Festival Offer : हीरोच्या ‘या’ स्कूटरवर 15 हजार रुपयांचा डिस्काऊंट

भारतात दिवाळी खूप मोठ्या उत्साहात साजरी केली जाते (Discount on Hero Optima bike). या सणामध्ये सर्वाधिक लोक मोठ्या प्रमाणात नवनवीन वस्तूंची खरेदी करतात.

Festival Offer : हीरोच्या 'या' स्कूटरवर 15 हजार रुपयांचा डिस्काऊंट
Follow us
| Updated on: Oct 18, 2020 | 10:12 AM

मुंबई : भारतात दिवाळी खूप मोठ्या उत्साहात साजरी केली जाते (Discount on Hero Optima bike). या सणामध्ये सर्वाधिक लोक मोठ्या प्रमाणात नवनवीन वस्तूंची खरेदी करतात. कार, बाईक आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंची मोठ्या प्रमाणात मागणी असते. अशामध्ये जर तुम्ही बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी मोठी संधी आहे. यावेळी ऑटोमोबाईल कंपनी मोठा डिस्काऊंट देत आहे. हीरो इलेक्ट्रिक कंपनी आपल्या टू व्हीलर्सवर शानदार डिस्काऊंट देत आहे (Discount on Hero Optima bike).

टू व्हीलर कंपनी हीरो इलेक्ट्रिककडून ऑक्टोबरमध्ये ई-स्कूटर्सवर 15 हजार रुपयेपर्यंतचा डिस्काऊंट ऑफर केला जात आहे.

हीरो इलेक्ट्रिकच्या Hero Optima HX City Speed स्कूटरची किंमत 71,950 रुपये आहे. पण फेस्टिव्ह ऑफरमध्ये या इलेक्ट्रिक स्कूटरवर 14390 रुपयांचा डिस्काऊंट दिला जात आहे. म्हणजे ही स्कूटर तुला 57560 रुपयात मिळणार आहे. ही ऑफर काही दिवसांपूर्तीच मर्यादीत आहे.

हीरो ऑप्टिमाचे वैशिष्ट्य

हीरोची शानदार इलेक्ट्रिक स्कूटर Hero Optima HX City Speed ची टॉप स्पीड 42 किलोमीटर प्रति तास आहे. स्कूटरमध्ये 550W मोटरसह 30Ah ची लीथिअम आयन बॅटरी देण्यात आलेली आहे. बॅटरीला 4 ते 5 तास फुल चार्ज केले जाऊ शकते. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, बॅटरी पूर्ण चार्ज झाल्यावर स्कूटर 82 किलोमीटरपर्यंत चालू शकते. स्कूटरमध्ये मोबाईल चार्जिंग आणि LED लायटिंगसाठी USB पोर्टही दिला आहे. या स्कूटरमध्ये एक डिजिटल स्पीडमीटर, अँटी थेफ्ट अलार्म, रिमोट लॉक आणि कम्बाइंट ब्रेकिंग सिस्टमचाही समावेश आहे.

याशिवाय हीरोच्या दुसऱ्या इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या खरेदीवर मोठी सूट दिली जात आहे. कंपनीच्या इतर स्कूटर्सवर 6 हजार रुपयांचा डिस्काऊंट मिळत आहे. ही ऑफर Nyx HX, ऑप्टिमा HX, Velocity आणि Glyde स्कूटर्ससाठी आहे.

संबंधित बातम्या :

अनलॉकचा ऑटो क्षेत्राला फायदा, सप्टेंबरमध्ये 2500 पेक्षा अधिक इलेक्ट्रिक बाईकची विक्री

Festival Offer : दसरा, दिवाळीत Jeep Compass वर 1.5 लाखांची सूट

Non Stop LIVE Update
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.