AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“आपलेच गद्दार निघाले…” भाजप बंडखोर उमेदवाराला पराभव जिव्हारी, अमरावती शिक्षक मतदारसंघातील शेखर भोयरांचा शिक्षकांवर थेट निशाणा

Amravati Teachers constituency election result 2026: अमरावती शिक्षक मतदारसंघात यंदा बंडाचे वारे दिसले. शिवसेना, भाजपमध्ये बंडाळी दिसली. पण किरण सरनाईक यांनी विजय खेचून आणला. त्यानंतर भाजपचे बंडखोर उमेदवार शेखर भोयरांचा शिक्षकांवर थेट निशाणा साधला.

आपलेच गद्दार निघाले… भाजप बंडखोर उमेदवाराला पराभव जिव्हारी, अमरावती शिक्षक मतदारसंघातील शेखर भोयरांचा शिक्षकांवर थेट निशाणा
"आपलेच गद्दार निघाले…" भाजप बंडखोर उमेदवाराला पराभव जिव्हारी
| Updated on: Oct 29, 2026 | 8:59 AM
Share

BJP Rebel Candidate Shekhar Bhoyar: अमरावती शिक्षक मतदारसंघात यंदा किरण सरनाईक यांनी पुन्हा बाजी मारली. विद्यमान आमदार किरण सरनाईक यांच्याविरोधात शिवसेना आणि भाजपमधूनही बंडाळी झाली. शिंदे गटातून श्रीकांत देशपांडे यांनी बंड पुकारले होते. तर भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या भगिणी संगिता बोंडे यांनी महायुतीच्या उमेदवाराविरोधात जंग जंग पछाडले. त्याचवेळी भाजपचे नेते शेखर भोयर हे सुद्धा मैदानात उतरले. पण सरनाईकांनी बाजी मारली. या पराभवानंतर भाजपचे बंडखोर उमेदवार शेखर भोयरांचा शिक्षकांवर थेट निशाणा साधला.

आपलेच गद्दार निघाले

“ज्यांच्यासाठी १८ वर्ष आयुष्य वेचलं. त्यांनीच अखेर साथ सोडली! १८ वर्ष लढलो, संघर्ष केला. पण पदरी काय आलं? आपलेच गद्दार निघाले. मनात वेदना आहेत, शब्द अपुरे आहेत ! राम राम !, अशा शब्दात भोयर यांनी शिक्षकांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. आपलेच गद्दार निघाले अशा शब्दात अमरावती विभाग शिक्षक मतदार संघात पराभवानंतर भाजपचे बंडखोर शेखर भोयरांचा शिक्षकांवर थेट निशाणा साधला. अमरावती शिक्षक मतदारसंघ निकालानंतर भोयर यांची पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.

किरण सरनाईक यांनी मारली बाजी

या अटीतटीच्या लढतीत किरण सरनाईक यांच्यासमोर मोठे आव्हान उभे होते. शिवसेना शिंदे गटाचे किरण सरनाईक यांना एकूण 16,663 मते मिळाली. त्यांनी सलग दुसर्‍यांदा या मतदारसंघात विजय मिळवला आहे. तर काँग्रेसच्या उमेदवार अदिती पोहरे यांना पराभव पत्काराला लागला. त्यांना या निवडणुकीत 8,636 मते मिळाली. शिंदे गटाचे बंडखोर उमेदवार श्रीकांत देशपांडे यांनी या निवडणुकीत बंडखोरी केली होती. त्यांना 7,117 मतं मिळाली. ते या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. किरण सरनाईक यांनी पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या कोटा पूर्ण करत विजय मिळवला.

यावेळी अमरावती शिक्षक मतदारसंघात पश्चिम विदर्भातील अनेकांनी नशीब आजमावले. यामध्ये केवळ शिक्षक संघटनांचे प्रतिनिधीच नाही तर इतर क्षेत्रातील दिग्गजांनीही निवडणूक लढवून पाहिली. पण वारं फिरलं. तगड्या उमेदवारांचं आव्हान असतानाही सरनाईकांनी बाजी मारली.

Follow Us
महाराष्ट्रात काँग्रेसनं खातं उघडलं; अभिजित वंजारी यांचा विजय
Congress : महाराष्ट्रात काँग्रेसनं खातं उघडलं; अभिजित वंजारी यांचा विजय
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून टीका
तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना आवाहन
Raj Thackeray : तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना मोठं आवाहन
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदी...
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदींची पोस्ट चर्चेत!
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी...
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी व्यक्त केला आनंद, म्हणाले…
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं काय घडलं?
विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
Maharashtra MLC Election Result 2026 : विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत...
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत निवडणुकांवर उपस्थित केले सवाल
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा...
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी!
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश,
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश, 17 नोव्हेंबरला प्रत्यक्ष हजर राहावे लागणार!