AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mukesh Ambani: रिलायन्सचा 21 लाख कोटींचा डोलारा सांभाळतो कोण? कुणाकडे काय जबाबदारी?

Reliance Group Mukesh Ambani: जिओ आयपीओने गुंतवणूकदार मालामाल झाले. रिलायन्स इंडस्ट्रीज यामुळे चर्चेत आली. या समूहाचा 21 लाख कोटींहून अधिकचा डोलारा नेमका कोण सांभाळतो? कुणाकडे काय जबाबदारी आहे?

Mukesh Ambani: रिलायन्सचा 21 लाख कोटींचा डोलारा सांभाळतो कोण? कुणाकडे काय जबाबदारी?
मुकेश अंबानी, आकाश अंबानी, इशा अंबानी, निशा अंबानी, अनंत अंबानी
| Updated on: Oct 28, 2026 | 12:04 PM
Share

Reliance Group Mukesh Ambani: जिओ आयपीओने गुंतवणूकदारांना मोठा फायदा करून दिला. आज जिओ शेअर बाजारात सूचीबद्ध झाली. रिलायन्स इंडस्ट्रीज समूहाचा 21 लाख कोटींहून अधिकचा डोलारा नेमका कोण सांभाळतो? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. संपूर्ण अंबानी कुटुंब शिस्तबद्ध पद्धतीने या समूहातील विविध कंपन्यांचे काम सांभाळतात. मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वात निशा अंबानी, आकाश, ईशा आणि अनंत अंबानी यांच्या खांद्यावर विविध कंपन्यांची धूरा आहे. आवडी आणि त्यांच्या कौशल्यानुसार कामाचे वाटप करण्यात आले आहे.

मुकेश अंबानी ग्रुप लिडर

रिलायन्स अध्यक्ष आणि आणि कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी समूहाची धुरा सांभाळतात. कोरोना काळापासून त्यांनी एक छदामही न घेता समूहाचे कामकाज सांभाळत आहे. तेल आणि पेट्रोकेमिकल्स या कंपन्यांना उभारी देत त्यांनी समूह विस्तारला. आज समूह विविध क्षेत्रात शाखा उघडत आहे. आता तर एआय, ग्रीन एनर्जीपासून ते रिटेलपर्यंत कंपनी मोठी झेप घेण्याच्या तयारीत आहे.

टेलिकम्युनिकेशन ते डिजिटल आकाश अंबानींवर धुरा

मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी यांच्याकडे रिलायन्सच्या टेलिकॉम आणि डिजिटल विभागाची जबाबदारी आहे. जिओ इन्फोकॉमचा (Jio) आयपीओने इतिहास घडवला. जिओला देशातील नंबर वन टेलिकॉम ऑपरेटर करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी बाजारातून भांडवल उभं करण्यात आलं आहे. यासोबतच नवीन तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्तेवरही(AI) जोर देण्यात येत आहे.

वर्ष 2010 मध्ये मुकेश अंबानी यांनी इंफोटेल ब्रॉडबँड सर्व्हिसेज लिमिटेड या कंपनीचे 95% शेअर खरेदी केले. या कंपनीने देशातील 22 प्रदेशात 4G ब्रॉडबँडची सुविधा केली होती. आयबीएसएल कंपनी 4800 कोटी रुपयांत खरेदी करण्यात आले. या कंपनीला मुकेश अंबानी यांनी रिलायन्स जिओ असे नाव दिले. त्यानंतर ती जिओ टेलिकॉम कंपनी झाली. मुकेश अंबानी यांनी सुरुवातीलाच जोरदार प्लॅन आणल्याने या कंपनीने मोठी भरारी घेतली. ती देशातील सर्वात मोठी ब्रॉडबँड कंपनी झाली. या कंपनीचे देशात जवळपास 48 कोटींहून अधिक ग्राहक आहेत.

रिलायन्स रिटेलची जबाबदारी ईशा अंबानींवर

रिलायन्स रिटेल व्हेंटर लिमिटेड (Reliance Retail Venture Limited) कंपनीची जबाबदारी सध्या ईशा अंबानी (Isha Ambani) हिच्याकडे आहे. रिलायन्स रिटेल यांच्याकडे एकूण 18,000 स्टोअरचा पसारा आहे. Reliance Brands 2007 मध्ये स्थापन झाला. या कंपनीने 50 जागतिक ब्रँडसोबत करार केला आहे. देशात त्यांचे 2,000 हून अधिक स्टोअर आहेत. रिलायन्स रिटेल व्हेंचर लिमिटेडचा टर्नओव्हर 2.60 लाख कोटी रुपयांच्या घरात होता.

अनंत अंबानीकडे कोणती जबाबदारी?

अनंत अंबानी अक्षय ऊर्जेवर काम करत आहे. ग्रीन आणि रिन्युएबल एनर्जीची जबाबदारी अनंत अंबानी याच्याकडे आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजमधील या क्षेत्रात अनंत अंबानी काम करत आहे. 2022 मध्ये अनंत अंबानी याची रिलायन्सच्या संचालक मंडळावर नियुक्ती करण्यात आली होती. याशिवाय जिओ प्लॅटफॉर्म्स आणि रिलायन्स रिटेल व्हेंचर्सची जबाबदारी पण त्याच्यावर आहे.अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनंतची वार्षिक कमाई 4.2 कोटी रुपये आहे. तर अनंत अंबानीची वैयक्तिक कमाई 40 अब्ज डॉलर (जवळपास 3,32,482 कोटी रुपये) असल्याचे मानले जाते. याशिवाय वनतारा हा त्यांचा महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे. वन्यजीव संरक्षण आणि इतर अनेक उपक्रमात ते हिरारीने भाग घेतात.

Follow Us
विधानपरिषद निवडणुकीत पुण्यात ट्विस्ट; दोन माजी शिक्षक आमदारांचा पराभव
Maharashtra MLC Result 2026 Complete : विधानपरिषद निवडणुकीत पुण्यात मोठा ट्विस्ट; दोन माजी शिक्षक आमदारांचा पराभव, सानप-गावडे यांच्यात चुरस
पुणे, अमरावती, नाशिकमध्ये १०-१० हजार रुपये वाटले; संजय राऊतांचा दावा
Sanjay Raut : पुणे, अमरावती, नाशिकमध्ये १०-१० हजार रुपये वाटले; संजय राऊतांचा खळबळजनक दावा
मराठवाडा पदवीधर मतदारसंघात चुरस वाढली; प्रतापसिंह पाटील आघाडीवर तर....
Marathwada MLC Election Results 2026 : मराठवाडा पदवीधर मतदारसंघात चुरस वाढली; प्रतापसिंह पाटील आघाडीवर, सतीश चव्हाण पिछाडीवर
प्रदीप पूर्णेकर प्रकरण तापलं, घोडबंदर रोडवर रास्ता रोको....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरण तापलं, घोडबंदर रोडवर रास्ता रोको; मीनाक्षी शिंदे, राजेंद्र शिंदेंच्या अटकेची मागणी
सकाळी वृक्षतोडस्थळाची पाहणी तर सायंकाळी राज ठाकरेंची जाहीर सभा
Bhimashankar Torrent Project : Raj Thackeray : सकाळी वृक्षतोडस्थळाची पाहणी तर, सायंकाळी राज ठाकरेंची जाहीर सभा
मतपेटीत चिठ्ठ्या टाकून मतदारांचा संताप; असला आमदार नको गं बाई म्हणत...
Marathwada MLC Election Result : मतपेटीत चिठ्ठ्या टाकून मतदारांचा संताप; असला आमदार नको गं बाई म्हणत नाराजी व्यक्त
शिवसेना कोणाची, धनुष्यबाण कोणाचा? सुप्रीम कोर्टात आज पुन्हा युक्तिवाद
Shivsena : शिवसेना कोणाची, धनुष्यबाण कोणाचा? सुप्रीम कोर्टात आज पुन्हा युक्तिवाद; महाराष्ट्राचं लक्ष
पुणे पदवीधरसाठी दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सुरु....
Maharashtra MLC Result 2026 : पुणे पदवीधरसाठी दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सुरु
20 हजारांहून अधिक मतं अपक्षाच्या खात्यात; रविराज साबळेंमुळे मराठवाडा..
Marathwada MLC Election Results 2026 : 20 हजारांहून अधिक मतं अपक्षाच्या खात्यात; रविराज साबळेंमुळे मराठवाडा पदवीधरचा निकाल बदलणार?
पदवीधर मतदारसंघात महायुती की मविआ कोण मारणार बाजी?
Maharashtra MLC Election Final Results 2026 : पदवीधर मतदारसंघात महायुती की मविआ कोण मारणार बाजी? निकालाकडे सर्वांचं लक्ष