Maharashtra Corona Update | महाराष्ट्रात कोरोनाचा गुणाकार, रुग्णांची संख्या हजार पार!

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 1018 वर येऊन ठेपला आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाने गुणाकार करण्यास सुरुवात केल्याचे (Maharashtra Corona positive Patient) बोललं जात आहे. 

Maharashtra Corona Update | महाराष्ट्रात कोरोनाचा गुणाकार, रुग्णांची संख्या हजार पार!

मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली (Maharashtra Corona positive Patient) आहे. आज दिवसभरात राज्यात 150 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 1018 वर येऊन ठेपला आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाने गुणाकार करण्यास सुरुवात केल्याचं दिसत आहे.

राज्यात दर दिवशी जवळपास 20 ते 25 रुग्ण आढळत असताना आज एकाच दिवशी 150 रुग्णांची वाढ झाली आहे (Maharashtra Corona positive Patient). त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. विशेष म्हणजे यात मुंबई आणि पुणे या शहरांची संख्या जास्त आहे. यामुळे राज्यातील कोरोनाची संख्या 1018 वर पोहोचली आहे.

धारावीनंतर बेहरामपाड्यात कोरोना रुग्ण

मुंबईतील धारावी परिसरात कोरोनाचे 2 रुग्ण आढळले आहेत. धारावीत 80 वर्षांच्या वृद्धाला आणि 49 वर्षाच्या पुरुषाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे धारावीत कोरोनाचा आकडा 7 वर गेला आहे.

तर दुसरीकडे वांद्र्यातील बेहराम पाडा या भागात कोरोनाने शिरकाव केला आहे. बेहराम पाड्यात कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. हा रुग्ण निझामुद्दीहून मुंबईत आला होता. या रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर तो राहत असलेली इमारत सील करण्यात आली आहे.

राज्यात नव्याने वाढलेले रुग्ण कुठे किती?

  • मुंबई – 116
  • पुणे – 18
  • ठाणे – 2
  • अहमदनगर – 3
  • बुलडाणा – 2
  • नागपूर – 3
  • औरंगाबाद – 3
  • सांगली – 1
  • सातारा – 1
  • रत्नागिरी – 1

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 1018 वर पोहोचली आहे. यात मुंबईत सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद आहे. तर दुसऱ्या क्रमाकांवर पुण्याचा क्रमांक लागतो आहे.  यापाठोपाठ अहमदनगर आणि सांगलीचा क्रमांक आहे (Maharashtra Corona positive Patient).

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई94146656225335
पुणे (शहर+ग्रामीण)40180168571127
ठाणे (शहर+ग्रामीण)63778276421705
पालघर 100784967194
रायगड88654174164
रत्नागिरी88461030
सिंधुदुर्ग2622175
सातारा1780102868
सांगली66235018
नाशिक (शहर +ग्रामीण)73164209300
अहमदनगर (शहर+ग्रामीण)89455622
धुळे152386078
जळगाव 60303508353
नंदूरबार 27914911
सोलापूर43132161351
कोल्हापूर 122082220
औरंगाबाद84324304341
जालना108357147
हिंगोली 3422792
परभणी2141035
लातूर 71933635
उस्मानाबाद 39524617
बीड2351185
नांदेड 60625224
अकोला 1876149894
अमरावती 85864037
यवतमाळ 44829114
बुलडाणा 4121616
वाशिम 1951065
नागपूर2034138722
वर्धा 34141
भंडारा162891
गोंदिया 2161563
चंद्रपूर177980
गडचिरोली115711
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)202031
एकूण26092414450710482

संबंधित बातम्या :

Maharashtra Corona Update | महाराष्ट्रात कोरोनाचा गुणाकार, रुग्णांची संख्या हजार पार!

Pune Curfew | पुणे पोलिसांचं आणखी एक कडक पाऊल, शहरात 5 ठिकाणी कर्फ्यू लागू

बारामतीत कोरोनाचा विळखा वाढला, कोरोनाबाधित भाजी विक्रेत्याच्या मुलाला आणि सुनेला कोरोनाची लागण

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *