India vs New Zealand Final Live Updates : टीम इंडिया तिसऱ्या टी 20I वर्ल्ड कपसाठी सज्ज, न्यूझीलंड विरुद्ध भिडणार
India vs New Zealand Final Match LIVE Updates T20 world cup 2026 : अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयसीसी स्पर्धेच्या अंतिम फेरीचं आयोजन करण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी 2023 च्या एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल सामना इथे खेळवण्यात आला होता.

LIVE Cricket Score & Updates
-
India vs New Zealand Live : टीम इंडियाची या स्पर्धेतील आतापर्यंतची कामगिरी
टीम इंडियाने या स्पर्धेत आतापर्यंत 7 पैकी 6 सामने जिंकले आहेत. भारताने साखळी फेरीत 4 पैकी 4 सामन्यांत विजय मिळवला आहे. तर भारताला सुपर 8 फेरीत 3 पैकी फक्त एकदाच पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यानंतर भारताने उपांत्य फेरीत सलग दुसऱ्यांदा इंग्लंडला पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवलाय. आता टीम इंडियाचं लक्ष्य वर्ल्ड कप ट्रॉफी आहे.
-
India vs New Zealand Live : भारत टी 20i सामन्यांत न्यूझीलंडपेक्षा सरस, दोन्ही संघ किती सामने खेळलेत?
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात आतापर्यंत एकूण 30 टी 20i सामने खेळवण्यात आले आहेत. भारताने त्यापैकी सर्वाधिक 18 तर न्यूझीलंडने 11 सामने जिंकले आहेत. तर उभयसंघातील 1 सामना टाय झाला होता ज्याचा निकाल पावसामुळे लागला नाही. भारताने मायदेशात न्यूझीलंड विरुद्ध 16 पैकी 11 सामने जिंकले आहेत.
-
-
India vs New Zealand Live : न्यूझीलंड टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियावर वरचढ, किती सामने जिंकलेत?
आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात न्यूझीलंड टीम इंडियावर वरचढ असल्याचं आकड्यांवरुन स्पष्ट होतं. उङयसंघात एकूण 3 सामने खेळवण्यात आले आहेत. न्यूझीलंडने या तिन्ही सामन्यांत भारताला पराभूत केलं आहे. त्यामुळे आता टीम इंडिया चौथ्या सामन्यात विजय मिळवून गेल्या 3 पराभवांचा हिशोब करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
-
India vs New Zealand Live : न्यूझीलंडसमोर भारताचं आव्हान, पहिल्या टी 20i वर्ल्ड कप ट्रॉफीची प्रतिक्षा संपवणार?
न्यूझीलंडची आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचण्याची ही दुसरी वेळ आहे. न्यूझीलंडला पहिल्या प्रयत्नात उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं. त्यामुळे आता न्यूझीलंड दुसऱ्या प्रयत्नात टी 20i वर्ल्ड कप ट्रॉफीवर आपलं नाव कोरण्यात यशस्वी ठरणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
-
India vs New Zealand Live : टीम इंडिया तिसऱ्या टी 20i वर्ल्ड कप ट्रॉफीसाठी सज्ज, जिंकणार?
टीम इंडिया सलग दुसऱ्या आणि एकूण तिसऱ्या टी 20i वर्ल्ड कप ट्रॉफीसाठी मैदानात उतरणार आहे. टीम इंडियाने 2007 आणि त्यानंतर 2024 मध्ये टी 20i वर्ल्ड कप जिंकला होता. त्यानंतर आता टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन होण्यापासून एक पाऊल दूर आहे.
-
-
India vs New Zealand Live : टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी न्यूझीलंड टीम
टीम सायफर्ट (विकेटकीपर), फिन ऍलन, रचीन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरेल मिचेल, जेम्स नीशम, मिशेल सँटनर (कॅप्टन), कोल मॅककॉन्ची, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, डेव्हॉन कॉनवे, काइल जेमिसन, ईश सोढी आणि जेकब डफी.
-
India vs New Zealand Live : टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघ
अभिषेक शर्मा, संजू सॅमसन(विकेटकीपर), इशान किशन, सूर्यकुमार यादव(कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव.
-
-
T20 WC Final Match 2026 : टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेतील महाअंतिम सामना, न्यूझीलंडसमोर भारताचं आव्हान
न्यूझीलंडसमोर आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील अंतिम सामन्यात यजमान आणि गतविजेता टीम इंडियाचं आव्हान आहे. न्यूझीलंडलने याआधी एकदाही टी 20I वर्ल्ड कप जिंकलेला नाही. न्यूझीलंडची अंतिम फेरीत पोहचण्याची ही दुसरी वेळ आहे. न्यूझीलंडला पहिल्या फेरीत अपयश आलं होतं. त्यामुळे यंदा न्यूझीलंडचा विजय मिळवण्याचा प्रयत्न असणार आहे. मात्र न्यूझीलंडसमोर गतविजेत्या भारताचं आव्हान आहे. त्यामुळे किवींचा चांगलाच कस लागणार आहे.
आयसीसी टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेतील 10 व्या पर्वाच्या अंतिम फेरीत यजमान टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड आमनेसामने आहेत. भारताने इंग्लंडला पराभूत करुन अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तर न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेवर एकतर्फी विजय साकारुन फायनलमध्ये धडक दिली आहे. आता अशात दोघांपैकी कोणता संघ विजय मिळवून वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरण्यात यशस्वी ठरतो? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून आहे. या निमित्ताने आपण महाअंतिम सामन्यातील प्रत्येक अपडेट लाईव्ह ब्लॉगद्वारे जाणून घेणार आहोत.
Published On - Mar 08,2026 1:57 PM
