AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gokul President Election : गोकुळ अध्यक्षपदाच्या निवडणुकीआधी सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीला मोठा धक्का, राज्य सरकारने तो निर्णय घेतलाच

Gokul President Election : गोकुळ अध्यक्षपदाच्या निवडणुकीआधी सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीला मोठा धक्का बसेल असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरकारकडून असा निर्णय होऊ शकतो अशी चर्चा होती.

Gokul President Election : गोकुळ अध्यक्षपदाच्या निवडणुकीआधी सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीला मोठा धक्का, राज्य सरकारने तो निर्णय घेतलाच
Satej Patil
| Updated on: Nov 04, 2026 | 2:35 PM
Share

गोकुळ अध्यक्षपदाच्या निवडणुकीआधी सतेज पाटील यांच्या राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीला मोठा धक्का बसला आहे. गोकुळ बाबत राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. गोकुळवर चार शासन नियुक्त संचालक नेमण्यात येणार आहेत. कॅबिनेट बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आल्याची माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. त्यामुळे गोकुळच्या अध्यक्षपदाचा तिढा सुटणार आहे. पण सतेज पाटील यांच्या राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीला 13 जागा मिळूनही सत्तेपासून वंचित रहावं लागू शकतं. महायुतीच्या पॅनलला 12 जागा मिळाल्या आहेत.शासन नियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार मिळाला तर महायुतीच्या पॅनलचा संचालक निवडून येण्याचा मार्ग मोकळा होईल. अशावेळी सत्तेचा कौल असून सतेज पाटील यांची आघाडी सत्तेबाहेर राहू शकते.

प्रतिष्ठेच्या गोकुळ दूध महासंघाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीला 13 जागा मिळाल्या, तर महायुतीच्या पॅनलला 12 जागा मिळाल्या आहेत. दोघांमध्ये फक्त एका जागेचं अंतर आहे. आता दूध संघाच्या अध्यक्ष निवडीसाठी 14 जणांच्या उपस्थितीचा कोरम महत्वाचा मानला जातो. परंतु कोरम न झाल्याने गोकुळच्या अध्यक्षपदाची निवडणूक झालेली नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार येत्या 10 नोव्हेंबरला गोकुळच्या अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.

(बातमी अपडेट होत आहे)

Follow Us
महायुतीत नाराजीनाट्य सुरूच; भाजपने शिवसेनेला डावलल्याचा आरोप....
Mahayuti : महायुतीत नाराजीनाट्य सुरूच; भाजपने शिवसेनेला डावलल्याचा आरोप, शीतल म्हात्रेंची पोस्ट चर्चेत
पायल झांबरे प्रकरणात मोठी कारवाई; फरार सासू-सासरे पोलिसांच्या ताब्यात
Pune Payal Zabare : पायल झांबरे प्रकरणात मोठी कारवाई; फरार सासू-सासरे पोलिसांच्या ताब्यात, पतीनंतर दोघांनाही अटक
राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजीचा सूर! मित्रपक्षांविरोधात आमदार...
राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजीचा सूर? मित्रपक्षांविरोधात आमदारांच्या तक्रारी, बैठकीत नेमकं काय घडलं?
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज ठाकरेंचा मोठा निर्णय! यंदा...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज ठाकरेंचा मोठा निर्णय! यंदा शिवाजी पार्कचा दीपोत्सव रद्द
भारतीय जनता पक्षाविरुद्ध देशात तिरस्कार निर्माण झालाय आता... संजय राऊत
भारतीय जनता पक्षाविरुद्ध देशात तिरस्कार निर्माण झालाय आता... संजय राऊत आक्रमक
व्हायरल व्हिडिओवर श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'तो केवळ...
व्हायरल व्हिडिओवर श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'तो केवळ थट्टा-मस्करीचा भाग, नेमकी भानगड काय?
राजू शेट्टींसह शेतकरी आक्रमक, पुणे-बंगळूर महामार्ग रोखला; वाहतुक कोंडी
राजू शेट्टींसह शेतकरी आक्रमक, पुणे-बंगळूर महामार्ग रोखला; मोठी वाहतुक कोंडी
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून डिस्चार्ज
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून डिस्चार्ज आता प्रकृती स्थिर, डॉक्टरांनी...
शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; कोणत्या मुद्द्यावर होणा
Shivsena Hearing : शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; कोणत्या मुद्द्यावर होणार युक्तीवाद?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची बैठक
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची अत्यंत महत्त्वाची बैठक, नेमकं कारण...