Jantar Mantar Students Protest | दिल्लीतील आंदोलनास्थळवरून अपडेट्स : धर्मेंद्र प्रधानांच्या घराकडे जाणारा रस्ता बंद! 16 मेट्रो स्थानकेही बंद
दिल्लीतील CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजधानीतील सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली आहे. आंदोलनाचा परिणाम दिल्ली मेट्रो सेवेसह काही संवेदनशील भागांवरही दिसून येत असून, दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (DMRC) ने आजही 16 मेट्रो स्थानके बंद ठेवण्याचा निर्णय कायम ठेवला आहे.
दिल्लीतील CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजधानीतील सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली आहे. आंदोलनाचा परिणाम दिल्ली मेट्रो सेवेसह काही संवेदनशील भागांवरही दिसून येत असून, दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (DMRC) ने आजही 16 मेट्रो स्थानके बंद ठेवण्याचा निर्णय कायम ठेवला आहे.
सुरक्षा कारणास्तव या स्थानकांवर प्रवाशांच्या प्रवेश आणि बाहेर पडण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील विविध भागांमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान, आंदोलनकर्त्यांकडून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत असल्याने त्यांच्या दिल्लीतील अधिकृत निवासस्थानाकडे जाणारा रस्ता पोलिसांनी बंद केला आहे. परिसरात मोठ्या प्रमाणावर बॅरिकेडिंग करण्यात आली असून, सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.
याचबरोबर, सोशल मीडियावर सुरू असलेल्या ट्रोलिंगच्या पार्श्वभूमीवर धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने आपले इन्स्टाग्राम खाते बंद केल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नसली तरी, सोशल मीडियावरील वाढत्या प्रतिक्रियांमुळे हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.
दरम्यान, दिल्लीतील आंदोलन, वाढलेली सुरक्षा व्यवस्था आणि त्यानंतर घडणाऱ्या घडामोडींमुळे राजधानीतील राजकीय वातावरण अधिक तापले असून, पुढील निर्णयांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Published on: Jul 23, 2026 10:24 AM
रामदास कदमांना एकनाथ शिंदेंचा फोन? माध्यमांशी बोलणं टाळा... - सूत्र
पालिकेत पाणी कपातीवरून भाजप-शिवसेनेत जोरदार खडाजंगी
सुशील कुलकर्णीचा माज की उदयनराजेंची अवहेलना? अंधारेंचा सवाल
32 मिनिटांची क्लिप पुन्हा पुन्हा ऐकली; भास्कर जाधवांचा मोठा दावा....

