AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागेल, नरेंद्र मोदींच्या घोषणेनंतर कॉकरोच जनता पार्टीची थेट पोस्ट..

कॉकरोच जनता पार्टीकडून जंतर मंतरवर आंदोलन केले जात आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. यामध्येच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली. त्यांच्या या घोषणेनंतर कॉकरोच जनता पार्टीने एक पोस्ट शेअर केली.

धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागेल, नरेंद्र मोदींच्या घोषणेनंतर कॉकरोच जनता पार्टीची थेट पोस्ट..
Narendra Modi and Cockroach Janata Party
| Updated on: Jul 23, 2026 | 11:06 AM
Share

दिल्लीतील जंतर मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू आहे. गेल्या महिन्याभरापासून आंदोलन सुरू आहे. मात्र, सोमवारी या आंदोलनाला हिंसक वळण आले. थेट संसद भवनावर मोर्चा काढण्यात आला. ज्यामुळे तणाव निर्माण झाला. नीट परीक्षेच्या पेपरफुटीच्या मुद्द्यात हे आंदोलन सुरू आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रसाद यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. या आंदोलनाची व्याप्ती वाढत आहे. देशातील अनेक शहरात विद्यार्थ्यांकडून आंदोलन केले जातंय. यादरम्यानच आता सरकारने मोठा निर्णय घेतला. या नीट पेपरफुटीच्या मुद्द्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत घोषणा केली. फास्ट-ट्रॅक कोर्टाची या प्रकरणात स्थापना करण्यात आली. देशातील तरुणांचे हित आणि त्यांचे भविष्य हेच आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे, असे असेही नरेंद्र मोदी यांनी म्हटले. दोषींची गय केली जाणार नसल्याचे त्यांनी म्हटले.

याबाबतचे आदेश दिल्याचे नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले. मात्र, नरेंद्र मोदी यांची ही घोषणा कॉकरोच जनता पार्टीला पटली नाही. फास्ट-ट्रॅक कोर्टात या पेपरफुटीची सुनावणी होणार आहे. मात्र, नरेंद्र मोदी यांच्या या घोषणेनंतर कॉकरोच जनता पार्टीने थेट केंद्रीय शिक्षण मंत्री यांचा राजीनामा म्हणत पोस्ट शेअर केली. कॉकरोच जनता पार्टी अजूनही धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर ठाम आहे. नरेंद्र मोदी यांची पोस्ट रिपोस्ट शेअर कॉकरोच जनता पार्टीने केली.

धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागेल, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले. म्हणजेच नरेंद्र मोदी यांच्या या घोषणेनंतरही कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरूच राहणार आहे. त्यांच्याकडून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. मोदींना प्रतिउत्तर कॉकरोच जनता पार्टीकडून देण्यात आले.

आंदोलनाची व्याप्ती वाढत आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढत आहे. मात्र, सरकारकडून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबद्दल कोणताही निर्णय घेतला जात नाही. धर्मेंद्र प्रधान यांची मुलगी निमिषा विदेशात शिक्षण घेत असल्याने त्यावरूनही लोकांमध्ये संताप आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने तिचे इंस्टाग्राम अकाऊंट देखील बंद केले.

Follow Us
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी...
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी नेमकं काय घडणार?
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा थेट...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा धक्कादायक प्रकार
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
Sanjay Gaikwad : बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं..
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं आवाहन, आता...
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्ष
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका
पार्थ पवारांच्या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाचे मोठं स्पष्टीकरण; मुंडवा...
पार्थ पवारांच्या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाचे मोठं स्पष्टीकरण; मुंडवा गैरव्यवहार प्रकरणाला नवे वळण
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकी सर्वात मोठा निर्णय; देशातील प्रमुख...
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकी सर्वात मोठा निर्णय; देशातील प्रमुख महानगरांना जोडणाऱ्या रेल्वे नेटवर्कला मंजुरी
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटील....
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटलांच्या भाषणाची तुफान चर्चा