नाहीत तर शिंदे साहेब त्या बाईंना पण सोडणार नाहीत कारण या प्रकरणामुळे एकनाथ शिंदे यांना त्रास झाला आहे.

उलट त्यांनी मराठा समाजाचे आभार मानले पाहिजेत, आम्ही हे सर्व बाहेर काढलं त्यामुळे त्यांची प्रतिष्ठा वाचली. जर आम्ही हे सगळं उघडं पाडलं नसतं तर यांनी पाठीमागे किती प्लॅन रचले असते. आता ते त्यांच्यातल्या त्यांच्यात एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र हे सगळं खरं आहे, मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील विनंती करतो की, हे सगळं सत्य समोर आलं पाहिजे, आणि आता या प्रकरणात फडणवीस यांचा देखील कस लागणार आहे. कारण हे सोपं नाहीये, त्यांना त्यांच्याच लोकांविरोधात लढायचं आहे, ते चुकीच्या लोकांविरोधात लढणार का? ते जर चुकीच्या लोकांविरोधात लढले तर तो खरा खमक्या माणूस असं मी म्हणेन, असंही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

Follow Us
महाराष्ट्राच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य! तेलंगणाला सहकार्य करताना...
महाराष्ट्राच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य! तेलंगणाला सहकार्य करताना फडणवीसांची स्पष्ट भूमिका
महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर-शिक्षक मतदारसंघांची उद्या मतमोजणी;
LIVE Vote Counting of MLC Election Results 2026 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर-शिक्षक मतदारसंघांची उद्या मतमोजणी; LIVE अपडेट्स एका क्लिकवर!
मुंबईकरांचा लोकल प्रवास रखडला! मध्य रेल्वेची वाहतूक अजूनही विस्कळीत,
मुंबईकरांचा लोकल प्रवास रखडला! मध्य रेल्वेची वाहतूक अजूनही विस्कळीत, कारण...
आई तुळजाभवानीची मंचकी निद्रा पूर्ण, पहाटे पुन्हा सिंहासनावर विराजमान
Tulja Bhavani Temple : आई तुळजाभवानीची मंचकी निद्रा पूर्ण, पहाटे पुन्हा सिंहासनावर विराजमान; तुळजापुरात भक्तीमय वातावरण
मुलुंड ते ठाणे, कांजूर ते भांडूप… मध्य रेल्वेची सिग्नल यंत्रणा बिघडली
Mumbai Local Train Update : मुलुंड ते ठाणे, कांजूर ते भांडूप… मध्य रेल्वेची सिग्नल यंत्रणा बिघडली; चाकरमान्यांचे हाल
महाराष्ट्र माझ्या हातात सत्ता कधी देतोय… ठाकरेंनी व्यक्त केली अपेक्षा
Raj Thackeray : महाराष्ट्र माझ्या हातात सत्ता कधी देतोय… राज ठाकरेंनी व्यक्त केली अपेक्षा; नेमकं काय म्हणाले?
तो GDP चाटायचा का? राज ठाकरेंचा सरकारला खरमरीत सवाल
Raj Thackeray : तो GDP चाटायचा का? राज ठाकरेंचा सरकारला खरमरीत सवाल; शहरांच्या नियोजनावर संताप
पाटण्यातील काँग्रेस कार्यक्रमात नेमकं काय घडलं? मोदींच्या वडिलांवरील..
Mallikarjun Kharge : पाटण्यातील काँग्रेस कार्यक्रमात नेमकं काय घडलं? मोदींच्या वडिलांवरील वक्तव्याने राजकीय वाद पेटला
शिंदे-फडणवीसांमध्ये मोठी खदखद, मनोज जरांगे पाटलांचा दावा
Manoj Jarange Patil : शिंदे-फडणवीसांमध्ये मोठी खदखद, मनोज जरांगे पाटलांचा दावा; ऑडिओ क्लिपवरून राजकारण तापलं
मुंबईकरांचा खोळंबा, कांजूरमार्गजवळ ओव्हरहेड वायरवर कपडा पडला; लोकल....
Mumbai Local Update : मुंबईकरांचा खोळंबा, कांजूरमार्गजवळ ओव्हरहेड वायरवर कपडा पडला; लोकल 30 ते 45 मिनिटे उशिराने