AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BAN vs AUS, 2nd T20i : ऑस्ट्र्रेलिया मालिका विजयासाठी सज्ज, बांगलादेश कमबॅक करणार?

Bangladesh vs Australia 2nd T20I Live Streaming : ऑस्ट्रेलियाने मालिकेत विजयी सुरुवात केली. त्यामुळे कांगारुंकडे सलग दुसरा सामना मालिका मालिका आपल्या नावावर करण्याची संधी आहे. तर बांगलादेशसाठी ही शेवटची संधी आहे.

BAN vs AUS, 2nd T20i : ऑस्ट्र्रेलिया मालिका विजयासाठी सज्ज, बांगलादेश कमबॅक करणार?
BAN vs AUS 2nd T20i PreviewImage Credit source: @BCBtigers X Account
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Jun 18, 2026 | 11:39 PM
Share

बांगलादेश क्रिकेट टीमने मायदेशात ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय मालिकेत धुव्वा उडवला. बांगलादेशने सलग 2 सामने जिंकून मालिका आपल्या नावावर केली. बांगलादेशने यासह एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच ऑस्ट्रेलिया विरुद्ध मालिका जिंकली. मात्र ऑस्ट्रेलियाने तिसरा आणि अंतिम सामना जिंकून लाज राखली. त्यानंतर कांगारुंनी 3 सामन्यांच्या टी 20i मालिकेत विजयी सलामी दिली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाकडे सलग दुसरा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याची संधी आहे. तर बांगलादेशसाठी दुसरा सामना हा करो या मरो असा आहे. बांगलादेशला मायदेशात टी 20i मालिका पराभव टाळायचा असेल तर कोणत्याही स्थितीत विजयी व्हावं लागणार आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया दुसरा सामना जिंकून मालिका नावावर करणार की बांगलादेश पलटवार करुन मालिकेत 1-1 ने बरोबरी साधणार? याची चाहत्यांना उत्सूकता आहे.

बांगलादेश विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा टी 20i सामना कधी?

बांगलादेश विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा टी 20i सामना शुक्रवारी 19 मे रोजी होणार आहे.

बांगलादेश विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा टी 20i सामना कुठे?

बांगलादेश विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा टी 20i सामना चट्टोग्राममधील बीर श्रेष्ठ फ्लाइट लेफ्टनंट मतिउर रहमान स्टेडियममध्ये होणार आहे.

बांगलादेश विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसऱ्या टी 20i सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

बांगलादेश विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसऱ्या टी 20i सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 1 वाजता टॉस होणार आहे.

बांगलादेश विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा टी 20i सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

बांगलादेश विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा टी 20i सामना भारतात टीव्हीवर दाखवण्यात येणार नाही.

बांगलादेश विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा टी 20i सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

बांगलादेश विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा टी 20i क्रिकेट सामना मोबाईलवर फॅनकोड एपद्वारे लाईव्ह पाहायला मिळेल.

पहिल्या सामन्यात काय झालं?

ऑस्ट्रेलियाने मिचेल मार्श याच्या नेतृत्वात बांगलादेशला 19 ओव्हरमध्ये 131 रन्सवर गुंडाळलं. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला 132 धावांचं आव्हान मिळालं. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 10 बॉलआधी 6 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियाने 18.2 ओव्हरमध्ये 4 विकेट्स राखून 133 धावा केल्या

हेड टु हेड

दरम्यान उभयसंघात आतापर्यंत 12 टी 20i सामने खेळवण्यात आले आहेत. ऑस्ट्रेलियाने या 12 पैकी सर्वाधिक 8 सामने जिंकले आहेत. तर बांगलादेश 4 सामने जिंकण्यात यशस्वी ठरली आहे. त्यामुळे आता 13 व्या सामन्याचा निकाल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो? यासाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे.

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी