Nana Patekar : ते शिव्या द्यायचे, ओरडायचे…नाना पाटेकर यांच्याबद्दल ज्येष्ठ पत्रकाराचं वक्तव्य
Chaitanya Padukone On Nana Patekar : नाना पाटेकर यांच्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार चैतन्य पादुकोण यांनी भाष्य केलं आहे.

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडणारे नाना पाटेकर यांचं 8 ऑक्टोबर रोजी वयाच्या 75व्या वर्षी निधन झालं. नाना पाटेकर यांच्या निधनावर अनेक कलाकारांनी शोक व्यक्त करत त्यांच्या आठवणी शेअर केल्या. नाना पाटेकर शिस्तप्रिय होते आणि हा अनुभव अनेक कलाकारांना आलेला आहे. अशातच आता पत्रकार चैतन्य पादुकोण यांनी नाना पाटेकर यांच्या आठवणी शेअर केल्या आहेत.
नाना पाटेकर यांच्याबद्दल बोलताना चैतन्य पादुकोण म्हणाले की, ‘नाना पाटेकर स्पष्टवक्ते होते. त्यांना जर एखादी गोष्ट आवडली तर ते त्याचं कौतुक करायचे आणि जर नाही आवडली तर सरळ तोंडावर बोलायचे. त्यांनी शाहरुख खानला पण अभिनयाचे धडे दिलेले. आपण कसे दिसतो हे त्यांना महत्वाचं नव्हतं. त्यांच्यासाठी अभिनय महत्वाचा होता. त्यांना माणसांची आणि शेतकऱ्यांची खूप काळजी असायची. ते त्यांना मिळणारं अर्ध–अधिक मानधन गरजूंना, आश्रमात द्यायचे. त्याची कधीच ते पब्लिसिटी करायचे नाहीत. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठीही त्यांनी आणि मकरंद अनासपुरे यांनी मदत केली आहे. तो कधीच खोटं कौतुक करायचे नाहीत. ते कधीच राजकारणातही गेले नाहीत. त्यांना अनेक पक्षांकडून विचारणा झालेली. पण, त्यांनी अभिनेता म्हणून लोकांची सेवा करायचं ठरवलं. त्यांना क्रिकेटही खूप आवडायचं.
‘ते खूप शिस्तप्रिय होते. कोणी उशीरा आलेलं, त्यांना चालायचं नाही. ते शिव्या द्यायचे, ओरडायचे, पण तेसुद्धा प्रेमाने. समोरच्यालाही ते नंतर समजायचं. एका सिनेमाच्या प्रमोशनदरम्यानही मुख्य अभिनेत्रीला उशीर झालेला. त्या कार्यक्रमातूनही नाना पाटेकर निघून गेलेले.’ असंही चैतन्य यांनी शेवटी सांगितलं. ‘पिंकविला‘ला दिलेल्या मुलाखतीत चैतन्य पादुकोण बोलत होते.
दरम्यान, नाना पाटेकर यांना गोव्यातील घरी हृदयविकाराचा झटका आला. त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर 45 मिनिटे सीपीआर देण्यात आला. मात्र, नाना पाटेकर यांना वाचवता आलं नाही. पुण्यातील डोणजे येथील फार्महाऊसवर नाना पाटेकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
