AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कार पाहिजे तर अशी, किंमत 3.69 लाख रुपये अन् मायलेज 33 किमी, 15 वर्षांपासून विक्रीमध्ये नंबर-1

गेल्या 15 वर्षांत देशात या कारला मिळाली सर्वाधिक ग्राहकांची पसंती. किंमत 3.69 लाख रुपयांपासून सुरु. मायलेज 33 किमी आणि फीचर्स देखील जबरदस्त.

कार पाहिजे तर अशी, किंमत 3.69 लाख रुपये अन् मायलेज 33 किमी, 15 वर्षांपासून विक्रीमध्ये नंबर-1
Image Credit source: Social media
| Updated on: Nov 04, 2026 | 2:27 PM
Share

भारतीय ऑटोमोबाईल बाजारात सर्वाधिक विक्री होणारी कार बनण्यासाठी कंपन्यांमध्ये नेहमीच चुरस पाहायला मिळते. गेल्या 15 वर्षांचा विचार केला तर या स्पर्धेत बहुतांश काळ Maruti Suzuki च्या कारचे वर्चस्व राहिले आहे. Alto, Swift, WagonR आणि Dzire या कारने वेगवेगळ्या वर्षांत देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारचा मान मिळवला आहे. मात्र, 2024 मध्ये Tata Motors च्या Punch ने Maruti च्या या वर्चस्वाला मोठा धक्का दिला. आता 2026 मध्ये पुन्हा एकदा Maruti Dzire आणि Tata Punch यांच्यात नंबर-1 होण्यासाठी चुरस रंगली आहे.

Autopunditz च्या अहवालानुसार, 2011 ते 2017 या सलग सात वर्षांमध्ये Maruti Suzuki Alto ही देशातील सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली होती. 2011 मध्ये Alto च्या तब्बल 3.11 लाख युनिट्सची विक्री झाली होती. गेल्या 15 वर्षांच्या कालावधीत एका कारने एका वर्षात केलेली ही सर्वाधिक विक्री ठरली.

मात्र, 2018 मध्ये Alto चे वर्चस्व संपुष्टात आले. Maruti Dzire ने 2.65 लाख युनिट्सची विक्री करत Alto ला मागे टाकले. त्यावेळी Alto ची विक्री 2.57 लाख युनिट्स होती. 2019 मध्ये Alto ने 2.08 लाख युनिट्सच्या विक्रीसह पुन्हा अव्वल स्थान मिळवले. मात्र, हे तिचे शेवटचे नंबर-1 वर्ष ठरले. सध्या Alto ची सुरुवातीची किंमत 3.69 लाख रुपये असून, तिचे मायलेज 33 किमी प्रति किलोपर्यंत असल्याचा दावा केला जातो.

Swift आणि WagonR मध्ये रंगली स्पर्धा

2020 मध्ये Maruti Swift ने 1.61 लाख युनिट्सची विक्री करत पहिल्यांदा सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारचा मान मिळवला. मात्र, 2021 मध्ये WagonR ने Swift ला मागे टाकत अव्वल स्थान पटकावले. 2022 मध्येही WagonR ने आपले वर्चस्व कायम ठेवत 2.17 लाख युनिट्सची विक्री केली.

यानंतर 2023 मध्ये Swift ने पुन्हा जोरदार पुनरागमन केले. या वर्षात Swift च्या 2.03 लाख युनिट्सची विक्री झाली. विशेष म्हणजे, WagonR च्या तुलनेत केवळ 2,168 युनिट्सच्या फरकाने Swift ने पहिला क्रमांक मिळवला. सध्या देखील ग्राहक या कारला मोठ्या प्रमाणात पसंती देताना दिसत आहेत.

Follow Us
महायुतीत नाराजीनाट्य सुरूच; भाजपने शिवसेनेला डावलल्याचा आरोप....
Mahayuti : महायुतीत नाराजीनाट्य सुरूच; भाजपने शिवसेनेला डावलल्याचा आरोप, शीतल म्हात्रेंची पोस्ट चर्चेत
पायल झांबरे प्रकरणात मोठी कारवाई; फरार सासू-सासरे पोलिसांच्या ताब्यात
Pune Payal Zabare : पायल झांबरे प्रकरणात मोठी कारवाई; फरार सासू-सासरे पोलिसांच्या ताब्यात, पतीनंतर दोघांनाही अटक
राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजीचा सूर! मित्रपक्षांविरोधात आमदार...
राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजीचा सूर? मित्रपक्षांविरोधात आमदारांच्या तक्रारी, बैठकीत नेमकं काय घडलं?
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज ठाकरेंचा मोठा निर्णय! यंदा...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज ठाकरेंचा मोठा निर्णय! यंदा शिवाजी पार्कचा दीपोत्सव रद्द
भारतीय जनता पक्षाविरुद्ध देशात तिरस्कार निर्माण झालाय आता... संजय राऊत
भारतीय जनता पक्षाविरुद्ध देशात तिरस्कार निर्माण झालाय आता... संजय राऊत आक्रमक
व्हायरल व्हिडिओवर श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'तो केवळ...
व्हायरल व्हिडिओवर श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'तो केवळ थट्टा-मस्करीचा भाग, नेमकी भानगड काय?
राजू शेट्टींसह शेतकरी आक्रमक, पुणे-बंगळूर महामार्ग रोखला; वाहतुक कोंडी
राजू शेट्टींसह शेतकरी आक्रमक, पुणे-बंगळूर महामार्ग रोखला; मोठी वाहतुक कोंडी
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून डिस्चार्ज
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून डिस्चार्ज आता प्रकृती स्थिर, डॉक्टरांनी...
शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; कोणत्या मुद्द्यावर होणा
Shivsena Hearing : शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; कोणत्या मुद्द्यावर होणार युक्तीवाद?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची बैठक
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची अत्यंत महत्त्वाची बैठक, नेमकं कारण...