बारामतीत कोरोनाचा विळखा वाढला, कोरोनाबाधित भाजी विक्रेत्याच्या मुलाला आणि सुनेला कोरोनाची लागण

बारामतीत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत (Corona in Baramati) वाढ झाली आहे. याआधी एका रिक्षा चालकाला आणि भाजी विक्रेत्याला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं.

बारामतीत कोरोनाचा विळखा वाढला, कोरोनाबाधित भाजी विक्रेत्याच्या मुलाला आणि सुनेला कोरोनाची लागण

पुणे : बारामतीत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत (Corona in Baramati) वाढ झाली आहे. याआधी एका रिक्षा चालकाला आणि भाजी विक्रेत्याला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. मात्र, आता कोरोनाबाधित भाजी विक्रेत्याच्या मुलाला आणि सुनेलादेखील कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे बारामतीतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 4 वर पोहोचली आहे (Corona in Baramati).

बारामती शहरातील समर्थनगर भागातील एका भाजी विक्रेत्याला कोरोनाची लागण झाल्याचं तपासणीनंतर समोर आलं होतं. त्यामुळे या भागातील 5 किमीपर्यंतचा परिसर हा प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर प्रातांधिकारी दादासाहेब कांबळे यांनी नागरिकांनी दक्षता घेण्याबरोबरच घरातून बाहेर पडू नये असं आवाहन केलं आहे.

दरम्यान, हा संबंधित रुग्ण भाजी विक्रेता असल्यानं त्याच्या संपर्कात अनेकजण आल्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यामुळे परिसरात सर्वेक्षणालाही सुरुवात करण्यात आलं. याशिवाय भाजी विक्रेत्याशी संबंधित आज 12 जणांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये या भाजी विक्रेत्याच्या सुनेला आणि मुलाला कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं.

याआधी बारामतीत एका रिक्षा चालकाला कोरोनाची लागण झाली होती. मात्र त्याच्याशी संबंधित व्यक्तींच्या टेस्ट निगेटिव्ह आल्या होत्या. त्यामुळे बारामतीकरांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. मात्र त्यानंतर लगेचच भाजी विक्रेता हा दुसरा रुग्ण आढळला. त्याच्यापासून मुलगा आणि सुनेलाही कोरोनाची लागण झाली.

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली (Maharashtra Corona positive Patient) आहे. आज दिवसभरात राज्यात 23 जणांची वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 900 जवळ येऊन ठेपला आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाने गुणाकार करण्यास सुरुवात केल्याचे बोललं जात आहे.

राज्यात दर दिवशी जवळपास 20 ते 25 रुग्ण आढळत (Maharashtra Corona positive Patient) आहेत. त्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे यात अनेक मुंबई आणि पुणे या शहरांची संख्या जास्त आहे. यामुळे राज्यातील कोरोनाची संख्या 891 वर पोहोचली आहे.

राज्यात कुठे किती रुग्ण?

  • मुंबई – 10
  • पुणे – 4
  • ठाणे – 1
  • अहमदनगर – 3
  • बुलडाणा – 2
  • नागपूर – 2
  • सांगली – 1

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 891 वर पोहोचली आहे. यात मुंबईत 526 तर पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या 145 वर पोहोचली आहे. यापाठोपाठ अहमदनगर आणि सांगलीत प्रत्येकी 26 जणांना कोरोनाची लागण झाली (Maharashtra Corona positive Patient) आहे.

Edit
जिल्हा रुग्ण बरे मृत्यू
मुंबई 536 20 34
पुणे- पिंपरी चिंचवड (शहर+ग्रामीण) 145 16 5
सांगली 26 4
ठाणे मंडळातील इतर मनपा 86 3 9
नागपूर 19 5
अहमदनगर 26 3
लातूर 8
बुलडाणा 5 1 1
यवतमाळ 4 3
सातारा 5
औरंगाबाद 10 5 1
उस्मानाबाद 3 1
कोल्हापूर 3
रत्नागिरी 2
जळगाव 2 1
सिंधुदुर्ग 1
गोंदिया 1
नाशिक 2
वाशिम 1
अमरावती 1 1
हिंगोली 1
जालना 1
इतर राज्य (गुजरात) 2
एकूण 891 66 52

Published On - 7:51 pm, Tue, 7 April 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI