AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Kohli: आंदोलनादरम्यान विराट कोहली मूग गिळून प्रेमानंद महाराजांकडे..; चाहत्यांनी धारेवरच धरलं

काल विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी प्रेमानंद महाराजांची भेट घेतली. या दोघांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आता यानंतर मात्र विराट कोहली आणि अनुष्का शर्माला ट्रोलिंगचा सामना करावा लागला.

Virat Kohli: आंदोलनादरम्यान विराट कोहली मूग गिळून प्रेमानंद महाराजांकडे..; चाहत्यांनी धारेवरच धरलं
| Updated on: Jul 23, 2026 | 11:19 AM
Share

नुकतेच विराट कोहलीला इंग्लंडविरुद्ध मालिका खेळताना पाहिले. यानंतर तो भारतात परतला आहे. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली जेव्हा जेव्हा भारतात परतात तेव्हा तेव्हा ते वृंदावनमध्ये जातात, आताही विराट आणि अनुष्का वृंदावनमध्ये पोहोचले आहे. या जोडप्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नेहमी विराट आणि अनुष्काच्या साधेपणाचे कौतुक होते पण यावेळी असं झाले नाही, यावेळी विराट आणि अनुष्का यांना प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला. बुधवारी वृंदावनमधील प्रेमानंदजी महाराजांना भेट घेतली. मात्र, या भेटीदरम्यानचे विराट आणि अनुष्काचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले. त्याखाली अनेकांनी कमेंट्स केल्या आणि अनेक प्रश्न विचारले.

काहींनी विराटला आठवण करून दिली की ते दोघेही दिल्लीचे आहेत, तर काहींनी भारतात असूनही जंतर मंतरला भेट न दिल्याबद्दल विराटला आणि अनुष्काला प्रश्न विचारले. एका युझरने लिहिले, “तरुणांबद्दल आणि सुरू असलेल्या आंदोलनांबद्दल बोलण्याचे धाडस तुमच्यात नाही… खूप लाजिरवाणे आहे.” दुसऱ्याने विचारले, “दिल्लीचे असूनही तुम्ही जंतर मंतरवरील आंदोलनांना पाठिंबा का देत नाही?” तिसऱ्याने लिहिले, “तुम्ही सर्व काही मिळवले आहे, तुमचा जन्म दिल्लीत झाला आहे आणि या देशातील लोक तुमची पूजा करतात. हिंमत गोळा करा आणि विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहा.” एकाने लिहिले, “दिल्लीला घरी जा आणि बघा विद्यार्थी काय भोगत आहेत.”

कतरिना कैफवरही टीका झाली

मंगळवारी, कतरिना कैफच्या एका फॅन ग्रुपने, नवी दिल्लीत फुटलेल्या नीट परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आवाज न उठवल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. अभिनेत्रीच्या एका फॅन पेजने जाहीर केले की ते त्यांचे इंस्टाग्राम हँडल बंद करत आहेत, कारण “ज्यांच्यात भारतीयांसाठी आवाज उठवण्याचे धाडस नाही अशा कोणालाही त्यांना पाठिंबा द्यायचा नाही.” या इंस्टाग्राम फॅन पेजचे नाव “कॅथोलिक_फॅन्स” (katholic_fans) असून त्याचे 70,000 पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

दरम्यान, इतर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही विद्यार्थ्यांना उघडपणे पाठिंबा दर्शवला आहे. यामध्ये शबाना आझमी, प्रीती झिंटा, रितेश देशमुख, सोनू सूद, सोनाक्षी सिन्हा आणि प्रकाश राज, युवराज सिंग यांचा समावेश आहे, ज्यांनी आपली चिंता व्यक्त केली आहे.

Follow Us
महाराष्ट्रात काँग्रेसनं खातं उघडलं; अभिजित वंजारी यांचा विजय
Congress : महाराष्ट्रात काँग्रेसनं खातं उघडलं; अभिजित वंजारी यांचा विजय
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून टीका
तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना आवाहन
Raj Thackeray : तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना मोठं आवाहन
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदी...
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदींची पोस्ट चर्चेत!
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी...
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी व्यक्त केला आनंद, म्हणाले…
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं काय घडलं?
विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
Maharashtra MLC Election Result 2026 : विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत...
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत निवडणुकांवर उपस्थित केले सवाल
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा...
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी!
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश,
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश, 17 नोव्हेंबरला प्रत्यक्ष हजर राहावे लागणार!