AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CJP Protest: प्रत्येक मुलाला, विद्यार्थ्याला… युवराज सिंगकडून संताप व्यक्त, आंदोलनाबाबत स्पष्टच बोलला

दिल्लीत जंतरमंतरवर नीट पेपर फुटी संदर्भात आंदोलन सुरु आहे. आता या आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झाले कारण पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. आता या प्रकरणावर अनेकांनी भाष्य केलेले पाहायला मिळते. आता यातच युवराज सिंगनेही याबद्दल आपले मत मांडले आहे.

CJP Protest: प्रत्येक मुलाला, विद्यार्थ्याला... युवराज सिंगकडून संताप व्यक्त, आंदोलनाबाबत स्पष्टच बोलला
| Updated on: Jul 23, 2026 | 10:35 AM
Share

कॉकरोच जनता पार्टी नीट परीक्षेच्या पेपरफुटीविरोधात दिल्लीत आंदोलन करत आहे. सुरुवातीला जंतर मंतर येथील आंदोलन शांततापूर्ण होते, परंतु 20 जुलै 2026  पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या. ज्यामुळे आंदोलन अधिकच चिघळले. यावर आता अनेकांनी आवाज उठवला आहे. यावर अनेकांनी आपले मत मांडले आहे, अनेक सेलिब्रिटींनी आपला याला पाठिंबा दर्शवला आहे. अनेक सेलिब्रिटी तर दिल्लीला पोहोचून या आंदोलनात सहभागी झाले आहेत. अनेकांनी सोशल मीडियावरुन आपला पाठिंबा दर्शवला आहे. आता भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

युवराजने आपल्या इंस्टाग्रामवर आंदोलनाबद्दल एक स्टोरी शेअर केली आहे. त्यांनी लिहिले, “प्रत्येक मुलाला, विद्यार्थ्याला, स्त्रीला आणि पुरुषाला शांततेने शिकण्याची, सुरक्षितपणे वाढण्याची आणि आपली स्वप्ने साकार करण्याची संधी मिळाली पाहिजे. तुमचे कल्याण हाच एका उत्तम भारताचा पाया आहे. चला, आपण सर्वजण मिळून काळजी, संधी आणि आशेचा समाज घडवण्यासाठी काम करूया. भारताच्या भविष्यासाठी संवादाच्या माध्यमातून आपण या प्रश्नावर सामंजस्यपूर्ण तोडगा काढू शकतो.”

सीजेपीचा ‘संसद चलो’ मोर्चा 20 जुलै 2026 रोजी, सीजेपीने दिल्लीत ‘संसद चलो’ मोर्चा आयोजित केला. यादरम्यान, आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी कारवाई केली. विरोधी नेत्यांनी पोलिसांच्या कारवाईचा निषेध केला आणि त्यांच्यावर लाठीचार्ज व अश्रुधुरांच्या नळकांड्याचा वापर केल्याचा आरोप केला. ज्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

संसदेतही गोंधळ नीट पेपरफुटी प्रकरणी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून संसदेत विरोधी पक्ष आणि सरकार यांच्यात कोंडी कायम आहे. विरोधी पक्ष चर्चेसाठी विशेष नियमांची मागणी करत आहे, तर सरकार चर्चेसाठी तयार आहे. लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांचे कामकाज अनेक वेळा स्थिगत करण्यात आले आहे. 21 जुलै रोजी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे मोर्चा काढला, त्यानंतर राहुल गांधी यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांना अटक करण्यात आली. मात्र, नंतर दिल्ली पोलिसांनी त्यांची सुटका केली.

Follow Us
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार