TVS Jupiter वर जबरदस्त ऑफर्स, झिरो फायनान्ससह कॅशबॅकची सुविधा

| Updated on: Nov 01, 2020 | 10:15 AM

सणासुदीच्या मुहुर्तावर तुम्ही जर स्कूटर खरेदी करणार असाल तर एका जबरदस्त ऑफरवर TVS Jupiter खरेदी करण्याची तुमच्याकडे सुवर्णसंधी आहे.

TVS Jupiter वर जबरदस्त ऑफर्स, झिरो फायनान्ससह कॅशबॅकची सुविधा
Follow us on

मुंबई : या सणासुदीच्या मुहुर्तावर तुम्ही जर स्वतःसाठी अथवा कुटुंबातील कोणत्याही सदस्यासाठी स्कूटर खरेदी करणार असाल तर एका जबरदस्त ऑफरवर TVS Jupiter खरेदी करण्याची तुमच्याकडे सुवर्णसंधी आहे. TVS Motor Company ने त्यांच्या बेस्ट सेलिंग स्कूटर TVS Jupiter वर झिरो फायनान्सपासून ते कॅशबॅकपर्यंत अनेक स्किम्स जाहीर केल्या आहेत. (Buy TVS Jupiter with zero finance and get cashback; check other exciting offers)

डाऊन पेमेंटविना TVS Jupiter घरी घेऊन जा

कंपनीने या स्कूटरवर ‘बाय नाऊ पे लॅटर’ ही ऑफर दिली आहे. याद्वारे तुम्ही TVS Jupiter कोणत्याही डाऊन पेमेंटविना घरी घेऊन जाऊ शकता. सोबतच बँक ऑफ बडोदा आणि ICICI बँकेच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे तुम्ही जर पेमेंट केलंत तर तुम्हाला 5 टक्के कॅशबॅक ऑफर मिळेल.

महिन्याला 2 हजार 222 रुपयांचा EMI

TVS Motor Company या ऑफरला अधिक आकर्षक बनवण्यासाठी ईएमआयचा ऑप्शनदेखील देत आहे. तुम्ही ही स्कूटर 2,222 रुपये प्रति महिन्याच्या EMI वर घरी घेऊन जाऊ शकता. सोबतच तुम्हाला 4500 रुपयांपर्यंत पेटीएम कॅशबॅक मिळेल.

जबरदस्त फिचर्स

TVS Jupiter ही देशातील सर्वाधिक विक्री होत असलेली स्कूटर आहे. त्यातच कंपनीला दिवाळीत या स्कूटरचा सेल वाढवायचा आहे. त्यामुळे कंपनीने यामध्ये काही फिचर्स वाढवले आहेत. ज्यामध्ये युएसबी चार्जर, फ्रंट स्टोरेज स्पेस आणि Tinted visor सारखे फिचर्स वाढवण्यात आले आहेत.

ज्युपिटर क्लासिकमध्ये 110cc चं इंजिन असणार आहे. बीएस 4 व्हर्जनमध्ये हे इंजिन 7.9 bhp इतकी पॉवर आणि 8.4 Nm पिक टॉर्क जनरेट करतं. ज्युपिटर क्लासिक ईटी-एफआय स्कूटर अनेक रंगांमध्ये उपलब्ध आहे ज्यामध्ये सनलाईट आयव्हरी, ऑटम ब्राऊन आणि न्यू इंडिब्लू शेडचा समावेश आहे.

संबंधित बातम्या

नव्या अवतारात बजाजची ‘कडक CT100’ लाँच, 1 लीटर पेट्रोलमध्ये 90 किलोमीटर धावणार

सणासुदीच्या दिवसांमध्ये Hero Super Splendor घरी आणा, कंपनीकडून तीन मोठ्या ऑफर्स

ठरलं! रॉयल एनफिल्डची बहुप्रतीक्षित Meteor 350 लाँच होणार; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Festival Offer : हीरोच्या ‘या’ स्कूटरवर 15 हजार रुपयांचा डिस्काऊंट

(Buy TVS Jupiter with zero finance and get cashback; check other exciting offers)