AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हे माझ्या आयुष्यातील एक मोठे सौभाग्य आहे, पॅरीस येथे काय म्हणाले पंतप्रधान मोदी ?

"जग पाहत आहे: भारत केवळ भविष्याची तयारी करत नाहीए. मी हे पूर्ण जबाबदारीने सांगतो, भारत उद्याच्या भविष्याला आकार देत आहे असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी पॅरीसमधील भारतीय सुमदायाला संबोधित करताना सांगितले.

हे माझ्या आयुष्यातील एक मोठे सौभाग्य आहे, पॅरीस येथे काय म्हणाले पंतप्रधान मोदी ?
pm modi in france
| Updated on: Jun 18, 2026 | 11:42 PM
Share

‘जेव्हा मी १४ जून रोजी नीस येथे पोहोचलो, तेव्हा मी सर्वप्रथम ‘इंडिया इनोव्हेट्सस २०२६’ कार्यक्रमात सहभागी झालो. आज, फ्रान्सहून परतण्याच्या तयारीत असताना, मला असे वाटते की मी ‘इंडिया कनेक्ट्स’ कार्यक्रमात आलो आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरीस येथे भारतीय समुदायाला संबोधित करताना म्हटले आहे. ते पुढे म्हणाले की ज्या प्रकारे तुम्ही २१ व्या शतकातील भारत-फ्रान्स संबंध दृढ केले आहेत, ती आमच्या सामरिक भागीदारीची एक मोठी ताकद बनत आहे. मी तुम्हाला १४० कोटी भारतीय नागरिकांच्या वतीने शुभेच्छा देतो. या जोरदार स्वागताबद्दल मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानतो.”

ही सामाजिक बदलाची कहाणी आहे –

सलग १२ वर्षे निवडून आलेला पंतप्रधान म्हणून देशाची सेवा करणे हे माझ्या आयुष्यातील एक मोठे सौभाग्य आहे. भारताच्या लोकशाहीच्या सामर्थ्यानेच एका चहा विक्रेत्याला या पदापर्यंत पोहोचवले आहे. गेली १२ वर्षे ही १.४ अब्ज भारतीयांच्या अविश्वसनीय क्षमतेची साक्ष आहेत. या काळात भारताचा जीडीपी दुप्पट झाला आहे, विमानतळांची संख्या दुप्पट झाली आहे आणि विद्यापीठांची संख्याही दुप्पट झाली आहे. महामार्गाचे बांधकामही दुप्पट झाले आहे असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “आज नव्या भारताची कहाणी ही केवळ आर्थिक प्रगतीची कहाणी नाही, किंवा ती तेवढ्यापुरती मर्यादितही नाही. ही सामाजिक बदलाचीही कहाणी आहे. गेल्या १२ वर्षांत देशातील २५ कोटी लोक गरिबीतून बाहेर आले आहेत.” ते म्हणाले, “मी आणखी काही तथ्ये सांगू इच्छितो, जेणेकरून भारत कोणत्या गतीने आणि किती मोठ्या प्रमाणावर काम करीत आहे हे तुम्हाला समजू शकेल. गेल्या १२ वर्षांत भारताची निर्यात ३५ पटींनी वाढली आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे, भारतातील मोबाईल उत्पादन युनिट्सची संख्या १०० पटींनी वाढली आहे.”

मोदी म्हणाले, “आता भारतातील प्रत्येक कुटुंबाचे कितीही गरीब असले तरी, बँक खाते आहे. आर्थिक समावेशन हा केवळ एक सरकारी कार्यक्रम नाही, तर ती एक सामाजिक बदलाची चळवळ बनली आहे. या बारा वर्षांच्या कामगिरीमध्ये एक अशी कामगिरी आहे, जी आकडेवारी किंवा डेटामध्ये मोजता येत नाही.”

आज देश गगनयानची तयारी करत आहे..

पंतप्रधान मोदी म्हणाले, “आज भारतातील लोकांना आपले जीवनमान उंचावायचे आहे आणि भारताला एका नव्या स्तरावर नेण्याचे त्यांचे ध्येय आहे. त्यांच्यामध्ये दृढनिश्चय आहे, त्यांची स्वप्ने आहेत आणि हीच आकांक्षा आज भारताच्या विकास प्रवासाची सर्वात मोठी ताकद आहे. मी तुम्हाला भारताच्या अंतराळ प्रवासाचे उदाहरण देतो. भारताने चांद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवले. जगाने याला एक मोठी कामगिरी म्हटले. पण भारत तिथेच थांबला नाही. आज देश गगनयानची तयारी करत आहे. आज भारत स्वतःचे अंतराळ स्थानक उभारण्याच्या दिशेने पुढे जात आहे.

मोदी म्हणाले,  एक काळ होता जेव्हा देशांमधील संबंध केवळ परस्पंर व्यापारावर अवलंबून होते. आज, व्यापाराइतकाच विश्वासही महत्त्वाचा झाला आहे. प्रत्येक देशाला एक विश्वासार्ह पुरवठा साखळी हवी आहे. प्रत्येक देशाला एक स्थिर भागीदारी हवी आहे. प्रत्येक देश अशा भागीदारांच्या शोधात आहे, ज्यांच्यावर दीर्घकाळासाठी विश्वास ठेवता येईल. आणि अशा वेळी, भारत जगात एक विश्वासार्ह भागीदार म्हणून उदयास येत आहे.”

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी