AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टायगर श्रॉफनंतर आणखी एक गायक निशाण्यावर; भल्या पहाटे घराबाहेर गोळीबार; मनोरंजनसृष्टीत भीतीचं वातावरण

टायगर श्रॉफनंतर आणखी एका गायक निशाण्यावर आला आहे. त्याच्या घरावर भल्या पहाटे घराबाहेर गोळीबार करण्यात आा आहे. यामुळे मनोरंजनसृष्टीत भीतीचं वातावरण पसरलं आहे.

टायगर श्रॉफनंतर आणखी एक गायक निशाण्यावर; भल्या पहाटे घराबाहेर गोळीबार; मनोरंजनसृष्टीत भीतीचं वातावरण
Abhishek singh firing Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 28, 2026 | 11:52 AM
Share

अभिनेते टायगर श्रॉफवर गोळीबार झाल्यानंतर आता आणखी एका गायकाच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आला आहे. गायकाच्या घराबाहेर 26 ऑक्टोबर भल्या पहाटे  4.30 वाजेच्या दरम्यान गोळीबार झाला. गायक अभिषेक सिंहच्या घरावर हा गोळीबार झालाय. अभिषेक सिंहच्या घराबाहेर उभ्या कारचंही नुकसान करण्यात आलं.  कारच्या काचा विटा आणि दगडाने फोडल्या. या गोळीबाराच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

 गायक अभिषेक सिंहने गोळीबारानंतर गंभीर आरोप केला आहे. त्याने गायक शिवकुमार विक्कू याच्यावर गंभीर आरोप केला आहे. परंतु अद्याप त्याच्यावर आरोप सिद्ध झालेला नाही. अभिषेक सिंहने सोशल मीडियावर पोस्ट करत गोळीबाराची माहिती दिली. त्याने गोळीबाराचं सीसीटीव्ही फुटेज सापडल्याचेही त्याने सांगितलं.  त्याने पोस्ट करत म्हटलं की, सीसीटीव्ही फुटेज सापडलंय, सीसीटीव्ही फुटेज शेअर केले जाईल. माझा संशय अगदी बरोबर होता. या प्रकरणात समाज आणि प्रशासन कारवाई करेल. जे काही झालंय, ते खूप चुकीचं झालंय, असे त्याने म्हटलं आहे.

अभिषेकने अधिकृत इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर चारचाकीचा व्हिडिओ शेअर केलाय. त्याच्या कारच्या काचा फुटल्या आहेत. कारचंही मोठं नुकसान झाल्याचे दिसत आहे. आता या गोळीबारामागे कुणाचा हात होता, हे सीसीटीव्ही फुटेज आल्यानंतर स्पष्ट होईल. अभिषेक सिंहने सांगितलेल्या माहितीनुसार, गायक अभिषेक पहाटे साडेचार वाजता घरी झोपला असताना गोळीबार झाला. त्यावेळी काचा फुटल्याचा आवाज आला. तसेच काहींनी शिवीगाळ करण्यात सुरवात केली होती. गोळीबाराचा आवाज ऐकू आल्यानंतर अभिषेक झोपेतून जागा झाला. बाहेर येताच त्याच्या कारचे प्रचंड नुकसान झाल्याचे दिसून आलं.

मिळालेल्या माहितीनुसार,  अभिषेकच्या कारवर हल्लेखोरांनी 4-5 राऊंड गोळीबार करण्यात आला. त्यानंतर चारचाकीमध्ये कोणीही नव्हतं. त्यामुळे या गोळीबारात कोणीही जखमी झालेलं नाही. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हल्लेखोर नेमका कोण होता? गोळीबारामागचं कारण काय? याचा तपास पोलिसांनी सुरू आहे. अभिषेक सिंहने दावा केलाय की, शिवकुमार विक्कूसोबत आधीही वाद झाला होता. त्याला या आधी देखील धमकी मिळाली होती. त्याच्या घरावर 4-5 राऊंड फायरिंग करण्यात येईल, अशी धमकी त्याला देण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या गोळीबाराने मनोरंजनसृष्टीत भीतीचं वातावरण पसरलं आहे.

Follow Us
विधानपरिषद निवडणुकीत पुण्यात ट्विस्ट; दोन माजी शिक्षक आमदारांचा पराभव
Maharashtra MLC Result 2026 Complete : विधानपरिषद निवडणुकीत पुण्यात मोठा ट्विस्ट; दोन माजी शिक्षक आमदारांचा पराभव, सानप-गावडे यांच्यात चुरस
पुणे, अमरावती, नाशिकमध्ये १०-१० हजार रुपये वाटले; संजय राऊतांचा दावा
Sanjay Raut : पुणे, अमरावती, नाशिकमध्ये १०-१० हजार रुपये वाटले; संजय राऊतांचा खळबळजनक दावा
मराठवाडा पदवीधर मतदारसंघात चुरस वाढली; प्रतापसिंह पाटील आघाडीवर तर....
Marathwada MLC Election Results 2026 : मराठवाडा पदवीधर मतदारसंघात चुरस वाढली; प्रतापसिंह पाटील आघाडीवर, सतीश चव्हाण पिछाडीवर
प्रदीप पूर्णेकर प्रकरण तापलं, घोडबंदर रोडवर रास्ता रोको....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरण तापलं, घोडबंदर रोडवर रास्ता रोको; मीनाक्षी शिंदे, राजेंद्र शिंदेंच्या अटकेची मागणी
सकाळी वृक्षतोडस्थळाची पाहणी तर सायंकाळी राज ठाकरेंची जाहीर सभा
Bhimashankar Torrent Project : Raj Thackeray : सकाळी वृक्षतोडस्थळाची पाहणी तर, सायंकाळी राज ठाकरेंची जाहीर सभा
मतपेटीत चिठ्ठ्या टाकून मतदारांचा संताप; असला आमदार नको गं बाई म्हणत...
Marathwada MLC Election Result : मतपेटीत चिठ्ठ्या टाकून मतदारांचा संताप; असला आमदार नको गं बाई म्हणत नाराजी व्यक्त
शिवसेना कोणाची, धनुष्यबाण कोणाचा? सुप्रीम कोर्टात आज पुन्हा युक्तिवाद
Shivsena : शिवसेना कोणाची, धनुष्यबाण कोणाचा? सुप्रीम कोर्टात आज पुन्हा युक्तिवाद; महाराष्ट्राचं लक्ष
पुणे पदवीधरसाठी दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सुरु....
Maharashtra MLC Result 2026 : पुणे पदवीधरसाठी दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सुरु
20 हजारांहून अधिक मतं अपक्षाच्या खात्यात; रविराज साबळेंमुळे मराठवाडा..
Marathwada MLC Election Results 2026 : 20 हजारांहून अधिक मतं अपक्षाच्या खात्यात; रविराज साबळेंमुळे मराठवाडा पदवीधरचा निकाल बदलणार?
पदवीधर मतदारसंघात महायुती की मविआ कोण मारणार बाजी?
Maharashtra MLC Election Final Results 2026 : पदवीधर मतदारसंघात महायुती की मविआ कोण मारणार बाजी? निकालाकडे सर्वांचं लक्ष