AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिका-इराण युद्धाला पूर्णविराम मिळणार, चेंडू डोनाल्ड ट्रम्प यांच्या कोर्टात, कोणत्या 3 अटींवर सर्व रखडलं?

अमेरिका-इराण युद्धाला पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. याबाबतचा चेंडू डोनाल्ड ट्रम्प यांच्या कोर्टात टाकण्यात आला आहे. यासाठी तीन अटी ठेवण्यात आल्या आहेत.

अमेरिका-इराण युद्धाला पूर्णविराम मिळणार, चेंडू डोनाल्ड ट्रम्प यांच्या कोर्टात, कोणत्या 3 अटींवर सर्व रखडलं?
warImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 20, 2026 | 7:36 AM
Share

इराण-अमेरिकेच्या युद्धाला लवकरच पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. युद्ध संपुष्टात आणण्यासाठी तीन अटी ठेवण्यात आल्या आहेत. युद्धाला पूर्णविराम देण्याचा चेंडू हा अमेरिका आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कोर्टात गेला आहे. या गोष्टीला इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव मोहसेन रसाई यांनी शनिवारी दुजोरा दिला आहे. अमेरिकेला कतार आणि पाकिस्तानमार्फत युद्ध संपवण्यासाठी तीन अटी पाठवण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे अमेरिकेला लवकरच या अटींवर भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे.

 युद्ध संपवण्यासाठी कोणत्या तीन अटी आहेत?

अमेरिकेला तीन मुख्य अटी पाठवण्यात आल्या आहेत. यात आघाड्यांवरील लष्करी संघर्ष, युद्ध पूर्णपणे थांबवणे, अमेरिकेने जप्त केलेली मालमत्ता परत कऱणे, इराणी बंदरावर लादण्यात आलेली सागरी नाकेबंदी उठवण्यात यावी, याचा समावेश आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या आक्रमक पवित्र्यामुळे इराणला अण्वसस्त्र प्रसारबंदी करारातून माघार घेण्यासाठी आधार मिळत आहे. परंतु इराणकडून या करारातून बाहेर पडण्याचा अंतिम निर्णय घेतलेला नाही. हा निर्णय अमेरिकेच्या वर्तनावर अवलंबून असणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

इराणच्या सुरक्षा प्रमुखांनी म्हटलं की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे इराणबाबतचे मूल्यांकन चुकीचे ठरले आहे. इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी इशारा दिला की, ट्रम्प यांच्या धमक्यांचा काहीही परिणाम होणार नाही. इराण युद्धासाठी तयार असल्याचे सांगण्यात येत आहे. इराणच्या सशस्त्र दलांना अमेरिकेच्या लष्कराच्या कमकुवतपणाची जाणीव आहे. ते अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांना सामोरे जाण्यास तयार आहे. अमेरिकेने मागील करारातून माघार घेतल्याने तेहरानला वॉशिंग्टनबाबतची रणनिती बदलावी लागली. इराणने अलीकडेच अमेरिकेच्या जहाजाजवळ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करून तयारी दाखवली आहे, असे त्यांनी निदर्शनास आणून दिलं आहे. तत्पूर्वी, येमन आणि सौदी अरेबिया यांच्यातील संबंधावर रजाई यांनी महत्त्वाचं भाष्य केलं. रजाई म्हणाले, सौदी अरेबिया आणि येमेन यांच्यातील सुरू असलेला संघर्ष संपुष्टात यावा, अशी इराणची इच्छा आहे. येमेनचे लोक देखील सौदी अरेबियाच्या कराराच्या बाजूने आहेत, असा इराणला विश्वास आहे.

Follow Us
महायुतीत नाराजीनाट्य सुरूच; भाजपने शिवसेनेला डावलल्याचा आरोप....
Mahayuti : महायुतीत नाराजीनाट्य सुरूच; भाजपने शिवसेनेला डावलल्याचा आरोप, शीतल म्हात्रेंची पोस्ट चर्चेत
पायल झांबरे प्रकरणात मोठी कारवाई; फरार सासू-सासरे पोलिसांच्या ताब्यात
Pune Payal Zabare : पायल झांबरे प्रकरणात मोठी कारवाई; फरार सासू-सासरे पोलिसांच्या ताब्यात, पतीनंतर दोघांनाही अटक
राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजीचा सूर! मित्रपक्षांविरोधात आमदार...
राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजीचा सूर? मित्रपक्षांविरोधात आमदारांच्या तक्रारी, बैठकीत नेमकं काय घडलं?
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज ठाकरेंचा मोठा निर्णय! यंदा...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज ठाकरेंचा मोठा निर्णय! यंदा शिवाजी पार्कचा दीपोत्सव रद्द
भारतीय जनता पक्षाविरुद्ध देशात तिरस्कार निर्माण झालाय आता... संजय राऊत
भारतीय जनता पक्षाविरुद्ध देशात तिरस्कार निर्माण झालाय आता... संजय राऊत आक्रमक
व्हायरल व्हिडिओवर श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'तो केवळ...
व्हायरल व्हिडिओवर श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'तो केवळ थट्टा-मस्करीचा भाग, नेमकी भानगड काय?
राजू शेट्टींसह शेतकरी आक्रमक, पुणे-बंगळूर महामार्ग रोखला; वाहतुक कोंडी
राजू शेट्टींसह शेतकरी आक्रमक, पुणे-बंगळूर महामार्ग रोखला; मोठी वाहतुक कोंडी
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून डिस्चार्ज
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून डिस्चार्ज आता प्रकृती स्थिर, डॉक्टरांनी...
शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; कोणत्या मुद्द्यावर होणा
Shivsena Hearing : शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; कोणत्या मुद्द्यावर होणार युक्तीवाद?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची बैठक
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची अत्यंत महत्त्वाची बैठक, नेमकं कारण...